आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मोदीजींचा पराभव अटळ

*आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मोदीजींचा पराभव अटळ*
सोलापूर दि.११ फेब्रुवारी२०२४
भाजप मधील ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी हे अर्थातज्ञ असून ते चीन विषयावर गाडे अभ्यासक असून त्यांना चीनी भाषा बोलता येथे.मोदीजी चीन आपल्या देशाची जमीन बळकावत असताना गप्प बसून आहेत. तसेंच मोदी, सरकारने देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली असून देश आर्थिक संकटात सापडला आहे.
असे नेहमी मोदी, यांच्या सरकार ची वस्तुनिष्ठ चित्र जनतेसमोर मांडतात. मोदीजी यांचे एकेकाळी निकटवर्तीय वर्तुळात असलेले गुजरात भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ. पन्नालाल व्यास यांनी मोदी, शहा यांच्या विरोधात उघट भूमिका घेऊन मोदी, शहा यांनी देशाचे कसे नुकसान केले आहे हे उघडपणे जनतेसमोर मांडतात. एकंदरीत गेल्या नऊ,दहा वर्षात मोदीजी हे पंतप्रधान म्हणून देशाचे सर्वच क्षेत्रात फार मोठे नुकसान झाले आहे.तरी सुद्धा एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट करुन प्रसार माध्यम हातशी धरुन देशातील भोळ्या भाबड्या जनतेला भ्रमिष्ट करून वाम मार्गाने सत्तेवर येण्यासाठी मोदी, शहा यांचा प्रयत्न असतो.हे प्रयत्न उधळून लावण्यासाठी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या,गुजरात राज्याचे माजी मंत्री डॉ. पनालाल व्यास,आणि प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या अभ्यासपूर्ण रणनीती तयार करण्यासाठी समिती स्थापन करून त्यापद्धतीने काम केल्यानंतर ज्याप्रमाणे २०१४ साली देशात मोदी, लाट आली त्याचप्रमाणे २०२४ साली राहुल गांधी लाट आल्याशिवाय राहणार नाही.
शीला दीक्षित सरकारने विकासकामे करून दिल्ली शहराचा कायापालट केला होता. परंतू सन २०११साली आरएसएस भाजपा प्रणित सर्वच कट्टरवादी संघटनानी महागाई,बेरोजगारी,भ्रष्ठाचार यांनी जनता बेजार झाली आहे असे चित्र निर्माण करुन दिल्लीतील जंतर मंतर येथे आण्णा हजारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आंदोलनाचे नियोजन केले.त्या संपूर्ण आंदोलनात पक्षाचे नाव कुठेही येणार नाही याची काळजी घेतली गेली. प्रसार माध्यमातून अतिरंजीत स्वरूप आंदोलनाला देण्यात आले आणि काँग्रेस पक्ष आणि नेतृत्व याविषयी भ्रम निर्माण करण्यात आला.
आजही प्रसार माध्यम लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करण्याऐवजी मोदी सरकारचे प्रवक्ते म्हणून काम करतात. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यांना देशातील जनता त्रस्त असून प्रसार माध्यमे याकडे लक्ष न देता मोदीजी यांची भाटगिरी करतात. त्यामुळे मोदी सरकारचे अपयश जनते समोर पोहोचविण्यासाठी कॉग्रेस पक्षाने आपल्या कार्यकर्ते कामाला लावले पाहिजेत. सन २०१४ साली काँग्रेस मुक्त भारत करूअसे गर्जना करीत कॉग्रेस पक्षाचे नेतृत्व संपविण्यासाठी मा बेटे के सरकार परिवारवाद असे म्हणत काँग्रेस पक्षाला संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला
परंतू अलिकडील कर्नाटक राज्यातील निवडणूक मध्ये मोदीजीनी साम,दाम,दंड,भेद याचा वापर करून आटोकाट प्रयत्न करून सुद्धा सोनियाजी,राहुलजी, मल्लिकार्जुन खर्गेजी,सिध्दरामहया, डी.के.शिवकुमार यांनी मोदी, शहा यांच्या भाजपलाच संपविले
.
७ फेब्रुवारी २०२३ रोजी राहुलजी यांनी गौतम आडनी यांच्या हिंडेन बर्ग रिपोर्ट चौकशी करण्यासाची मागणी लोकसभेत करून संयुक्त संसदीय समिती म्हणजे जेपीसी नियुक्ती करुन चौकशी करावी अशी मागणी केली. त्या बरोबर आडाणी यांच्या विषयी काही प्रश्न लोकसभेत विचारले.आडणी आणि मोदी यांनी परदेशात आडणी यांच्या विमानाने कितीवेळा प्रवास केला.आडाणी यांना किती देशात वीज निर्मितीसाठी कंत्राट मिळवून दिले.जगात ६०९ क्रमांकावर श्रीमंत असलेले गौतम आडाणी जगातील दूसऱ्या क्रमांकाने श्रीमंत कसे झाले. आणि दूसऱ्या बाजूला कोट्यवधी बेरोजगार यांना कवडी मिळत नाही.
