हात्मा फुले विचारांचा सन्मान म्हणजे सामाजिक समतेच्या भारताला नवी दिशा!” 🌼🚆

🚆🌼 “महात्मा फुले विचारांचा सन्मान म्हणजे सामाजिक समतेच्या भारताला नवी दिशा!” 🌼🚆
महात्मा फुले गौरव वर्षानिमित्त रेल्वेमंत्रींकडे विविध उपक्रमांची मागणी
दिल्ली : महात्मा फुले यांच्या आगामी 200 व्या जयंतीनिमित्त “महात्मा फुले गौरव वर्ष” देशभरात प्रेरणादायी पद्धतीने साजरे करण्यात यावे तसेच भारतीय रेल्वेच्या माध्यमातून विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात यावेत, या मागणीसाठी महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थान, दिल्ली यांच्या शिष्टमंडळाने रेल्वे राज्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री नरेंद्र बाबू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांची नावे देण्यात यावीत, रेल्वे स्थानकांवर त्यांच्या प्रतिमा लावण्यात याव्यात तसेच रेल्वेच्या पिलरवर त्यांच्या कार्याचे दर्शन घडविणाऱ्या कलाकृती साकारण्यात याव्यात, अशी मागणी केली.
याशिवाय दिल्लीतील एखाद्या मेट्रो स्टेशनला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे, महात्मा फुले गौरव वर्षानिमित्त विशेष रेल्वे जनजागृती मोहीम, प्रदर्शने, व्याख्यानमाला आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली.
मंत्री महोदयांनी मागण्यांची सकारात्मक दखल घेत तात्काळ आवश्यक कार्यवाहीसाठी आपल्या सचिवांना निर्देश दिले.
यावेळी प्रतिनिधी मंडळाकडून मंत्री महोदयांना “शिक्षा इशारा परिचय सम्मेलन” स्मरणिका व निवेदन देण्यात आले. शाल व संस्थेची प्रतीकात्मक पट्टीका देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी आमदार बेंगळुरू श्री नरेंद्र बाबू यांचाही शाल देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रतिनिधी मंडळात माजी महासचिव रामनारायण चौहान, महासचिव आर. पी. सैनी, कोषाध्यक्ष जी. एल. सैनी, सचिव शिवराज सैनी, सदस्य नवीन सैनी, राजू सैनी व सचिन सैनी यांचा समावेश होता. अशी माहिती महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी दिली
📺 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
✍️ संपादक : सत्यशोधक शंकराव लिंगे
📞 73 87 37 78 01
👉 बातमी लाईक करा
👉 शेअर करा
👉 सबस्क्राईब करा
👉 फॉरवर्ड करा
👉 कॉमेंट करा
👉 बेल आयकॉन दाबा
👉 दिनबंधू न्यूज WhatsApp ग्रुप व चॅनलला फॉलो करायला विसरू नका!
#महात्मा_फुले_गौरव_वर्ष
#महात्मा_फुले_200वी_जयंती
#सावित्रीबाई_फुले
#RailwayMinister
#VSomanna
#MahatmaPhule
#SavitribaiPhule
#दिनबंधू_न्यूज
#शिवक्रांती_टीव्ही
#सत्यशोधक_शंकराव_लिंगे
#PhuleIdeology
#SocialJustice
#IndianRailways





