सोलापूर

सावित्रीबाई फुले नायगाव स्मारकास 143 कोटी साठ लाख रुपयाचा निधी शासनाची मंजुरी

सावित्रीबाई फुले नायगाव स्मारकास 143 कोटी साठ लाख रुपयाचा निधी शासनाची मंजुरी सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव या ठिकाणी स्मारकांचा विस्तार आणि अध्यापक ट्रेनिंग स्कूलचा विस्तार यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ग्राम विकास मंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनराव भुजबळ साहेब ओबीसी बहुजन विकास मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मागणीवरून घोषणा केली होती त्याचा आज 13 मे रोजी शासन निर्णय होऊन ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांनी आपल्या खात्यामार्फत 143 कोटी 60 लाख रुपयाचा निधी मंजूर केल्याचा शासन निर्णयाचा जीआर प्रसिद्ध त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ जयकुमार गोरे साहेब अतुलजी सावे साहेब आणि छगनरावजी भुजबळ साहेब यांचे यांचे महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्था दिल्ली संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी अभिनंदन करून धन्यवाद दिले आहेत सावित्रीबाई फुले यांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्त नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी त्यांचा ज्या ठिकाणी जन्म झाला ते त्यांचे राहते घर स्मारक म्हणून विकसित करण्यात आले त्याचबरोबर त्या ठिकाणी ट्रेंड शिक्षिका अध्यापन वर्ग ही त्या ठिकाणी डीएडचा कोर्स ही चालू करण्यात आला यामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे चे संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ साहेब यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक या स्मारक उभारणीमध्ये लक्ष घालून मोलाचा वाटा त्या ठिकाणी दिलेला होता महाराष्ट्रातील अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन फुले प्रेमींच्या वतीने अनेक वेळा या स्मारकाची मागणी झालेली होती अशी माहिती सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिली आहे माननीय जयकुमार गोरे साहेब यांच्या ग्रामविकास मंत्रालयाने अतिशय मोलाची कामगिरी बजावत बोले तैसा चाले याप्रमाणे त्यांनी काम केलेली आहेत परवाच चार ऑगस्ट रोजी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची घोषणा हरण मध्ये केलेले होती त्याचीही पूर्तता 13 मे 2025 रोजी शासन निर्णय होऊन त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे आणि आज सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचा विस्तार आणि अध्यापन वर्गाचा विस्तार यासाठी ही त्यांनी वाढीव निधी 10 एकर जागा 143 कोटी 60 लाख रुपयाचा भरगोस निधी मंजूर केल्याबद्दल या ग्रामविकास मंत्रालयाचे आणि जयकुमार गोरे साहेबांचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी गोरे साहेबांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना धन्यवाद दिले आहेत त्यांची जयकुमार गोरे साहेबांची विजयी घोडदौड असे चालू राहावी आणि ओबीसीन बहुजन वर्गांचे सर्व सन्मानाचे कार्य आणि विकासाचे कार्य त्यांच्या हातून मोठ्या प्रमाणात व्हावे हीच निर्मिका प्रार्थना जयज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान धन्यवाद सत्यशोधक शंकराव लिंगे नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग

शासन निर्णय क्रः-स्मारक-२०२५/प्र.क्र. १००, ६-९९३६६६/यो-११

बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ

फोर्ट, मुंबई ४०० ००१

दिनांक : १३ मे, २०२५

संदर्भ:-

(१) जिल्हाधिकारी, सातारा यांचे दि. २८.०१.२०२५ रोजीचे पत्र.

(२) मा. मंत्रिमंडळाच्या दि.२२.०४.२०२५ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त दि.२९.०४.२०२५.

प्रस्तावना:-

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दि.०३ जानेवारी १८३१ रोजी मौजे नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे झाला. सावित्रीबाईंनी लग्नानंतर शिक्षण घेऊन १८४८ मध्ये महात्मा जोतिराव फुलेंनी सुरू केलेल्या पुण्याच्या भिडे वाड्यातील शाळेत पहिल्या शिक्षिका म्हणून आपले शिक्षणाचे कार्य सुरू केले. त्यांच्या या शैक्षणिक कार्यासाठी तत्कालिन व्यवस्थेने प्रचंड विरोध केला. तरीदेखील सावित्रीबाईंनी जिद्दीने आपले कार्य सुरू ठेऊन शिक्षणवृद्धीचा पुरस्कार केला.

२. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन दि.०३ जानेवारी हा “बालिका दिन” म्हणूनही साजरा केला जातो. दि.०३.०१.२०२५ रोजी राज्यशासनामार्फत “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले” यांची जयंती साजरी केली त्यावेळी, आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या अजरामर कार्यासाठी त्यांचे जन्मगाव नायगाव येथे त्यांचे भव्य असे “स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र” उभारण्याची घोषणा मा. मुख्यमंत्री व मा. मंत्री (ग्राम विकास) यांनी केली आहे.

३. त्याअनुषंगाने, जिल्हाधिकारी, सातारा यांनी दि.२८.०१.२०२५ च्या पत्राद्वारे, मौजे नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याबाबतचे रु.१४२.६० कोटी इतक्या रकमेचे अंदाजपत्रक शासनास सादर केले आहे. त्यानुसार मौजे नायगाव ता. खंडाळा जि.सातारा येथे “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र” उभारण्यासाठी ग्रामविकास विभागांतर्गत नवीन योजना सुरू करण्याचे व त्यासाठीचा खर्च भागविण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

शासन निर्णय : –

मौजे नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी ग्राम विकास विभागांतर्गत “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र” ही नवीन योजना राबविण्याfस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे दिन बंधू न्यूज शिवक्रांती देवी संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

 .

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button