राहूलजीने देशातील बेसुमार बेरोजगारी, गगनाला भिडलेली महागाई,देशातील २३ कोटी जनता दारिद्रय रेषेखाली गेली, शेतकरी यांचे उत्पादन दुप्पटीने, शेतमालाचे हामी भाव दीड्डपट, बहुत हुआ नारीपर अत्याचार अब की बार मोदी सरकार,मोदीजी यांचे काळत परदेशातील काळा पैसाची वाढ झाली,जागतिक बाजर पेटेत क्रुड तेलाचे दर मर्यादित असताना डिझेल,पेट्रोल, गॅसचे वाढलेले दर आदी देशासमोरील ज्वलंत प्रश्नावर संसदेत आणि संसदेत बाहेर जनतेचा आवाज मोदी, शहा यांच्या ईडी, सीबीआय,आयटी निवडणूक आयोग आदी सरकारी संस्थेच्या ससेमिऱ्याला न घाबरता विरोधी पक्षाची भूमिका अत्यंत प्रभावीपणे मांडतात. एवढेच नव्हे तर देशातील जनतेचे ज्वलंत प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यासाठी ७ सप्टेंबर २०२२ पासून कन्याकुमारी ते काश्मिर पर्यंत सुमारे ३५०० हजार किलोमीटर भारत जोडो पदयात्रा काढली. भाजप प्रणित मोदी सरकार समाजात फूट पाडून देशात दुही निर्माण करीत आहे म्हणजे नफरत पसरवित आहे
म्हणून सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी भारत जोडो पदयात्रा आयोजित केली होती. या पदयात्रेला राहूलजीना उत्स्फूर्तपणे देशातील जनतेकढून प्रतिसाद मिळाला. राहूल गांधी देशातील स्वच्छ चारित्र्य असलेले निष्कलंक आपले वडील राजीव गांधी यांचे प्रमाणे प्रमाणिक अशी जनतेच्यामध्यें प्रतिमा निर्माण झाली. म्हणून राहुलजीना रोखण्यासाठी शहा मोदींनी आपल्या सवयीप्रमाणे वाम मार्गाने राहूल गांधी यांना रोखण्याचे उद्योग सुरु केले
सर्वत्र राहूलजी यांची प्रशंसा झाली.आज देशातील बेरोजगार, गरीब, वंचित, पिडीत, शेतकरी, कामगार यांच्या आवाज म्हणून राहुलजी यांच्याकडे देशातील जनता पाहू लागली आहे. २०१४ मध्यें ज्या अपेक्षेने जनतेने मोदी यांना सत्तेवर आणले ती अपेक्षा भंग झली आहे.देशातील जनता मोदी शहा यांच्या कुतंत्राला कंटाळी असून जनतेला बदल हवा आहे.
काँग्रेस पक्षाने गेल्या ७५ वर्षात देशाच्या विकासात मोलाची कामगिरी केली एवढेच नव्हे तर ज्या ज्या वेळी देशात काँग्रेसेतर सरकार सत्तेवर आली तेव्हा देशाची आर्थिक घडी बिघडली. चंद्रशेखर पंतप्रधान असताना कच्चे तेल खरेदी करण्यासाठी परकिय चलना ची गंगा जळी संपली म्हणून जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने देशाची पत संपल्याने कर्ज दिले नाही म्हणून ४८ टन सोने परदेशात गहाण ठेऊन कर्ज आणले. डॉ. मनमोहन सिंहजी यांनी अर्थमंत्री म्हणून पाच वर्षे आणि पंतप्रधान म्हणून दहा वर्षे जे काम केले तेव्हा बिघडलेली अर्थव्यवस्था सुधारित करून आर्थिक बळकटी आणली .
