महाराष्ट्र

बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा – छगनरावजी भुजबळांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद जीआर विरोधात निर्णायक लढा 1

  • बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा – छगनरावजी भुजबळांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद जीआर विरोधात निर्णायक लढा

बीड / प्रतिनिधी

ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि आरक्षण टिकवण्यासाठी बीडमध्ये ऐतिहासिक ओबीसी महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवार, दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता, बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे.

या मेळाव्याचे नेतृत्व कॅबिनेट मंत्री तथा ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते ना. छगनराव भुजबळ साहेब करतील. या वेळी राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे साहेब, माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, धनगर समाजाचे नेते आमदार आ. गोपीचंद पडळकर, मा. प्रकाश अण्णा शेंडगे, मुस्लिम समाजाचे नेते शब्बीर अन्सारी, ज्येष्ठ साहित्यिक तथा भटक्या विमुक्त समाजाचे नेते लक्ष्मणराव गायकवाड, वंजारी समाजाचे नेते सत्संग मुंडे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

हैदराबाद गॅझेटवरील जीआरमुळे मराठा समाजाला कृत्रिमरित्या ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा होत असून त्यातून खऱ्या ओबीसी बांधवांचे आरक्षण धोक्यात येणार आहे. या अन्यायाविरोधात आणि ओबीसींच्या न्याय हक्कासाठी हा मेळावा निर्णायक ठरणार आहे.

ओबीसी बांधव, भगिनी, युवक, युवती, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी लाखोंच्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ॲड. सुभाष राऊत, तसेच प्रदेश उपाध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे व सोलापूर जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब भंडारे यांनी केले आहे.

चौकट : मेळाव्याची तयारी पूर्णत्वाकडे

छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणाच्या प्रांगणात ७५ हजार स्क्वेअर फुटाचा भव्य डोम उभारण्यात आला आहे.

पावसाचा अंदाज लक्षात घेता ५० हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे.

प्रत्येक बांधव-भगिनींसाठी नाष्टा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध.

बीड शहरात ठिकठिकाणी “एकच पर्व – ओबीसी सर्व!” असे घोषवाक्य असलेले झेंडे, बॅनर्स आणि पोस्टर लावण्यात आले आहेत.

मेळाव्याची जय्यत तयारी पूर्णत्वाकडे गेली असून, बीडमध्ये ओबीसी समाजाचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button