🚨 बुलढाणा तालुक्यात अखिल भारतीय माळी महासंघाची तळागाळात मोठी ताकद! दोन ग्रामशाखांची स्थापना; जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण संरक्षण आणि फुले विचारांची गावोगावी जनजागृतीचा निर्धार!

🚨 बुलढाणा तालुक्यात अखिल भारतीय माळी महासंघाची तळागाळात मोठी ताकद! दोन ग्रामशाखांची स्थापना; जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण संरक्षण आणि फुले विचारांची गावोगावी जनजागृतीचा निर्धार!
बुलढाणा तालुक्यात अखिल भारतीय माळी महासंघाच्या संघटन विस्ताराला मोठी गती मिळाली असून दत्तपूर ग्राम शाखा अध्यक्षपदी मा. माधव सिताराम वानेरे आणि साखळी बुद्रुक ग्राम शाखा अध्यक्षपदी मा. विठ्ठल ज्ञानदेव सोनुने यांची नियुक्ती करण्यात आली. ही निवड तालुका अध्यक्ष मा. राजेंद्र पवार, तालुका उपाध्यक्ष मा. रमेश माधवराव उबाळे, महिला आघाडी अध्यक्षा मा. सौ. रुपाली दिलीपराव भोपळे, तालुका सचिव मा. उद्धव जयराम पवार आणि जिल्हा उपाध्यक्ष कर्मचारी आघाडी मा. भानुदास हुडेकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
नवीन शाखाध्यक्षांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, आता गावोगावी, वाडी-वस्तीवर, तांड्यावर आणि पाड्यापाड्यांवर जाऊन जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, या मागणीसाठी व्यापक जनजागृती केली जाईल. ओबीसी समाजावरील अन्यायाविरोधात लढा उभारून ओबीसी आरक्षणाचे संरक्षण, प्रलंबित मागण्यांसाठी जनआंदोलन, तसेच प्रत्येक गावात संघटन मजबूत करण्याचे काम हाती घेतले जाईल.
यासोबतच समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती व रूढी-परंपरांविरोधात प्रबोधन, कौटुंबिक व सामाजिक तंटे मिटविणे, सामाजिक सलोखा निर्माण करणे आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी दोन्ही ग्रामशाखा सक्रियपणे कार्य करतील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती गौरव वर्षानिमित्त त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि शेतकरी हिताचे क्रांतिकारी विचार तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याचेही शाखाध्यक्षांनी सांगितले.
निवडीनंतर अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शंकरराव लिंगे यांच्यासह राष्ट्रीय, प्रदेश, जिल्हा, तालुका आणि महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी दोन्ही नवनियुक्त ग्रामशाखा अध्यक्षांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या निवडीमुळे बुलढाणा तालुक्यात संघटन अधिक बळकट होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
✍️ संपादकीय संदेश
तळागाळातील संघटनच समाजपरिवर्तनाची खरी ताकद असते. ग्रामशाखा सक्षम झाल्या तर सामाजिक न्याय, जातनिहाय जनगणना, ओबीसी हक्कांचे संरक्षण आणि महात्मा फुले यांचे विचार अधिक प्रभावीपणे प्रत्येक घरापर्यंत पोहोचतील. संघटन, शिक्षण आणि जनजागृती हा परिवर्तनाचा एकमेव मार्ग आहे.
📢 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📱 WhatsApp : 7387377801
👉 आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
👉 बातमी लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉरवर्ड, कमेंट करा.
👉 बेल आयकॉन दाबा आणि दिनबंधू न्यूज WhatsApp चॅनल फॉलो करायला विसरू नका.
#दिनबंधून्यूज #शिवक्रांतीटीव्ही #अखिलभारतीयमाळीमहासंघ #बुलढाणा #OBC #जातनिहायजनगणना #ओबीसीआरक्षण #महात्माज्योतिरावफुले #सामाजिकन्याय #जनजागृती #ShankarraoLinge