मोदींनी नोटबंदी, चुकीच्या पद्धतीने लावलेली जीएसटी,कोणतीही पूर्वतयारी न करता अचानक लॉकडाऊन लावणे यामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. जेव्हा ‘डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पद सोडले तेव्हा देशावर ५५ लाक कोटी कर्ज आज १५५ लाक कोटी झाले आहे. मोदी सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे शेतकऱ्यांच्या नव्हे तर भांडवलदार उध्योगपतीच्या हिताचे शेतकरी विरोधी काळे कायदे आणले होते. .याविरोधात शेतकऱ्यानी पूर्ण एक वर्षभर आंदोलन केले. आंदोलन काळात ७०० आंदोलक शेतकऱ्याना प्राण गमवून शहिद झाले.फार उशिरा काळे कायदे शेतकरी व राहुल गांधी यांच्या विरोधामुळे मागे घेतले. मोदी सरकार गेली नऊ वर्षे झाली चूकीचे निर्णय घेऊन देशाचे नुकसान करीत आहे.मोदीजी सांगतात एक आणि करतात दूसरे. म्हणून शेतकऱ्यांचा मोदीजीवर विश्वास नाही. सत्तेवर येण्याअगोदर महागाई कमी करणे, वर्षाला दोन कोटी नोकरी , शेतमालाचे दुप्पट उत्पादन, दीड्डपट हामी भाव, परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या बँके खात्यात १५ लाक जमा करणे, भ्रष्टाचार निर्मुलन,मिनिमम गव्हर्नमेंट मँक्सिमम गव्हर्नन्स इत्यादी खोठी आश्वासने पूर्ण न केल्याने दिलेला शब्द मोदीजी पाळत नाहीत अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळे जनतेचा मोदीजीवर विश्वास नाही. तसेच फ्रान्स कडून खरेदी केलेल्या राफेल लढाऊ विमान सौदा करताना फार मोठा घोटाळा करुन देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार केलाआहे. राफेल विमान घोटाळा चौकशी प्रामाणिकपणे करणाऱ्या सीबीआय निदेशक अलोक वर्मा यांना पहाटे दोन वाजता पदावरून हटवले व पिगॉसेस स्पायवेअरचा उपयोग करून त्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची जासूसी केली. तसेच प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर प्रमुख न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी प्रकरण फेटाळून लावले म्हणून मोदी सरकारने त्यांना राज्यसभा सदस्य केले. राफेल विमान खरेदी मध्ये घोटाळा झाला असल्याने फ्रान्स मध्ये नव्याने चौकशी सुरू आहे.त्याचप्रमाणे राफेल विमान खरेदी करार करताना अंबानी उद्योग समूहाला या कामाचा कोणता ही अनुभव नसताना प्राधान्य देऊन भ्रष्टाचार केला आहे.काँग्रेस कालावधी मध्यें निर्माण केलेले सरकारी उद्योग कंपन्या, विमान तळ,बंदरे,विमान कंपनी, रेल्वे,कोळसा खाणी माती मोल किमतीने खाजगी उद्योगपतींना त्यातल्या त्यात गौतम आडनी यांच्या उद्योग समूहाला विकल्याने बेरोजगारी निर्माण झाली आहे.. त्यामुळे आडाणी सारखे उद्योजक जगात सहशे नऊ क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर मोदीजी यांच्या सत्ता काळात आले.यात फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे. तसेंच पिगॉसेस स्पायवेअरचा वापर अतिरेकी देशद्रोही यांच्यासाठी करण्याऐवजी देशनिष्ट प्रमाणिक अधिकारी सत्यशोधक पत्रकार यांच्या साठी करून सत्य दडपण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्याचप्रमाणे कोरोना संसर्ग रोग हातळण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याने त्याकळात हजारो प्रेते औषधे आणि ऑक्सिजन न मिळाल्याने हजारो प्रेते गंगानदीत वाहुन गेली. मोदीजीना जगभरातील प्रसार माध्यमातून जबाबदार धरण्यात आले.एवढेच नव्हे तर जगभरातील देशानी भारताला कोरोना संकटात पाठविण्यात आलेली मदत साहित्य निष्क्रिय मोदी सरकारमुळे विमान तळावर पडून राहिली . कोरोना या संसर्गजन्य साथ रोग वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाचार करून आटोक्यात आणण्या ऐवजी टाळी थाळी .मेनबत्ती दिवा विझविणे अशा अघोरी पध्दतीने अज्ञान, अंधश्रद्धा याला विणाकारण महत्त्व दिले गेले. भारताचा शत्रू चीन नेहमी डोकलाम,लडाक व अरूणाचल प्रदेश पूल बांधणे गावे वसविणे अशी कृत्य करून भारताची जमीन बळकावत असताना मोदी गप्प बसून आहेत. चीनचे नाव घेत नाहीत. एवढेच नव्हे तर चीन समाविष्ट असलेले प्राचीन, अर्वाचीन हे शब्द उच्चारायला मोदी घाबरतात.
म्हणून जनतेला काँग्रेस सरकार व मोदी सरकार याची तुलना करून काँग्रेसने गेल्या ७५ वर्षात अतिशय चांगल्या पध्दतीने सरकार चालवून
पोलिओ मुक्त भारत,माहिती अधिकार, शिक्षण अधिकार, भूमिअधिग्रहन, भोजनाचा अधिकार, दहा शहरात मेट्रो, मोबाईल इंटरनेट, शेतकरी कर्ज माफी, विधवा पेन्शन, मध्यान भोजन,मनरेगा, सहा कोटी रोजगार, लाखो अंगणवाडी,आदिवासीना जमीन पट्टे, वीस हजार किलोमीटर रेल्वे नवीन रेल्वे लाईन, सात नवे एम्स रूग्णालय, नव्वद कोटी आधार कार्ड, आठ कोटी नवीन गैस कनेक्शन, पासष्ट कोटी लोकांना दोन रुपयात अन्न अशी मोठी कामे करून देशाची प्रगती केली तर मोदींनी मोठमोठी भाषणे करू खोठी आश्वासने देऊन जनतेला भुलविले. देशाची प्रगती फक्त काँग्रेस सरकारच करू शकते हे लोकांच्या अनुभवाने सिध्द झाले आहे. काही मुख्य प्रवाह माध्यमे देश हिताचे रक्षण नकरता गोदी मिडिया बनून जनतेची दिशाभूल आहेत .
यामुळे देशातील जनतेकढून २०२४ सालच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मोदी, शहा यांना त्यांची जागा दाखवली जाईल यात शंका नाही
व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा. कॉमेंट करा शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 7801 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा शेअर करा




