ओबीसींच्या प्रलंबित प्रश्नांवर मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक 📍 मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत शिक्षण, वसतीगृह, महाज्योती व आरक्षण विषयांवर सविस्तर चर्चा

🚨 ओबीसींच्या प्रलंबित प्रश्नांवर मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक
📍 मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत शिक्षण, वसतीगृह, महाज्योती व आरक्षण विषयांवर सविस्तर चर्चा
ओबीसींच्या प्रलंबित प्रश्नांवर मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक
📍 मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत शिक्षण, वसतीगृह, महाज्योती व आरक्षण विषयांवर सविस्तर चर्चा
मुंबई मंत्रालय येथे राज्यातील ओबीसी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे महसूल मंत्री तथा समितीचे अध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत १० व १६ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या निर्णयांवरील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर इतर मागास आर्थिक विकास महामंडळासाठी विविध योजना राबविणे, जिल्हास्तरावर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृहे उभारणे, महाज्योतीच्या प्रादेशिक कार्यालयांसाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच आवश्यक निधी व पदमान्यता देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
विभागीय स्तरावरील कार्यालयांच्या बांधकामासाठी दरवर्षी किमान ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला. तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेतील लाभार्थ्यांची संख्या वाढविणे, महाज्योतीच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संचालक मंडळ नियुक्त्या करणे आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी प्रशिक्षणासाठी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे शासकीय जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
पुणे येथील शिवाजीनगर परिसरात महाज्योतीसाठी सारथीच्या धर्तीवर प्रादेशिक कार्यालय, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्र, अद्ययावत ग्रंथालय आणि निवासी वसतीगृह उभारण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली. नाशिक येथील मेरी परिसरातील जागेवर महाज्योतीच्या प्रादेशिक कार्यालयाचे बांधकाम सुरू करण्याबाबतही चर्चा झाली.
राज्यात २७ टक्के आरक्षण असूनही सरकारी सेवेत ओबीसींचे प्रमाण केवळ ९.५० टक्के असल्याबाबत अद्ययावत माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त महाज्योतीमार्फत विविध योजना राबविण्याबाबतही चर्चा झाली.
या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब वनमंत्री श्री. गणेश नाईक, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री. अतुल सावे, पाणीपुरवठा मंत्री श्री. गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण मंत्री श्री. संजय राठोड यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
━━━━━━━━━━━━━━━
📢 सोशल मीडिया सूचना
📰 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
✍️ संपादक : सत्यशोधक शंकराव लिंगे
📲 73 87 37 78 01
👉 हा नंबर आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये Add करा
👍 बातमी Like करा
📤 Share / Forward करा
💬 Comment करा
🔔 Bell Icon दाबा
📺 YouTube Channel Subscribe करा
🟢 दिनबंधू न्यूज WhatsApp Channel व Group ला Follow करायला विसरू नका!
#OBC #Mahajyoti #ChhaganBhujbal #MumbaiMantralaya #OBCReservation #DinbandhuNews #ShivkrantiTV #ShankarraoLinge #MahatmaPhule200 #SocialJustice #MaharashtraPolitics



