🟥 “महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सर्वांची – कोल्हापुरात ‘पॉश 1 कायद्यावरील’ जनजागृती कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा संदेश!”

📍 जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज ताराराणी सभागृहात कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध (POSH) कायद्याच्या क्षमता बांधणीसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, एमआयडीसीचे क्षेत्रीय अधिकारी उमेश देशमुख, तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वायंगडे उपस्थित होते. कोल्हापुरातील विविध कंपन्यांच्या अंतर्गत समिती सदस्य व मनुष्यबळ विकास विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
अमृता करमरकर, व्यवस्थापक – यशस्वी समूह, पुणे, यांनी पॉश कायद्यावरील तरतुदी, न्यायालयीन निकाल, आणि प्रात्यक्षिके यांचा वापर करून प्रभावी सादरीकरण केले. संवादात्मक प्रश्नोत्तर सत्रामुळे उपस्थितांना या विषयाची सखोल माहिती मिळाली.
या वेळी जिल्हाधिकारी येडगे म्हणाले की, “कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरदार महिला कार्यरत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सर्वांची आहे. महिलांनी आपल्या अधिकारांबाबत जागरूक राहावे आणि कंपन्यांनी आलेल्या प्रत्येक तक्रारीवर निष्पक्ष व संवेदनशीलतेने कारवाई करावी.”
🔴 तीन बंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही | संपादक: सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 7387737801
👉 आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये हा नंबर जोडा
👍 बातमी लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉरवर्ड आणि कमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबा — विसरू नका!




