फुले, शाहू, आंबेडकर नोंदणी क्र. १५६४९ मुंबई प्रबोधन परिवर्तन महाराष्ट्र नाभिक महामंडळ ( महाराष्ट्र राज्य )

फुले, शाहू, आंबेडकर
नोंदणी क्र. १५६४९ मुंबई
प्रबोधन
परिवर्तन
महाराष्ट्र नाभिक महामंडळ ( महाराष्ट्र राज्य )
महाराष्ट्र नाभिक महामंडळ
* अध्यक्ष : कल्याण दळे
e-mail: kalyanracdale@gmail.com
मुख्य कार्यालय: २५० पोलीस क्वार्टरच्या पाठीमागे, योगेश नगर, अंबड रोड, जालना- ४३१ २०३02482-233773, मो. 9422217911
ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते मा. भुजबळ साहेब यांनी सभेत मांडलेले विचार हे स्थानिक गावापुरते मर्यादित आहेत. कोणीही अर्धवट माहितीच्या आधारे नाभिक बांधवांची दिशाभूल करू नये. आम्ही राज्यातील नाभिक समाज म्हणून आजही ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्याच बाजूने आहोत.
अहमदनगर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ओबीसी, भटके विमुक्त महाएल्गार सभेत उपस्थितांना संबोधित करताना मा. छगन भुजबळ साहेबांनी नाभिक समाजाच्या स्व. कर्पूरी ठाकूर याना भारतरत्न सन्मान मरणोत्तर घोषित झाल्याचा अभिमानास्पद क्षण बोलून दाखवला. त्यानंतर काही ठिकाणी “ओबीसी स्टेट्स ठेवणाऱ्या नाभिक बांधवावर स्थानिक मराठा समाजाच्या व्यक्तींनी व्यावसायिक बहिष्कार टाकला. म्हणून त्या गावातील नाभिक बांधवांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकून त्यांच्या दाढ्या कटिंग करणे बंद करा” असा सल्ला दिला होता.
तो सल्ला ज्या गावात हा प्रकार घडला होता त्याच गावाच्या नाभिक बांधवांना त्यांनी दिला होता. त्याच वेळी मी स्वत : नाभिक समाजाचा प्रतिनिधी म्हणून स्टेजवर उपस्थित होतो. आणि समोरील गर्दीत मोठ्या संख्येने नाभिक बांधव देखील प्रत्यक्ष हजर होते. ते आणि मी या सभेचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत.
असे असतांना कोणीही सभेतील भाषणांचा विपर्यास करून ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात स्वःस्वार्थापोटी खोडा घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याकडे राज्यातील नाभिक बांधवासह, ओबीसी, बारा बलुतेदार बांधवांनी दुर्लक्ष करून आपली वज्रमुठ मजबूत ठेवावी. आणि आपल्या वाट्याची लढाई निःस्वार्थपणे लढणाऱ्या या नेतृत्वाच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे
यापुढे कोणीही उठसुठ ओबीसी नेतृत्व आणि आंदोलनाला बदनाम करणार नाही याची काळजी आता कार्यकर्त्यांनीच घ्यावी.
दिनांक : 06/02/2024
स्वाक्षरीत
कल्याण दळे


