सोलापूर

प्रॉपर्टी हडपण्याची पार्श्वभूमी, सातत्याने धमक्या व हल्ले — Attempt to Murder प्रकरणे असूनही आरोपी मोकाट!

: 🚨 SUPER BREAKING | यवतमाळ – आर्णी 🚨
प्रॉपर्टी हडपण्याची पार्श्वभूमी, सातत्याने धमक्या व हल्ले — Attempt to Murder प्रकरणे असूनही आरोपी मोकाट!
पीडित अनाथ कुटुंबाला तात्काळ पोलिस संरक्षण देण्याची जोरदार मागणी

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात राहणाऱ्या जया शंकरराव घोसे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक तसेच जिल्हा अधिकारी प्रशासनाकडे गंभीर स्वरूपाची लेखी तक्रार पुराव्यासह दाखल केली आहे. तक्रारीनुसार सराईत गुन्हेगार सागर शामनाथ खंडागळे व त्याचे नातेवाईक गेल्या अनेक वर्षांपासून पीडित कुटुंबास सातत्याने धमक्या देत असून मारहाण, शिवीगाळ, सर्व तक्रारी कोर्टातील केसेस माघारी घेण्यासाठी दबाव टाकणे व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे २०२० ते २०२५ या कालावधीत संबंधित आरोपींविरोधात Attempt to Murder (IPC 307) सह धमकी, मारहाण, शिवीगाळ, दहशत निर्माण करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही प्रकरणांमध्ये NCR व FIR नोंद असूनही आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही गुन्ह्यांत जामीन मंजूर झाला असला तरी त्यानंतरही पीडित कुटुंबावर दबाव, धमक्या व जीवितास धोका कायम असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

पीडित कुटुंबीयांनी आपत्कालीन 112 क्रमांकावर संपर्क साधूनही वेळेवर मदत मिळाली नाही, असा गंभीर आरोप तक्रारीत केला आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये बनावट रिपोर्टिंग, चुकीची नोंद व आरोपींच्या पाठराखणीचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही वेळा पीडितांवरच खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात राजू शंकर घोसे, सिया शंकर घोसे जया शंकर घोसे, माया शंकर घोसे तसेच एक दृष्टीहीन बंडूभाऊ शंकर .घोसे थोरला भाऊ असे संपूर्ण कुटुंब भयग्रस्त अवस्थेत आहे. आई-वडील वारल्यामुळे हे कुटुंब पूर्णपणे अनाथ झाले असून कोणताही सामाजिक किंवा प्रशासकीय आधार नसल्याची स्थिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. “भीक नको, पण कुत्र . आवरा अशी अवस्था आमच्यावर आली असल्याची हतबल भावना पीडितांनी व्यक्त केली आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी स्वतः लक्ष घालून पीडित कुटुंबीयांना धीर देत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अनाथ घोसे कुटुंबीय सध्या प्रचंड भयभीत असून कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशाराही तक्रारीत देण्यात आला आहे.

पीडित कुटुंबाची प्रमुख मागणी आहे की —
✔️ आरोपींचा जामीन तात्काळ रद्द करावा
✔️ सर्व प्रलंबित गुन्ह्यांचा निष्पक्ष व जलद तपास करावा
✔️ आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करावी
✔️ पीडित कुटुंबाला तात्काळ व कायमस्वरूपी पोलिस संरक्षण द्यावे

अन्यथा गाव सोडण्याची वेळ येईल, अशी अत्यंत गंभीर बाब तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.

📣 सोशल मीडिया संदेश :
न्यायासाठी एकत्र उभे राहा!
Attempt to Murder प्रकरणांनंतरही आरोपी मोकाट असणे हे कायद्याच्या अपयशाचे लक्षण आहे. अनाथ पीडित कुटुंबाला तात्काळ पोलिस संरक्षण द्या, आरोपींवर कठोर कारवाई करा.
👉 ही बातमी LIKE करा, SHARE करा, FORWARD करा
👉 प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आवाज बुलंद करा!

📲 संपर्क / व्हॉट्सॲप : 7387377801

📰 दिनबंधू न्यूज
✍️ संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

🔖 हॅशटॅग
# मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
#SuperBreaking
#यवतमाळ
#आर्णी
#AttemptToMurder
#कायदा_सुव्यवस्था
#पोलीस_अपयश
#न्याय_मिळालाच_पाहिजे
#पीडित_कुटुंब
#अनाथ_कुटुंब
#पोलिस_संरक्षण_द्या
#गुन्हेगार_मोकाट
#जामीन_रद्द_करा
#कडक_कारवाई_हवी
#JusticeForGhoseFamily
#LawAndOrder
#VoiceForVictims
#DinbandhuNews
#सत्यशोधक_शंकरराव लिंगे

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button