सोशल

मंडलनामा क्रमशः 48.शरद पवारांचा ऐतिहासिक निर्णय प्रशासकीय अडथळे आणि मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद

मंडलनामा क्रमशः

48.शरद पवारांचा ऐतिहासिक निर्णय

प्रशासकीय अडथळे आणि मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद

देशातील मान्यवर नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना भारतात सर्वप्रथम महाराष्ट्रात ७ डिसेंबर १९९४ रोजी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखालील जनता दल सरकारने मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय वैध ठरवला. पण त्याची विविध राज्यांत अंमलबजावणी करण्यात अनेक अडथळे होते. आरक्षणविरोधी जनतेला हाताळणे अत्यंत जोखमीचे होते. मंडल विरोधी वातावरणामुळे ओबीसींच्या विरोधात देशभर कडवट भावना होती. या परिस्थितीत मंडल आयोगाची महाराष्ट्रात सुयोग्य अंमलबजावणी करून योग्य लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहचविण्यात शरद पवार यांचे योगदान ऐतिहासिक आहे. त्यांच्या पाठोपाठ विलासराव देशमुख यांना श्रेय द्यावे लागेल. विलासरावांनी त्यांच्या कार्यकाळात अंमलबजावणीतील कागदोपत्री अडचणी दूर केल्या.

शरद पवार यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात १९९४ मध्ये एका सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे, पांडुरंग फुंडकर, अण्णासाहेब डांगे, जनार्दन पाटील यांच्यासारखे ओबीसी समाजाचे बडे नेते उपस्थित होते. राज्याचे कॅबिनेट मंत्री सलीम झकेरिया हे सुद्धा उपस्थित होते. ते कोकणातील मान्यवर नेते. मलाही बैठकीचे निमंत्रण होते. या बैठकीत बोलताना, मुस्लिमांनाही मंडल आयोगाचे लाभ मिळाले पाहिजेत, असे मत मी मांडले. त्याला झकेरिया यांनी विरोध केला. मुसलमानात ओबीसी नाहीत, असे त्यांचे मत पडले. या शब्दांत होणारा
विरोध माझ्यासाठी नवीन नव्हता. मी त्यांचा विरोध बाजूला सारून मुद्दे मांडत असताना माझ्याकडून माईक काढून घेण्यात आला. मला बोलू द्यावे, असा आग्रह जनार्दन पाटील यांनी धरला. बैठकीचा रागरंग बघून शरद पवार यांनी आत्ता येथे बोलू नका, मंत्रालयात या, असे सांगितले.

या बैठकीनंतर मी मंत्रालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली व मुस्लिमांनाही ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी केली. ‘मुस्लिमांत जाती नाहीत, आरक्षण कसे देणार?’, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर मी व्यवसायाच्या आधारावर आरक्षण देता येऊ शकते, असे लक्षात आणून दिले. हा निर्णय घेण्यासाठी एक बैठक आयोजित करावी, अशी विनंती केली.

शरद पवार अत्यंत चाणाक्ष नेते आहेत, हे मी सांगण्याची गरज नाही. एखाद्या मुद्द्याच्या सर्व बाजू तपासूनच निर्णय घेतात. तो उगीच फेटाळत नाहीत. माझे म्हणणे तपासण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर बैठक आयोजित केली. त्यांच्या सूचनेनुसार मी या बैठकीसाठी मुस्लिमांमधील सुमारे ३५ बिरादरींच्या प्रतिनिधींना हजर केले. त्यांची मते ऐकून घेतल्यानंतर शरद पवार यांनी मला विचारले, ‘यांचे मुसलमानांत प्रमाण किती असेल ?’

मी म्हणालो, ‘९० ते ९५ टक्के !’
शरद पवार यांचा त्यावर विश्वास बसेना. पण मी व बिरादरीच्या इतर नेत्यांनी त्यांची खात्री पटेल असे मुद्दे मांडले. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या समूहाला मुसलमानांतील उच्चवर्णीय दडपून ठेवतात. आम्हाला जात व धर्माच्या आधारे आरक्षण नको, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात प्रामुख्याने सामाजिक मागासवगाँना आरक्षण द्यावे, असे म्हटले आहे. मागासलेली जात (कास्ट) नव्हे तर मागासलेले वर्ग (क्लास) असा शब्द आहे, अशी मांडणी मी केली.

ही बैठक तब्बल साडेतीन तास चालली, शरद पवार यांना आमचे मुद्दे पटले.

त्यांनी तत्कालीन समाजकल्याण सचिव रत्नाकर गायकवाड यांना बोलावले व शब्बीर अन्सारी सांगतात तसा जीआर काढा, असे निर्देश दिले, जात नाही तर वर्ग असा उल्लेख जीआरमध्ये करावा, अशी सूचना मी त्यांना केली. त्यांनी जीआरचा मसुदा तयार केला. तो शरद पवारांसह सर्वांना मान्य झाला. हा जीआर फक्त मुसलमानच नव्हे, तर सर्व धर्मातील ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी उपयोगी ठरला.

‘यापुढे कोणत्याही धर्माचे बंधन न लावता मुस्लिमांसहित जे या प्रवर्गातील भटक्या विमुक्त जाती प्रवर्गात येतात त्यांना सवलती मिळतील’, असे वाक्य या जीआरमध्ये आहे. हा जीआर ७ डिसेंबर १९९४ रोजी जारी करण्यात आला. संपूर्ण भारतात या पद्धतीची वाक्यरचना असलेला हा एकमेव जीआर असावा.

***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील

संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button