💐 अखिल भारतीय माळी महासंघाची संघटनात्मक ताकद वाढली; बुलढाणा जिल्ह्यात दोन महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या, समाजकार्याला मिळणार नवी दिशा!

💐 अखिल भारतीय माळी महासंघाची संघटनात्मक ताकद वाढली; बुलढाणा जिल्ह्यात दोन महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या, समाजकार्याला मिळणार नवी दिशा!
अखिल भारतीय माळी महासंघाने संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने बुलढाणा जिल्ह्यात दोन महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. मा. विष्णु किसनराव भोपळे (मु.पो. कोलवड, ता. जि. बुलढाणा) यांची कोलवड ग्राम शाखा अध्यक्ष म्हणून तर मा. दिलीप रामेश्वर बोबडे (मु.पो. काकनवाडा बु., ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) यांची बुलढाणा जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मा. विष्णु किसनराव भोपळे यांची नियुक्ती मा. विजय राजाभाऊ खरात (बुलढाणा जिल्हाध्यक्ष) व मा. राजेंद्र पवार (बुलढाणा तालुका अध्यक्ष) यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
मा. दिलीप रामेश्वर बोबडे यांची नियुक्ती मा. शरदभाऊ बनकर (अमरावती विभाग अध्यक्ष) व मा. विष्णुभाऊ इंगळे (बुलढाणा जिल्हाध्यक्ष – घाटाखालील) यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
या नियुक्तीबद्दल खालील मान्यवरांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या:
मा. शंकरराव लिंगे – राष्ट्रीय अध्यक्ष
मा. रमेशभाऊ हिरळकार – विश्वस्त तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष
मा. गौतमजी क्षिरसागर – महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
मा. अभय तायडे – राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य
मा. डॉ. गजाननजी अजगर – प्रदेश संघटक, डॉक्टर आघाडी
मा. शरदजी बनकर – अमरावती विभाग अध्यक्ष
मा. सौ. प्रिती विशाल खंडारे – बुलढाणा जिल्हाध्यक्षा (घाटावरील)
मा. रामभाऊ अवचार – चिखली तालुका अध्यक्ष, किसान आघाडी
मा. रमेश माधवराव उबाळे – बुलढाणा तालुका उपाध्यक्ष
मा. उद्धव जयराम पवार – बुलढाणा तालुका सचिव
मा. हारीभाऊ नामदेवराव राजनकर – बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी मार्गदर्शक
मा. नानासाहेब पाटील – जिल्हा संघटक (घाटाखालील)
मा. सरला ताई काळे – जिल्हाध्यक्षा, महिला आघाडी
मा. साहेबराव बोदडे – बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष (घाटाखालील)
मा. विलास तुकाराम मसने – बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष (घाटाखालील)
मा. संजय नारायण दाते – बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी सदस्य
मा. विलास तुळशीराम खाडे – नांदुरा तालुका अध्यक्ष
मा. विजय निनाजी सातव – जळगाव जामोद तालुका अध्यक्ष
मा. गणेश महेश वानखडे – संग्रामपूर तालुका अध्यक्ष
मा. मुकुंदा माळी – मोताळा तालुका अध्यक्ष
मा. गणेश जनार्दन बोबडे – खामगाव तालुका अध्यक्ष
महासंघाच्या या नियुक्त्यांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळणार असून समाजहिताची चळवळ अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी नव्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे.
🖋️ संपादकीय संदेश
पद हा सन्मान नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक एकजूट, समाजहित आणि महात्मा फुले यांच्या समता-बंधुतेच्या विचारांचा वारसा पुढे नेत निस्वार्थ सेवेतून आदर्श निर्माण करावा. अखिल भारतीय माळी महासंघाच्या या दोन्ही पदाधिकाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🌼






