बुलढाण्यात अखिल भारतीय माळी महासंघाची वादळी घोडदौड!

🚨🔥 बुलढाण्यात अखिल भारतीय माळी महासंघाची वादळी घोडदौड! महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सरला काळे यांची निवड; व बुलढाणा जिल्हा घाटाखालचा विभाग उपाध्यक्षपदी तुकाराम मसने यांची निवड! जातनिहाय जनगणना, ओबीसी हक्क आणि जनजागृतीसाठी गावागावात उभारणार निर्णायक लढा! 🔥🚨
बुलढाणा जिल्ह्यात अखिल भारतीय माळी महासंघाची संघटनात्मक ताकद दिवसेंदिवस वाढत असून ओबीसी हक्क, जातनिहाय जनगणना आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर संघटना अधिक आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर सौ. सरला चंद्रशेखर काळे (शेगाव) यांची बुलढाणा जिल्हा अध्यक्षा, महिला आघाडी (घाटाखालील विभाग) या महत्त्वपूर्ण पदावर निवड करण्यात आली आहे.
सरला काळे या सावित्री जोती महिला मंच व बहुजन समाज महिला मंच, शेगाव यांच्या अध्यक्षा असून समाजातील अनिष्ट रूढी, चालीरीती व महिलांवरील अन्यायाविरोधात सातत्याने कार्यरत आहेत. विधवा महिलांना सन्मानाने जगता यावे, महिलांमध्ये सामाजिक जागृती निर्माण व्हावी आणि समतेची मूल्ये रुजावीत यासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल सत्यशोधक शंकरराव लिंगे (संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष), रमेशभाऊ हिरळकार (राष्ट्रीय कार्याध्यक्ष), विठ्ठल आबा तोडकर राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयजी तायडे, राष्ट्रीय सदस्य गौतमजी क्षीरसागर, प्रदेश अध्यक्ष जनाबापू मेहेत्रे, शरदजी बनकर, विष्णुभाऊ इंगळे, विजय राजाभाऊ खरात, गजानन हिरळकार, साहेबराव बोदडे, विलास मसने, प्रा. दीपक नन्हई, नानासाहेब पाटील आणि भानुदास हुडेकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याचबरोबर यापूर्वी विलास तुकाराम मसने यांची बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष (घाटाखालील विभाग) म्हणून झालेल्या निवडीमुळे जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळाले आहे.
अखिल भारतीय माळी महासंघ सध्या बुलढाणा जिल्ह्यात गावागावात जाऊन जातनिहाय जनगणना का आवश्यक आहे, ओबीसी समाजावरील अन्याय-अत्याचार, प्रलंबित मागण्या, तसेच सामाजिक व घटनात्मक हक्कांबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवत आहे. ग्रामपंचायतींकडून जातनिहाय जनगणनेच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविणे, तहसीलदारांना निवेदने देणे आणि प्रत्येक गावात संघटन मजबूत करणे या मोहिमेला वेग आला आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून जिल्हाभर ओबीसी प्रश्नांवर व्यापक जनआंदोलनाची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
✍️ संपादकीय संदेश
संघटना केवळ मजबूत होत नाही , तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विचार पोहोचविणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे मजबूत होते. जातनिहाय जनगणना, सामाजिक न्याय आणि ओबीसींचे घटनात्मक हक्क या विषयांवर लोकजागृती ही काळाची गरज आहे. लोकशाही मार्गाने संघटित जनआंदोलन उभे राहिल्यास सामाजिक न्यायाची लढाई अधिक प्रभावी होऊ शकते.
📱 आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडा : 7387377801
👍 बातमी लाईक करा | 🔁 शेअर करा | ▶️ सबस्क्राईब करा | 📤 फॉरवर्ड करा | 💬 कॉमेंट करा | 🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
🟢 दिनबंधू न्यूज व्हॉट्सअॅप चॅनेल फॉलो करा आणि समाजहिताच्या बातम्या सर्वप्रथम मिळवा.
#दिनबंधू_न्यूज #शिवक्रांतीटीव्ही #सत्यशोधक_शंकरराव_लिंगे #अखिलभारतीयमाळीमहासंघ #बुलढाणा #ओबीसी #जातनिहायजनगणना #सामाजिकन्याय #महिलाआघाडी #सरलाकाळे #विलासमसने #OBCRights #SocialJustice #MaliMahasangh





