गवंडगाव-सुरेगाव, ता. येवला : अतिवृष्टीचा प्रचंड तडाखा – शेतकरी बांधवांचे पीक जळून नष्ट, शासन तातडीने मदतीस सज्ज!

आपल्या येवला तालुक्यातील गवंडगाव व सुरेगाव भागातील शेतकऱ्यांचे २३ सप्टेंबरच्या ढगफुटी व अतिवृष्टीमुळे मका, सोयाबीन, कांदा, टोमॅटो, भाजीपाला तसेच द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काढणीला आलेले, जोमात असलेले पीक पावसामुळे हाताचे गेले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतकरी बांधव अत्यंत हवालदिल असून काहींनी आपल्या व्यथा सांगताना अक्षरशः रडू कोसळले. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झालेल्या भागात प्राधान्याने अन्नधान्याचे वाटप केले जात आहे. गरज असल्यास वैद्यकीय मदत, तात्पुरता निवारा तसेच पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविणे या सर्व उपाययोजना देखील शासनकडून तातडीने केली जात आहेत. शेतकरी बांधवांना धीर देत सरकार ठामपणे उभे असून अडचणीचे नियम बाजूला ठेवून शक्य तितकी मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे.
#FloodRelief #FarmerSupport #CropDamage #DisasterResponse #StandingWithFarmers #EmergencyRelief
दिनबंधू न्यूज – संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
73 87 37 786
लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा | फॉरवर्ड करा | कमेंट करा | बेल आयकॉन दाबा







