सोशल

बळीराजाच्या नवखंडापैकी एका खंडाचा पालक अन्नदा भोजलिंग देवस्थानाकडे शासनाचे दुर्लक्ष!

बळीराजाच्या नवखंडापैकी एका खंडाचा पालक अन्नदा भोजलिंग देवस्थानाकडे शासनाचे दुर्लक्ष!
🔴🟡🟡🟡🟡🟡🟡🟡
दर रविवारी मंगळवारी बहुजनांची यात्रा असते आणि नेहमीच दररोज यांचे लग्न शुभकार्य झालेले आहेत ते देवाला कुलदैवत आला वंदन करण्यासाठी या कुळदैवतास बारावी महिने या डोंगरावर येत असतो गेल्या सात आठ वर्षा पूर्वी लोकवर्ग वर्गणीतून काही भक्ता आणि या डोंगरावर येण्यासाठी घाट रोड स्वखर्चाने तयार केलेला आहे याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे पिढ्या आणि पिढ्या पाच हजार वर्षाच्या अगोदर पासून या देवस्थानाचे कुलदैवताचे महत्त्व आहे भोजलिंग म्हणजे या बळीराजाच्या नवखंडापैकी एका खंडाचा पालक सर्वांना भोजन देणारा म्हणून त्याला भोजलिंग म्हणतात भोजलिंगाचा सेवक म्हणून मी शंकराव लिंगे आणि या विभागातील सर्व बहुजनांचे कुलदैवत असलेला भोजलिंग यांच्या दर्शनासाठी वर्षभर कोट्यावधी भाविक येथे येऊन जातात शासनाने आजपर्यंत या ठिकाणी कोणतीही व्यवस्था केलेली नाही पिण्याच्या पाण्याची राहण्याची किंवा यात्रेसाठी लागणारे साहित्य निवारा जो निर्माण झालेला आहे तो सर्व लोक वर्गणीतून निर्माण झालेला आहे शासनाचे या कुलदैवताकडे दुर्लक्ष आहे

असे खंत भोज लिंगाचे भक्त सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी व्यक्त केलेली आहे भोजलिंग हे देवस्थान शुद्ध शाकाहारी आहे परंतु याच्या शेजारी असलेला मसोबा या म्हसोबाची यात्रा दर मंगळवारी शुक्रवारी रविवारी असते या ठिकाणी हजारो बकऱ्यांचा बळी दिला जातो या ठिकाणी येणारा भक्त हा सकाळी नऊ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत येतो भोजलिंगाचे दर्शन घेतो आणि नंतर म्हसोबाची जत्रा करून त्या ठिकाणी मांसाहारी जेवणाचा कार्यक्रम करून आपापल्या गावी निघून जातो सकाळी नऊ ते सहा पर्यंतच या डोंगरावर भक्तजन असतात कारण या ठिकाणी राहण्याची वगैरे कोणतीही सोय नाही ती सुद्धा अलीकडच्या काळात थोडीफार ची सोय झालेली आहे ती सर्व लोकवर्गणीतून पिण्याचे पाणी काही झाडे लावलेले आहेत काही शेड उभा केलेला आहे

हे जत्रेसाठी लागणारी भांडी वगैरे साहित्य या ठिकाणी आता मिळू लागलेले आहे डोंगरावर येण्यासाठी जो रस्ता पाहिजे तो घाट रोड किमान तीन चार किलोमीटरचा आहे तो घाट अद्यापि जो लोग वर्गणीतून केलेला आहे तो अत्यंत धोकादायक आहे त्याचे डांबरीकरण झालेले नाही किंवा याचा कोणताही शासनमान्य प्लॅन करून हा घाट तयार केलेला नाही भोजलिंग देवस्थान हे कुलदैवत असल्यामुळे फार मोठे जागृत देवस्थान आहे आणि या ठिकाणी ज्यांचे कुळ दैवत आहे तो वर्षातून एकदा तरी येऊन या ठिकाणी दर्शन घेतो शेजारी असलेल्या मसोबाची जत्रा करतो आणि लग्न शुभकार्य झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी कुळदैवताला भेटण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत येतोच येतो पूर्वी या ठिकाणी येण्यासाठी अजिबात रस्ता नव्हता दोन दोन तीन फूट उंचीच्या पायऱ्या होत्या तरीसुद्धा त्या पायऱ्या मधून रस्ता काढत काढत भक्तगण या ठिकाणी येत होते

आता थोड्या सोयी झालेल्या आहेत त्यामुळे फक्त गणाची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे तरी याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार किंवा महाराष्ट्र शासन केंद्र शासन यांनी त्वरित लक्ष घालून भोज लिंगाच्या डोंगरावरील सुमारे साडेतीनशे ते चारशे एकर क्षेत्रावर फळझाडे सावलीची झाडे लावण्याची अत्यंत आवश्यकता आहे अ वर्ग तीर्थक्षेत्राचा पर्यटन क्षेत्राचा दर्जा देऊन भक्तनिवास सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आज भोजलिंगाचे दर्शन घेऊन सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी केली आहे भोजलिंगाचं चांगभलं!

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button