येवला शहर पोलीस स्टेशनचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या शुभ हस्ते संपन्न!
येवला शहर पोलीस स्टेशनचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या शुभ हस्ते संपन्न!
येवला शहर पोलीस स्टेशनचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या शुभ हस्ते संपन्न!
- . महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडून ४ कोटी खर्चातून ही सुसज्ज इमारत तयार झाली आहे .यामुळे स्थानिक सुरक्षेतील सुविधा अधिक सक्षम होईल आणि नागरिकांना जलद, प्रभावी आणि उच्च दर्जाची सेवा मिळवता येईल. हे पोलीस स्टेशन स्थानिक समुदायाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि येथील नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण मिळेल, असा विश्वास आहे.
यावेळी या उद्घाटनप्रसंगी पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन, येवला तालुका पोलीस निरीक्षक संदिप मंडलिक, येवला शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, नायब तहसीलदार पंकजा मगर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे,वसंत पवार,मोहन शेलार, डॉ.प्रसादशास्त्री कुळकर्णी,दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, सुभाष पाटोळे, मलिक मेंबर, मुश्ताक मेंबर,अशोक कुळधर,मकरंद सोनवणे, मच्छिंद्र थोरात,विजय खैरनार, सुनील पैठणकर,विशाल परदेशी, सचिन सोनवणे, सुमित थोरात, गोटू मांजरे, गणेश गवळी, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
>दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात प्रसिद्ध कले जाइल
#nashik #yeola


