शरणगाथा क्रमशा.22

शरणगाथा क्रमशा.22
इंगळेश्वर हे त्यांच्या भामाचे गाव. बसवण्णा काही काळ आपल्या मामाच्या गावः राहिले. मादरसा आणि मादलांबिका यांचे कुटुंब कर्मठ होते. या दांपत्याचे ते लाडके अपर क मादरसा वैदीक पंडीत म्हणून प्रसिद्ध होते. ब्रह्मवृंदामध्ये त्यांना प्रतिष्ठा होती. धर्ममार्त, राज म्हणून त्यांचा दरारा होता. पंचक्रोशीत त्यांचे राजकीय वजनही मोठे होते. दहा-पंध झाल गावांची त्यांची पाटीलकी होती. ‘अरस’ राजा अथवा मोठा सरदार यांच्यासाठी वापर नंत जाणारे विशेषण आहे. त्या अनुषंगाने मादरसा हे सरंजामदार असावेत. हे कुटुंब कर्म, महा होते. घरातील या कर्मठ धार्मिक वातावरणाचा बसवण्णांच्या संवेदनशील मनास तिटका मुल येत असे. त्यांच्या बालमनावर समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड आणि जातीभेद यांच सखोल परिणाम झाला. या सर्व अनिष्ट बाबींचा त्यांना संताप येत असे. येथेच त्यांच्ः का मनात बंडखोर विचारांचा जन्म झाला. त्याचे तत्कालिक कारण म्हणजे उपनयन संस्कार का मुंज विधी. अत्यंत चिकित्सक बुद्धिमत्तेच्या या मुलाने बहिणीला वगळून मुलगा म्हणू हे होणाऱ्या आपल्या उपनयन संस्काराला विरोध केला. आपण मुलगा म्हणून श्रेष्ठ आपले इस बहीण मुलगी म्हणून कनिष्ठ या धारणेला त्यांनी सुरूंग लावला. मुलगा आणि मुलगी तप दोघांमध्ये लिंगभेद करण्याला धार्मिक अधिष्ठान असेल तर मला तुमचा धर्म नको, अशी कणखर भूमिका घेत बसवण्णांनी धर्माच्या नावावर होणाऱ्या कर्मकांडांना विरोध केला त्यातूनच ते घरातून बाहेर पडले. कर्मकांडाचे अवास्तव स्तोम न माजवता शुद्ध आचार आणि निस्सीम भक्तीचा मार्ग बसवण्णांनी स्वीकारला. आपल्या मुंजीच्या वेळेसच त्यांनी आपल्या सनातनी वडिलांना याबद्दल विचारणा केली होती. यावरून त्यांची वैचारिक आणि तत्त्वचिंतक मनाची साक्ष पटते. ही घटना बसवराज नावाच्या मुलाचा ‘महात्मा’ होण्याच्या वाटचालीतील पहिले पाऊल ठरले असे म्हणता येईल.
आपल्या छोट्या भावाचे विचार आणि कृतीचा बहीण नागम्मा यांना खूप अभिमान
वाटत असे. बहीण भावांचे एकमेकांवर निस्सीम प्रेम होते. शिवाय श्रद्धा आणि आदरहे होता. बागेवाडी सोडल्यानंतर त्यांनी संगमनाथ (आजचे कुडलसंगम) येथे अभ्यास केला विविध ज्ञानशाखांमध्ये पारंगत झाल्याने बसवण्णांची ख्याती सर्वदूर पसरत गेली. आता ते तरुण झाले होते. आपले मामा बलदेवराय यांच्या सांगण्यावरून ते मंगळवेढ्यास आले. बाराव्या शतकात त्यांनी उभारलेल्या समग्र कल्याणक्रांतीच्या आंदोलनाची मुहूर्तमेढ मंगळवेढ्यात झाली. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा ही बसवण्णांची कर्मभूमी. कलचुरी राजघराण्याची मंगळवेढा ही राजधानी. बसवण्णांनी मंगळवेढ्यात कोषागार विभागात करणिक (कारकून) म्हणून सेवा सुरू केली. राजदरबारात बसवण्णांचा लौकिक दिवसेंदिवस वाढत गेला. त्यांच्या वैचारिक आणि व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत मंगळवेढ्याची भूमिका महत्त्वाची आहे. मंगळवेढ्यातच त्यांचे मामा बलदेवराय यांची
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01


