🔥 “जातनिहाय जनगणना करा, फुले गौरवाचा अपमान सहन होणार नाही!” – सोलापुरातून शासनाला थेट इशारा 🔥

🔥 “जातनिहाय जनगणना करा, फुले गौरवाचा अपमान सहन होणार नाही!” – सोलापुरातून शासनाला थेट इशारा 🔥
सोलापूर : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199 व्या जयंतीनिमित्त सोलापूर येथील सुपर मार्केटमधील पुतळ्यास राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण भोसले, शेखर बंगाळे, अप्पाराव हाके, लक्ष्मीकांत शिवणगी, संदीप धायगुडे, बंडू बंगाळे यांच्यासह शेकडो फुलेप्रेमी उपस्थित होते, सकाळपासूनच पुतळा परिसरात प्रचंड गर्दी उसळली होती ज्यामध्ये काँग्रेस, भाजपसह विविध पक्ष, नूतन महापौर, भीमसैनिक, समता सैनिक, ओबीसी संघटना, भटक्या-विमुक्त संघटना अशा तब्बल 125 संघटनांनी अभिवादन करून फुले विचारांचा जयघोष केला, महानगरपालिकेच्या छोट्याशा मंडपाबाहेरही नागरिक उन्हात उभे राहून सहभागी झाले, देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही अभिवादन करून फुले गौरव वर्षाची सुरुवात झाल्याचे अधोरेखित झाले.
यावेळी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी सोलापुरात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा नसल्याची तीव्र खंत व्यक्त करत महात्मा फुले पुतळ्याची दयनीय अवस्था, अस्वच्छ परिसर, स्मारकाचा अभाव यावर संताप व्यक्त केला आणि 200 व्या गौरव वर्षानिमित्त सोलापुरात महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारून भव्य स्मारक व शुशोभीकरण करण्याची मागणी केली तसेच जुना पुना नाका छत्रपती संभाजी चौक, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय पटांगण किंवा विजापूर रोड रेल्वे पूल परिसरात योग्य जागा निश्चित करण्याची मागणी केली.
यासोबतच देशातील सर्व जिल्हे व राजधानी ठिकाणी फुले दांपत्यांचे पुतळे व स्मारके उभारावीत, महत्त्वाच्या रस्ते, चौक, ठिकाणे, रेल्वे स्टेशन व विमानतळांना महात्मा फुले यांचे नाव द्यावे अशी जोरदार मागणी करत त्यांनी स्पष्ट केले की महात्मा फुले यांनी रेल्वे उभारणीत खडी, चुना व मजूर पुरवण्याचे मोठे योगदान दिले होते तसेच मुंबईतील रेल्वे स्टेशन उभारणीत त्यांच्या कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या भागीदारांचा सहभाग होता, त्यामुळे त्यांचा सन्मान म्हणून रेल्वे स्टेशनना त्यांचे नाव देणे ही ऐतिहासिक न्यायाची बाब आहे.
पुढे मुंबईत महात्मा फुले यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक व अत्याधुनिक ग्रंथालय उभारावे कारण महात्मा फुले हे महान लेखक, वाचक व विचारवंत होते, त्यांनी थॉमस पेन यांच्या “राइट्स ऑफ मॅन” या जागतिक दर्जाच्या ग्रंथातून प्रेरणा घेऊन समाजसुधारक कार्याची दिशा ठरवली होती, त्यामुळे त्यांच्या साहित्यिक व बौद्धिक वारशाचा जागतिक स्तरावर गौरव व्हावा अशी मागणी करण्यात आली, त्याचबरोबर फुलेवाडा व नायगाव स्मारक विस्तार, भिडे वाडा स्मारक तात्काळ जनतेस खुले करणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा लोगो बदलणे, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न व जागतिक पुरस्कार देणे, नव्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराची निर्मिती करणे अशा मागण्या ठामपणे मांडण्यात आल्या.
शिक्षण केजी ते पीजी मोफत, आरोग्य सेवा मोफत, शेतकऱ्यांना कर्ज, वीज, पाणी, खते, बियाणे मोफत देणे तसेच सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी ठोस धोरण राबवावे अशी मागणी करत त्यांनी महत्त्वाचा ऐतिहासिक संदर्भ देत सांगितले की महात्मा फुले यांनी 1869 मध्ये जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती त्यानंतर 1871 मध्ये ट्रायल बेसिसवर जातनिहाय जनगणना झाली आणि 1881 पासून पुढे सातत्याने जातनिहाय जनगणना करण्यात आली होती, त्यामुळे महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी गौरव वर्षानिमित्त आता होणारी जनगणना ही जातनिहायच झाली पाहिजे अशी ठाम मागणी करत “जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी” या तत्वानुसार सर्वांना न्याय्य हक्क देण्याचा इशारा शासनाला देण्यात आला, त्यामुळे सोलापुरातील हा कार्यक्रम केवळ अभिवादनापुरता मर्यादित न राहता थेट हक्कांच्या लढ्याचा बिगुल ठरला.
📢 सोशल मीडिया संदेश:
सोलापुरातून उठला फुले विचारांचा ज्वालामुखी — आता जातनिहाय जनगणना आणि समतेसाठी निर्णायक लढा! ✊
📲 सोशल मीडिया सूचना:
दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक – सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01
👉 हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा
👍 लाईक करा | 🔁 शेअर करा | 📩 फॉरवर्ड करा
💬 कॉमेंट करा | 🔔 बेल आयकॉन दाबा | Subscribe करा
🔥 हॅशटॅग्स:
#महात्माफुले #फुलेगौरववर्ष #जातजनगणना #OBCआंदोलन #समता #सोलापूर #फुलेविचार #जयज्योती #जयक्रांती #जयभीम #DinbandhuNews #ShivkrantiTV









