जय कांती जय ज्योती

जय कांती
जय ज्योती
सत्यशोधक विधी श्रावण देवरे दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे
धाका विर्माण करतात, परंतु या परंपरा अनादि काल्यच्या नाहीत. मानव विकासाच्या प्रक्रियेत कोण्पुपात्या तरी एका टप्प्यावर या परंपरा सुरू करण्यात आल्यात. त्या जशी जन्माला आल्पात, तशा त्या विशिष्ट काळानंतर मेल्याही पाहिजेत. जुनी मेल्याशिवाय नवी कशी येईल? घरातील जुने फर्निचर भंगारमध्ये टाकल्यानंतरच नवे फॉर्मवर येत असते. स्वयंपाकघरात भाज्या ठेवण्यासाठी आधी लाकडी कपाट वापरले जात होते. फ्रीज आला आणि ते लाकडी कपाट गायब झाले. लाकडी कपाट भंगारमध्ये सहज टाकले जाते. मग जुने कर्मकांड, विधी का टाकून देत नाहीत?
चरत् भिक्खवे चारिकम्, बहुजन हिताय बहुजन सुखाय।
अशा अंधश्रद्धांना आळा बसावा म्हणून समाजात काही ‘शहाणी’ माणसं प्रयत्न करीत असतात. परंतु अशा शहाण्या माणसांची संख्या अत्यल्प असल्याने त्यांचे फारसे चालत नाही. त्यांचा छळ केला जातो किंवा ठारही मारले जाते. धर्माच्या पडद्याआड समाजाची लुटमार करणाऱ्या शोषकांचे वर्चस्व कायम राहते. समाजाचे प्रबोधन करून लोकांना अंधश्रद्धेतून मुक्त करणारी शहाणी माणसे बदनाम केली जातात. ‘आलास फार मोठा शहाणा!’, ‘तीन चार बुकं वाचून लई अक्कल शिकवितो!’, ‘वाड-वडिलांची परंपरा आहे, ते काय मूर्ख होते काय?’, ‘शिक्षण घेऊन वाया गेला’ असे उद्गार परंपराप्रिय लोकांच्या तोंडी जाणिवपूर्वक घालण्यात येतात. बौद्ध धम्माने यासाठी दोन मार्ग निवडलेत. पहिला मार्ग हा की, धम्माने कोणत्याही समारंभासाठी विधी तयार केला नाही. पुरोहित नावाचा वर्गच धम्मात निर्माण होऊ दिला नाही. त्याकाळी जे बौद्ध भिक्खू होते, ते कुठेही लग्नविधी अथवा मृत्युविधी करीत नव्हते. बौद्ध भिक्खू फक्त प्रबोधनाचे काम करीत होते. ‘चरत् भिक्खवे चारिकम, बहुजन हिताय बहुजन सुखाय!’ पावसामुळे चार महिने फिरताच येत नाही. म्हणून त्याला ‘वर्षावास’ समजून विश्रांती घ्यायची. मात्र उर्वरित आठ महिने कुठेही न थांबता अविश्रांतपणे जास्तीत जास्त लांबवरच्या व अतिदुर्गम भागात जाऊन लोकांमध्ये नव्या वैज्ञानिक धम्माचा प्रचार-प्रसार करणे, एवढे एकच काम त्याकाळचे बौद्ध भिक्खू करीत होते. त्याकाळात अशा सुशिक्षित, शिस्तबद्ध व नीतिमान
सत्यशोधक विधी भाग तीन


