सोलापूर

पिंपरी-चिंचवडमध्ये माळी समाज एकीकरणाचा निर्धार; अखिल भारतीय माळी महासंघाच्या शिखर संघटनेखाली एकत्र या – संस्थापक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचा एल्गार!

🚩 पिंपरी-चिंचवडमध्ये माळी समाज एकीकरणाचा निर्धार; अखिल भारतीय माळी महासंघाच्या शिखर संघटनेखाली एकत्र या – संस्थापक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचा एल्गार!

दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

पिंपरी-चिंचवड (दि. १९ जुलै २०२६) – पुणे जिल्ह्यातील बसवेश्वर भवन, पिंपरी-चिंचवड येथे सर्व शाखीय माळी समाज एकीकरण मेळावा मोठ्या उत्साहात आणि समाज एकतेच्या वातावरणात पार पडला. विविध पोटजातींचे समाजबांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि राज्यभरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मेळाव्यास सत्यशोधक अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक सत्यशोधक शंकरराव लिंगे, मा. गुंजकर साहेब, मा. बाळ सराफ सर, मा. काळूराम अण्णा गायकवाड, मा. कल्याण काका आखाडे,  राजेंद् महांडोळे, मा. डॉ. मुरलीधर कुशवाह, मा. सतीशजी शिंदे, मा. प्रशांतजी डोके,  मा. रतन माळी सर, मा. मृणाल ढोले, मा. निलेश गिरमे, मा. ॲड. मंगेश ससाणे, मा. , मा. सुरेश जाधव सर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन मा. परमेश्वर बनकर, मा. शरद रासकर, मा. अनंत शेवाळे, मा. सीमाताई एकतपुरे, मा. अशोक एकतपुरे, मा. अमोल पल्हाडे, मा. रमेश नावकर, मा. नवनाथ होले, मा. लहू अनारसे, मा. कांताताई जाधव, मा. अमोल बनकर, मा. लताताई शिंदे, मा. स्वप्नील भुजबळ आणि मा. कांतीलाल माळी यांनी केले.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अखंडाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी डॉ. मुरलीधर महाजन होते. प्रास्ताविक शरद रासकर यांनी केले, तर सूत्रसंचालन सीमा एकतपुरे व परमेश्वर बनकर यांनी केले.

“अखिल भारतीय माळी महासंघ ही कार्यकर्ते घडविणारी फॅक्टरी आहे”

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सत्यशोधक शंकरराव लिंगे म्हणाले,

“गेल्या २६ वर्षांत अखिल भारतीय माळी महासंघाने हजारो कार्यकर्ते घडवले आहेत. आज हेच कार्यकर्ते विविध राजकीय पक्षांमध्ये, सामाजिक संघटनांमध्ये आणि सार्वजनिक जीवनात नेतृत्व करताना दिसत आहेत. ही महासंघाची समाजाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे.”

स्थापना २००० मध्ये; अधिकृत नोंदणी २००३ मध्ये

लिंगे यांनी महासंघाच्या स्थापनेचा इतिहास सांगताना स्पष्ट केले की, १९ जुलै २००० रोजी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र, अरण येथे अखिल भारतीय माळी महासंघाची स्थापना करण्यात आली.

स्थापनेनंतर संघटनेच्या नोंदणीची जबाबदारी धुळे येथील काही प्राध्यापक, वकील, शिक्षक आणि सुशिक्षित अति विद्वान  कार्यकर्त्यांनी स्वीकारली. मात्र दोन वर्षे ही संघटनेची नोंदणी झाली नाही.

त्यानंतर पुण्यातील काही विद्वान प्राध्यापक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी नोंदणी करून देण्याची जबाबदारी घेतली. मात्र पुढील तीन वर्षांतही नोंदणी पूर्ण झाली नाही.

ही परिस्थिती पाहून सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी स्वतः सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. आवश्यक कागदपत्रे, कायदेशीर प्रक्रिया आणि सर्व औपचारिकता पूर्ण करून सन २००३ मध्ये “अखिल भारतीय माळी महासंघ” या नावाने संघटनेची अधिकृत नोंदणी करून घेतली.

धर्मादाय आयुक्त कार्यालयाने “महा/१३३/०३, सोलापूर” या नोंदणी क्रमांकासह संघटनेची अधिकृत नोंदणी मंजूर केली. संस्थापक म्हणून सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचे नाव प्रथम क्रमांकावर नोंदविण्यात आले असून, त्यावर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. याचा अभिमान असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

“एकीकरण हवे असेल तर महासंघालाच शिखर संघटना मान्यता द्या”

लिंगे म्हणाले की,

“अखिल भारतीय .माळी महासंघ ही गुजरातपासून गुवाहाटीपर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कार्य करणारी राष्ट्रीय स्तरावरील संघटना आहे. जर माळी समाजाचे खरे एकीकरण करायचे असेल, तर सर्व संघटनांनी महासंघाला शिखर संघटना म्हणून मान्यता द्यावी. समाजाच्या आंदोलनांची दिशा, शासनाकडे करावयाच्या मागण्या आणि समाजहिताचे निर्णय याच व्यासपीठावरून घेतले गेले पाहिजेत.”

स्वयंघोषित नेत्यांवर सडकून टीका

लिंगे यांनी समाजातील स्वयंघोषित नेतृत्वावरही टीका करत म्हटले,

“समाजात सत्यशोधक विचारांचे नेतृत्व निर्माण झाले पाहिजे. समाजाच्या नावावर स्वतःची प्रतिमा उभी करणारे, दलाली करणारे, पावसाळी छत्रीसारखे हंगामी स्वार्थी दुकानदार स्वयंघोषित  नेते समाजाचे नुकसान करत आहेत. अशा प्रवृत्तींना समाजाने खड्यासारखे बाजूला फेकले पाहिजे.” त्यांना धडा शिकवला पाहिजे

३० गुंठे जागेवर उभारणार भव्य समाजभवन

यावेळी त्यांनी मोठी घोषणा करत सांगितले की, संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र, अरण येथे स्वतःची ३० गुंठे जागा समाजाच्या ट्रस्टला दान दिली असून, त्याच ठिकाणी भव्य समाजभवन उभारण्यात येणार आहे.

या भवनातून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक प्रशिक्षण, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, संत सावता महाराज आणि सत्यशोधक विचारांचा प्रचार-प्रसार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वी अरण येथे आठ सामुदायिक विवाह सोहळे, वधू-वर मेळावे, गुणवंत विद्यार्थी सत्कार, स्थापना मेळावे, वर्धापन दिन, उपोषणे, आंदोलने आणि शेकडो समाजोपयोगी कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करून अरणचे नाव राज्यासह देशभर पोहोचविल्याचेही त्यांनी नमूद केले.

📢 संपादकीय संदेश

समाजाच्या एकीकरणासाठी सक्षम नेतृत्व, विचारांची स्पष्ट दिशा आणि मजबूत संघटनाशक्ती आवश्यक आहे. माळी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकजूट हाच एकमेव पर्याय आहे.

📰 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
✍️ संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

📱 ७३ ८७ ३७ ७८ ०१ हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
👍 बातमी लाईक करा | 🔁 शेअर करा | ▶️ सबस्क्राईब करा | 📤 फॉरवर्ड करा | 💬 कमेंट करा | 🔔 बेल आयकॉन दाबा
📢 दिनबंधू न्यूज WhatsApp चॅनेल फॉलो करायला विसरू नका!

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button