जय ओबीसी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुक पाच टप्प्यात पुर्ण झाली.

जय ओबीसी
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुक पाच टप्प्यात पुर्ण झाली.
ओबीसी वर्गाच्या आरक्षणावर मराठा धार्जिण्या सरकारने अक्षरश: घाला घातला गेला.
ओबीसी विरोधात इतके हुकुमशाही निर्णय घेतले गेले, ओबीसींवर अन्याय झाला.
ओबीसी नेतृत्वांवर सोशल मेडियातून अगदी अवमानास्पद टिप्पण्या केल्या गेल्या.
निवडणुकीत प्रस्थापितांच्या राजकीय मक्तेदारीस थोपविण्यासाठी ओबीसी संघर्षशील नेतृत्वांनी निवडणुकीत उमेदवारी केली.
ओबीसींवरील अन्याय दूर व्हावा म्हणून प्रस्थापित विरोधात संघर्ष केला.
पण, स्थानिक ओबीसी पक्षांच्या शिलेदारांनी आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी प्रस्थापातांना साथ दिली.
ती निष्ठा ओबीसी उमेदवारांसाठी पणास लावली असती तर,
लोकसभा निवडणुकीचे चित्र वेगळे जाणवले असते.
कुनबीच्या अनेक खाडाखोड करुन केलेल्या बोगस नोंदीवरुन मराठा समाजाचे ओबीसीकरण केले. ५८ लाख नोंदी दाखविल्या. घरपोच दाखले दिले.
यापुढे ओबीसीच्या मुलांनी नोकर्या मिळेल असे स्वप्न पाहायचे नाही.
ओबीसींनी उच्च शिक्षण ओबीसी कोट्यातून मिळेल या आशेवर रहायचे नाही.
कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांत सदस्यता मिळेल, याचा विचारही करायचा नाही.
ओबीसी आरक्षणामुळे बरेच सरपंच झाले,
पंचायत समिती सदस्य झाले,
सभापती झाले,
झेड पी सदस्य झाले,
जिल्हापरिषद अध्यक्ष झाले,
नगरपालिकांत/महानगरपालिकांत नगरसेवक झाले,
नगराध्यक्ष/महापौर झाले,
सहकारी बॅंका, पतसंस्थांत, कारखाने, जिल्हाबॅंका, मोठ्या संस्थांत संचालक झाले,
भावांनो,
यापुढील ओबीसींच्या वरील बाबींचे चित्र काय असेल.
तुमची हक्काची भाकरी हिसकावून घेतली तरीही आपण ज्यांनी अन्याय केला त्यांनाच सभागृहात नेण्यासाठी राबताना दिसलात.
किमान
येणार्या विधानसभेत तरी या अन्यायाचा मतपेटीतून बदला घ्या.
ज्यांनी ओबीसी आरक्षण हिरावून घेतले त्यांना विधानसभेच्या पायरीपासून दूर करण्याची मतशक्ती आपली आहे.
ती मतशक्ती तितक्याच ताकदीने ओबीसी उमेदवारांसाठी वापरु.
सभागृहात दररोज आदेश काढून ओबीसी आरक्षण हस्तगत केले.
ओबीसी मतांवर ओबीसींचेच उमेदवार विधानसभेत पाठवून, ओबीसींची सत्ता निर्माण करुन, काढलेले सारे अन्यायी आदेश रद्द करुन पुन्हा पुर्ववत ओबीसी आरक्षण हक्क अबादित करु.
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लढणार्यास तनमनधनाने पाठबळ देवू.
ओबीसी बहुजनांचे आवाज सभागृहात पाठवू…
गोरख आळेकर
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद…
🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴




