मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 50

मराठा आरक्षण विरुद्ध ऍडव्होकेट मंगेश ससाने ,प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 50
त्यांना त्यांच्या पूर्वाश्रमीच्या (वायु) अवस्थेत पोहचविणे. जे लोक विशिष्ट प्रक्रियांनी जातीत संघटित झालेत, त्याच लोकांचे विघटन केले तरच ती जात नष्ट होईल. हे साधे-सरळ नैसर्गिक सूत्र आहे. ब्राह्मणी छावणीच्या सत्ताधाऱ्यांनी दलित-आदिवासींना राज्यघटनेतच
आरक्षण देण्यास फारशी खळखळ केली नाही. परंतू ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून तब्बल ३५ वर्षे कालेलकर आयोग, मंडल आयोग बासनात गुंडाळून ठेवला. शेवटी १९८९ साली ब्राह्मणी छावणी केंद्रीय सत्तेतून हद्दपार झाल्यावरच ओबीसींना मंडलचे आरक्षण मिळायला लागले. असे का? ब्राह्मणी छावणीने दलित- आदिवासी स्त्रियांना ३३ टक्के राजकीय आरक्षण पार्लमेंटमध्ये सहज देऊन टाकले. मात्र ओबीसी महिलांना हे आरक्षण नाकारले! का? ब्राह्मणी शासकांनी आदिवासी जनगणनेला कधीच विरोध केला नाही, दलित जातींच्या जनगणनेलाही त्यांनी कधीच विरोध केला नाही.
मात्र ब्राह्मणी शासक केवळ ओबीसींच्याच जातनिहाय जनगणनेला कडाडून विरोध का करीत होते व करीत आहेत? ब्राह्मणी छावणी फक्त आणी फक्त ओबीसींनाच का घाबरते? हे आता आपल्या लक्षात यायला काहीच हरकत नाही. कारण जातीव्यवस्था नष्ट करण्याचं प्रभावी व यशस्वी नेतृत्व ओबीसीच करू शकतो, हे ब्राह्मणी शासकांना माहित असल्याने व ते तामीळनाडूने सिद्ध केल्याने ब्राह्मणी छावणी सातत्याने फक्त ओबीसी जातींनाच हक्क देण्यास कडाडून विरोध करत असते. नेहरूंनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ताबडतोबीने ओबीसीची जातनिहाय जनगणना का बंद केली? त्यामागील कारण हेच आहे की, ओबीसी जातीच ब्राह्मणी छावणीला मूळापासून उध्वस्त करू शकतात, या नैसर्गिक सत्याची ब्राह्मणांना पूरेपूर जाणीव आहे!
आता या लेखाच्या शेवटी सर्वात महत्वाचा व कळीचा मुद्दा आपण चर्चेला घेऊ, बिहारच्या जातनिहाय जनगणनेने ओबीसी चळवळीचे अंतिम चौथे ‘जाल्यंतक क्रांतीपर्व’ कसे सुरू होणार? ओबीसी चळवळीचे पहिले ‘कालेलकर आयोग पर्व १९२५ साली सामी पेरियार यांनी कॉग्रेसला लाथ मारून सुरू केले. लालू-मुलायम-कर्पूरी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली १९८० साली ओबीसी चळवळीचे दुसरे ‘मंडल पर्व’ सुरू झाले. १९९६ साली तत्कालीन प्रधानमंत्री देवेगौडा यांनी आपल्या मंत्रीमंडळात ओबीसी जातनिहाय जनगणनेचा ठराव मंजूर करून तिसऱ्या ‘जातनिहाय जनगणनेच्या पर्वाला’ सुरूवात केली. आणी आता जातनिहाय जनगणना यशस्वीपणे संपन्न केल्याने नितीशकुमारांच्या नेतृत्वाखाली २०२३ पासून ओबीसी चळवळीचे चौथे व अंतिम ‘जात्यंतक क्रांतीपर्व’ सुरू झाले आहे.
२ ऑक्टोंबर रोजी बिहारच्या जातनिहाय जनगणनेचे आकडे व डेटा जाहीर करतांना नितीशकुमार काय म्हणालेत? ते स्पष्टपणे म्हणाले की, आता
आमच्या जवळ प्रत्येक जातीचा आकडा व डेटा आहे. त्यामुळे या जार्तीच्या
उत्थानासाठी काय कार्यक्रम राबविता येतील, याची आखणी आम्ही करणार! या
वाक्याचा अर्थ असा होतो की, विविध योजना राबवून या आतींना सन्मानाने अर्थव्यवस्थेत व बाजारपेठांमध्ये आणून सक्रिय करणार! जातीव्यवस्था निर्माण करण्यासाठी ज्या व्यावसायिकांची अर्थव्यवस्था नष्ट करून त्यांना बाजारपेठांमधून हद्दपार करण्यात आले होते, ते सर्व व्यावसायिक पुन्हा अर्थव्यवस्थेत व बाजारपेठेत आलेत तर जातीअंताचे क्रांतीपर्व सुरू होणार की नाही? ओबीसी पाथरवटने दगडातून मुर्ती घडवल्यानंतर ती मुर्ती मंदिरात स्थापन
होताच तीच्या दर्शनालाही तो पारखा होतो. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात उत्पादक व सेवाकर्मी बलुतेदार कष्टकऱ्यांनी मरेस्तो राबून फक्त सरकारी तिजोरी भरण्याचेच काम केले. मात्र या तिजोरीतून हक्काचा परतावा त्यांना कधीच मिळाला नाही. ७५ वर्षे ही तिजोरी लुटण्याचे काम ब्राह्मण-बनिया-जमीनदार जातींनी मनसोक्तपणे केले. ७५ वर्षानंतर आता बिहारमध्ये पहिल्यांदाच या शूद्रांचा सरकारी तिजोरीवर हक्क प्रस्थापित होईल. ही आहे जातनिहाय जनगणनेची ‘जात्यंतक’ कमाल!
शाहू महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेलचा मालक बनविल्यानंतरच त्याच्या हातात रोकड यायला सुरूवात झाली. रोकड रोज हातात यायला लागल्यावरच त्याचा बाजारपेठेत ‘मालक’ म्हणून सन्माननीय प्रवेश सुरू झाला. गंगाराम कांबळेच्या हातात जास्तीची रोकड आली तर ती कुठेतरी भांडवल म्हणून गुंतवेल व हॉटेलपेक्षाही मोठा उद्योग तो आपल्या मुलासाठी सुरू करू शकेल. बौद्ध काळात देशभर अनेक तेलीश्रेष्ठी होते व त्यांनी मोठमोठ्या तेलाच्या
घाणीतून काढलेले तेल देश-विदेशातील बाजारपेठांमध्ये विकले जात होते. हे तेलीश्रेष्ठी इतके श्रीमंत होते की, नाशिक-खान्देशातील आभीर राजा ईश्वरकृष्ण याने बौद्ध भिक्खूंच्या औषधोपचारासाठी कुंभारांच्या श्रेणीकडे १००० कार्षापण, तेल्यांच्या श्रेणीकडे ५०० कार्षापण ठेवी म्हणून ठेवल्याची नोंद एका शिलालेखात असल्याचे कॉ. शरद पाटील सांगतात. (जात्यंतक भांडवलदारी लोकशाही व तीची समाजवादी पूर्ती, शपा, पा-३१) धुळ्याच्या जवळ कुसुंबा नावाचे एक खेडेगाव आहे. या गावात तेली जातीची बऱ्यापैकी लोकसंख्या आहे. त्यावरून हे
गाव बौद्धकाळात तेल-उत्पादनाचे हब असावे, असे मानायला जागा आहे. या
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा


