विनम्र अभिवादन भावपूर्ण श्रद्धांजली शिक्षक आमदार वसंतराव मालधुरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विनम्र अभिवादन भावपूर्ण श्रद्धांजली
शिक्षक आमदार वसंतराव मालधुरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले
अमरावती : विधान परिषदेचे माजी
शिक्षक आमदार समाज भूषण वसंतराव पुरुषोत्तम मालधुरे यांचे वयाच्या ८५, यावर्षी लक्ष्मीनगर, अमरावती यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते मूळचे वहा. तिवसायेथील रहिवासी होते.
वसंतराव मालधुरे हे १९९० मध्ये अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. तत्पूर्वी त्यांनी अमरावती येथील गणेशदास राठी विद्यालयात ४० वर्षे अध्यापन काम केले. ते माध्यमिक शिक्षक परिषदेचे
संस्थापक सदस्य होते आणि १९८४ मध्ये सरचिटणीस म्हणून निवडले होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य कार्यकारी समितीत ते अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करीत होते. अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक महासंघाची महामंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे ते सिनेट सदस्यदेखील होते अमरावती नगर वाचनालयाचे ते संचालक झाले. याशिवाय अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, असा परिवार आहे.
आमदार व समाजाचे हितचिंतक म्हणून त्यांनी केलेले कार्य समाज कधीही विसरणार नाही माळी समाजाची झालेली हानी कधीही भरून निघणार नाही अखिल भारतीय माळी महासंघ त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्यांच्या आत्म्यास निर्मिक चिरशांती देवो हीच निर्मिकास प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏




