शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी पक्षाने काढलेली मंडल यात्रा ओबीसींसाठी फसवी बंडल यात्रा आहे एकेकाळी वाटत होते पवार साहेब हे फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार आहेत पण आता ते जरांग्याचे साथीदार आहेत ओबीसी नो सावध
.
शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी पक्षाने काढलेली मंडल यात्रा ओबीसींसाठी फसवी बंडल यात्रा आहे एकेकाळी वाटत होते पवार साहेब हे फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार आहेत पण आता ते जरांग्याचे साथीदार आहेत ओबीसी नो सावधान!
https://youtu.be/re1r_DqxplI?si=0qsOVIXPiFL0jnob
! न्याय्य हक्कांसाठी आरक्षण धारक सर्वांनी सर्व आघाड्यांवर लढले पाहिजे —-सत्यशोधक शंकरराव लिंगे
महात्मा फुले समता परिषद, सातारा जिल्ह्याच्या वतीने फलटण येथे ‘न्याय्य हक्क परिषद ‘ संपन्न झाली. तसेच नवीन कार्यकारिणी निवड, नूतन अध्यक्ष डॉक्टर बी. के. यादव यांचा सत्कार संपन्न झाला.
अन्यायाविरुद्ध लढा देणे, जातीय सलोखा राखणे, ओबीसी नेत्यांचे हात बळकट करणे, आरक्षणाचे संरक्षण करणे ,जात निहाय जनगणना करणे, एससी- एसटी- मायनॉरिटी यांसारखे कॉलम जणगणना करून समाजातील पिढीतांना न्याय देणे, त्यांच्या पाठीमागे भक्कम ताकद उभी करणे, कोणावरही अन्याय न करणे, अन्याय करणारांवर जशास तसा हल्ला करणे इत्यादी विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चा झाली .सभेच्या अध्यक्षस्थानी अखिल माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ,महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष ,सत्यशोधक शंकरराव लिंगे होते .
सभेच्या मंचकावर
सत्यशोधक शंकरराव लिंगे-उपाध्यक्ष समता
परिषद महाराष्ट्र, बाळासाहेब शेंडे- चेअरमन श्रीराम सहकारी * फलटण ,डॉ. बी. के. यादव- सातारा जिल्हा अध्यक्ष समता परिषद,श्री. राजेंद्र नेवसे – संघटक समता परिषद महाराष्ट्र प्रदेश,
दशरथ फुले- संपादक महामित्र, बाळासाहेब ननावरे जिल्हाध्यक्ष- माळी महासंघ, प्रा. संपतराव शिंदे- माजी जिल्हाध्यक्ष- महाराष्ट्र माळी महासंघ,बापूसाहेब काशीद- नाभिक समाज- ओबीसी नेते, शाहीर प्रकाश फरांदे- माजी नगरसेवक- सातारा,अमर गायकवाड,सौ. शबाना पठाण,श्री. संतोष ढोक, श्री- बोराटे – माण तालुका,श्री. सुनील रासकर,श्री. राजेंद्र कोरडे,श्री. गिरीष बनकर साहेब,अरविंद राऊत- माजी तालुकाध्यक्ष -अभा माळी महासंघ, श्री. भुजबळ, श्री. नाळे सरपंच मंचकावर उपस्थित होते.तसेच शेकडो समता सैनिक सातारा जिल्ह्यातून उपस्थित होते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना शंकराव लिंगे म्हणाले समता परिषद कोण्या एका जातीची नसून महाराष्ट्रातील 346 जाती ,देशातील मंडल आयोगाने शिफारस केलेल्या 3743 जाती आणि त्यांच्या एक लाख 25 हजार पोट जाती यांचा हा समूह आहे. आणि या सव्वा लाख जाती समूहाचे नेतृत्व माननीय छगनरावजी भुजबळ साहेब करत आहेत .त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. ही सभा त्यांचे हार्दिक अभिनंदन करते. भुजबळ साहेबांनी न्यायालयीन लढाई लढत असताना एक महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने आलेला आहे. त्यामध्ये समीर भुजबळ याचिका कर्ते होते. पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लटकलेली होती . बांठिया आयोगाने आपली 3000 पदे कमी केलेली होती. ती पुन्हा पूर्वत झालेली आहेत. सुप्रीम कोर्टाने 2022 प्रमाणे प्रभाग पद्धतीने आणि 27 टक्के आरक्षण ओबीसींना देऊन निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. त्यावर पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यातच निकाल देऊन तो कायम केला आहे .
दुसरी न्यायालयीन लढाई सत्यशोधक शंकरराव लिंगे आणि अडवोकेट मंगेश ससाणे लढत आहेत . शंकरराव लिंगे यांनी दाखल केलेली याचिका नंबर 34 68/ 2024 आहे. ‘कुणबी मराठा’ किंवा ‘मराठा कुणबी’ हे मागासवर्गीय नाहीत असा 2007 साली छत्रपती संभाजी नगर खंडपीठाचे न्यायाधीश मार्लापल्ले साहेब यांनी निकाल दिलेला आहे. ‘कुणबी मराठा’ किंवा ‘ मराठा कुणबी’ ही राज्यकर्ती जमात असल्यामुळे त्यांना आरक्षण देता येणार नाही. ते मागासवर्गीय नाहीत. खरा कुणबी हा कोकणातला कुणबी आहे. तो डोंगराळ भागात राहतो आणि ते नारायण राणे साहेबांनीही मान्य केलेले आहे . आम्ही 96 कुळी , आम्हाला आरक्षण अजिबात नको असे त्यांनी सांगितले आहे. परंतु काही डमी, मराठा समाजातील स्वार्थी , लोभी, लबाड लोकांनी 2004 चा ‘कुणबी मराठा’ हा कोकणापुरता निघालेला जीआर चा फायदा घेऊन खोटी सर्टिफिकेट आणलेली आहेत .ती लवकरच कोर्टातून रद्द होतील. आता 2023 मध्ये जस्टीस सुक्रे कमिटी, जस्टीस शिंदे, जस्टीस भोसले समिती यांनी केलेल्या शिफारशी आणि त्यानुसार मिळालेले खोटी कुणबी सर्टिफिकेट्स ही कोर्ट ऑफ कंटेम्ट आहेत .कोर्टाचा अपमान आहे.
5 मे 2021 ला सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकार विरुद्ध एडवोकेट जयश्री पाटील यांच्या निकालामध्ये साडेपाचशे पानांचा निकाल देऊन ‘ कुणबी मराठा’ किंवा ‘मराठा कुणबी’ हे मागासवर्गीय नाहीत, मराठा समाज ही राज्यकर्ती जमात आहे हे सिद्ध केलेले आहे.
आमच्या भटक्या ,विमुक्त जाती -जमातीॅकडे एक फूट जागा राहण्यासाठी नाही. त्यांना शासनाच्या कोणत्याही सवलती नाहीत.ज्यांना गरज आहे त्यांना पूर्ण आरक्षण अद्याप मिळालेले नाही .जमीनदार, जागीरदार, वतनदार ,इनामदार , संस्थानिक राजे,आमदार,खासदार ,मंत्री ,मुख्यमंत्री ,देशाचे कृषी मंत्री,अर्थमंत्री ,शिक्षण मंत्री, संरक्षण मंत्री, उपपंतप्रधान, गृहमंत्री ,देशाचे सर्वोच्च राष्ट्रपतीपद हे सुद्धा भूषवले आहे. त्यांच्याकडे सहकारी सोसायटी, सहकारी साखर कारखाने ,दूध डेअरी, सूतगिरण्या,मजूर सोसाट्या ,पाणीपुरवठा सोसायटी, बँका ,पतसंस्था ,गावातील मंदिरांच्या ट्रस्ट, शिक्षण संस्था, बिल्डर ,कॉन्ट्रॅक्टर अशा अनेक लाभाच्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे ते शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास ठरत नाहीत. त्यामुळे त्यांना आरक्षण देऊ नये, असा निकाल चार मे 2021 रोजी लागला असताना सुद्धा परत 2023 मध्ये जस्टीस सुक्रे कमिटी स्थापन करून दिलेले दहा टक्के आरक्षण हे बेकायदेशीर आहे .त्या अगोदर केंद्र सरकारने इडब्ल्यूएस 10 टक्के आरक्षण या सर्व ओपन समाजासाठी दिलेले आहे. ते पुरेसे आहे कारण ओपन समाज 15 टक्के आहे आणि 15 टक्क्याला दहा टक्के आरक्षण म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त आहे. असे सांगून पुढे बोलताना शंकराव लिंगे म्हणाले येणारी जातनिहाय जनगणना ही एससी, एसटी, मायनॉरिटी सारखा एक कॉलम वाढवून ओबीसीची जात निहाय जनगणना झाली पाहिजे. आणि त्याबरोबर सर्व समाजाची जात निहाय जनगणना झाली पाहिजे. ‘जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी’ या न्यायाप्रमाणे शासन प्रशासन मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत, सर्व संस्थांमध्ये ,खाजगी संस्थांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आणि बजेट मधील निधी हा सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणात दिला पाहिजे .
जुनी आठवण करून देताना शंकराव लिंगे म्हणाले चार मे 2018 साली माझ्या डोळ्यांमध्ये सोलापुरला गायकवाड कमिशन पुढे निवेदन देण्यासाठी मी गेलो असता काही मराठा रानटी गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. माझ्या तोंडाला झेरॉक्स ची केमिकल शाई लावून काळे फासले,कपडे फाडले, मारहाण केली .पोलिसांसमोरच ही घटना घडली .माझ्या डोळ्याचे चार ऑपरेशन झाले. आता नजर फक्त पंधरा ते वीस टक्के शिल्लक आहे .जोपर्यंत नजर आहे तोपर्यंत समाजाचं काम करणार असल्याचेही लिंगे यांनी सांगितले. त्यावेळेला जे निवेदन दिले त्या निवेदनाच्या आधारेच डॉक्टर जयश्री पाटील एडवोकेट यांनी महाराष्ट्र सरकार विरुद्ध लढा जिंकून सुप्रीम कोर्टामध्ये 5 मे 2021 रोजी साडेपाचशे पानांचा निकाल लावून ‘कुणबी मराठा’ किंवा ‘मराठा कुणबी’ हे मागासवर्गीय नाहीत हे पुन्हा सिद्ध केले आहे. तरीसुद्धा मतांवर डोळा ठेवून या सरकारने दिलेले 2023 चे 10 टक्के आरक्षण हे बेकादेशीर आहे. त्यासाठी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी हायकोर्टामध्ये याचीकाही दाखल केलेली आहे. पंढरपूरचा जो अनाथ अपंग मुलगा विलास कृष्णा क्षीरसागर याला भर चौकात पंढरपूर तालुक्यातील तारापूर नाला येथे जी फाशी दिलेल्या मराठा समाजाने दिली त्याचीही केस हायकोर्टामध्ये लढत आहे .या सर्व न्यायालयीन लढाई, रस्त्यावरची लढाई आणि विधानभवनातील लढाई सर्वच आघाड्यांवर ओबीसी समाजाच्या नेत्यांनी, आरक्षण धारकांच्या नेत्यांनी ,एससी एसटी समाजातील नेते आणि सर्व जनतेने एकत्र येऊन सर्वांनी हा लढा दिला पाहिजे. शरद पवार यांनी काढलेली मंडल यात्रा ही बंडल यात्रा आहे. त्यांनी मंडल आयोग लागू करताना सहकार क्षेत्रात मंडल आयोग का लागू केला नाही? कारण त्यांचे सगळे सोयरे त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. हा ढोंगीपणा पवार साहेबांनी करू नये .पवार साहेबांचा, रोहित पवारांचा आणि राजेश टोपे यांचा त्यांच्या पक्षाचा जरांगे याला संपूर्णपणे सर्व बाबींमध्ये पाठिंबा आहे .त्यामुळे त्यांच्या यात्रेत ओबीसी समाजाने सामील होऊ नये असे मत सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी ठामपणे व्यक्त केले. संघटने विषयी बोलताना लिंगे पुढे म्हणाले एक जिल्हाध्यक्ष ,दोन उपाध्यक्ष, दोन महासचिव, दोन सचिव ,दोन उपसचिव, एक कोषाध्यक्ष ,प्रसिद्धी प्रमुख आणि जे जाणकार तज्ञ आहेत त्यांना आणि राजकारणामध्ये निपुण आहेत त्यांना संघटनेमध्ये मार्गदर्शक म्हणून घ्यावे. जिल्ह्याची रचना करत असताना शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद गट , पंचायत समिती गण अध्यक्ष आणि त्याचबरोबर त्याच प्रकारच्या महिला अध्यक्ष अशा प्रकारचे संघटन असावे. त्यांची एक पंधरा- पंधरा लोकांची कमिटी असावी. अशा प्रकारचे मार्गदर्शन सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी संघटने विषयी केले. संघटनेचे महत्त्व सविस्तर सांगितले. शेवटी बोलताना लिंगे म्हणाले सर्व सोंगे करता येतात परंतु पैशाचे सोंग करता येत नाही.त्यासाठी उद्योग व्यवसायही सर्वांनी केला पाहिजे. शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय शोधले पाहिजेत. आणि त्या व्यवसायाचं उद्योगाचे ट्रेनिंग या संस्थेमार्फत ठिकठिकाणी शिबिरे घेऊन दिले पाहिजे. कार्यकर्ता ट्रेनिंग दिले पाहिजे .अशा प्रकारचे मेळावे आणि शिबीरे घेऊन लोक- जागृती ,जनजागृती केली पाहिजे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुषांचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे .असा संदेश शंकरराव लिंगे यांनी दिला.
नूतन अध्यक्ष डॉक्टर बि.के. यादव म्हणाले इच्छुक पदाधिकाऱ्यांची नावे आणि त्यांची यादी मंजुरीसाठी वरिष्ठांकडे म्हणजेच माननीय छगनरावजी भुजबळ साहेब ,समीर भाऊ भुजबळ आणि राष्ट्रीय कार्यकारणी यांच्याकडे पाठवले जातील. त्यांच्या मंजुरीनंतर त्यांच्या सहीने सर्व पदाधिकारी यांना पत्र वाटप, पद ग्रहण समारंभ घेऊन दिले जाईल .तालुक्यामध्ये शांती सलोखा ठेवला जाईल .कोणावरही अन्याय केला जाणार नाही आणि अन्याय झाला तर त्याचे प्रत्युत्तर तसेच दिले जाईल .असे सांगून थोड्या दिवसांत संघटनेची व्याप्ती सर्व जिल्हाभर करून सर्व संघटनेने दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही कार्यक्रम राबवण्याचा आटोकाट प्रयत्न करू असे आश्वासन डॉक्टर बी.के .यादव यांनी दिले. या मंचकावरून अनेक नेत्यांची भाषणे झाली त्यांनीही चांगल्या प्रकारचे उद्बोधन, समाजासाठी उपयोगी असे मार्गदर्शन केले. त्या सर्वांचे आभार संघटनेच्या वतीने मानण्यात आले.चहापानानंतर सभेचा कार्यक्रम संपन्न झाला.
दिनबंधू न्यूज
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे,
73 87 37 78 01
हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा. बातमी -व्हिडिओ लाईक करा ,शेअर करा सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा.
वरील प्रमाणे बातमी आपल्या बातमीपत्रात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती.









