शरणगाथा क्रमशा.41

शरणगाथा क्रमशा.41
सुमारे १६०० वचनांपैकी सुमारे
३०० वचनांमध्ये बसवण्णांचा उल्लेख आहे. यामध्ये बत्ती बसवण्णांमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात, जीवनात आणि एकूणच मानवीसमूहावर झालेले मन परिणाम प्रभुदेवांनी अत्यंत सविस्तर, तितकेच प्रभाविपणे वर्णिले आहेत. सा
बसवण्णांची महती गातांना प्रभुदेव म्हणतात…
बसवण्णांमुळे तन-मन-आचार-भक्ती शुद्ध झाली पाहा गुहेश्वरा. (समग्र वचन संपुट-२ वचन क्रमांक १२३६)
दुसरीकडे प्रभुदेवांची महती गाताना बसवण्णा म्हणतात, शरणांनी पंचेद्रियांनी ब्रह्मचारी असायला हवे,
■ कूडलसंगमाशी एकरूप होण्यासाठी ब्रह्मचारी झाले पाहा प्रभुदेव. (समग्र वचन संपुट-१ वचन क्रमांक १३७०)
प्रभुदेवांच्या भेटीने सिद्धरामेश्वरांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. विचार आणि कृती दोन्ही पातळीवर सिद्धरामेश्वर बदलून गेले. स्थावर लिंगाकडून आत्मलिंगाकडे, • कर्मयोगाकडून शिवयोगाकडे वळले. प्रभुदेवांच्या प्रभावाबाबत सिद्धरामेश्वर म्हणतात, सर्वांना माहीत आहे की, प्रत्येकास दोन डोळे आहेत,
सर्वांना माहीत आहे की प्रभुदेवांना तीन डोळे आहेत. अल्लमप्रभूना ज्ञानाचा परं एक डोळा आहे पाहा कपिलसिद्धमल्लिकार्जुना.
(समग्र वचन संपुट-४: वचन क्रमांक १६७२)
प्रभुदेव ‘प्रज्ञाचक्षू’ होते हे सिद्धरामेश्वरांच्या या वचनातून सिद्ध होते. आपल्या — दुसऱ्या एका वचनात सिद्धरामेश्वर म्हणतात, बसवण्णा माझे शरीर तर प्रभुदेव माझे
या प्राण झाले पाहा. (समग्र वचन संपुट-४: वचन क्रमांक २९९)
शून्यपीठाचे पहिले अध्यक्ष
अनुभव मंटप ही कल्याणकारी राज्य संकल्पनेतील विद्वानांची परिषद होय. त्याला शून्यपीठ असेही म्हटले जाते. सारे ‘शिवशरण’ या अनुभव मंटपाशी जोडले गेले. अल्लमप्रभू हे त्या मंटपातल्या शून्य सिंहासनाचे अध्यक्ष होते. त्या केंद्राशी जोडल्या गेलेल्या शिवशरणांच्या चिंतनातून कन्नड साहित्यात मौलिक ठरलेल्या वचन साहित्याची निर्मिती झाली. बसवण्णांनी अनुभव मंटपाच्या रुपाने एका जातीमुक्त समाजाचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. यामध्ये सर्वांना – आपले विचार मांडण्याची संधी होती. अल्लमप्रभुदेव या परिषदेचे पहिले अध्यक्ष होते. चन्नबसवण्णा दुसरे, सोलापूरचे सिद्धरामेश्वर तिसरे अध्यक्ष होते. कायद्याने समाजावर वचक बसविण्यापेक्षा समाजात गुन्हेगारीच घडू नये अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न अनुभव मंटपाच्या संकल्पनेत होता, असे म्हणता येईल.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

