सोशल

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 62

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
62

आणि सत्याची कास धरणारे राम गायकवाड विद्यार्थिदशेपासून आक्रमक सत्यशोधक आहेत. डॉ. बाबासाहेब अबिडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर, शिष्यवृत्तीवृद्धी आंदोलन, तसेच मराठवाडा विकास आंदोलनात राम गायकवाड यांचा सहभाग वाखाणण्यासारखा राहिला. जालना येथे स्थायिक झाल्यावर ख्यातनाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे इ. स. १९९० साली त्यांच्याकडे अध्यक्षपद चालून आले. इ. स. २००० साली या व्याख्यानमालेचे ते सचिव राहिले. इ. स. २०१३ मध्ये त्यांच्याकडे जालना जिल्हा सत्यशोधक शाखेचे कार्याध्यक्षपद चालून आले. त्यांनी आपल्या कार्यकाळात जालना जिल्ह्यात सत्यशोधक चळवळीचा जोमाने प्रचार-प्रसार केला. जालना येथे १० व ११ जानेवारी २०१५ रोजी संपन्न झालेल्या अ.भा. सत्यशोधक समाजाच्या ३७ व्या अधिवेशनासाठी संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करून अधिवेशन सफल होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

गायकवाड
बापूराव दादाजी

सत्यशोधक समाज संघटनेची १७ एप्रिल १९११ रोजी पुनर्रचना करण्यात आली. या नूतन कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष मुंबईकर सत्यशोधक स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू हे होते, तर या पुनर्रचित संघटनेचे आद्य सचिव मुंबई येथील हेन्स रोड, पोस्ट जेकब सर्कल येथील सत्यशोधक बापूराव दादाजी गायकवाड हे होते. इ. स. १९११ ते इ. स. १९१३ पर्यंत ते अ. भा. सत्यशोधक समाजाचे सचिव होते. या तीन वर्षांच्या कालखंडात सत्यशोधक समाजाची तीन अधिवेशने अनुक्रमे पुणे, नाशिक, ठाणे येथे संपन्न झाली. या तीनही अधिवेशनांचे अहवाल स्वतंत्रपणे प्रत्येक वर्षी त्यांनी प्रसिद्ध केले. प्रस्तुत सत्यशोधकी अहवालावरून तत्कालीन सत्यशोधक चळवळीचा इतिहास हाती लागतो. दरम्यान, १९१४ साली सासवड येथे सत्यशोधक समाजाचे चौथे अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात स. स. संहितेनुसार केंद्रीय कार्यकारिणीची फेरनिवड करण्यात आली. या कार्यकारिणीत हिशेब तपासणीस म्हणून गायकवाड यांची निवड करण्यात आली. पहिल्या पाचही अधिवेशनांना गायकवाड उपस्थित होते, प्रसंगी त्यांनी काही ठरावही मांडले.

२ मार्च १९१० रोजी मुंबई सत्यशोधक समाज शाखेची नव्याने स्थापना करण्यात गायकवाडांचा मोलाचा सहभाग राहिला. गायकवाड या शाखेचे सचिव- खजीनदार होते. दरम्यान, ते मुंबई परिसरात सत्यशोधक दरिही करीत. त्यांनी ‘

बीरवाडी’ गावी सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली होती. संदर्भ – १. सत्यशोधक समाज परिषद, अ. भा. व कार्यवृत्तांत – संपादक – प्राचार्य गजमल माळी

गायकवाड
बजाबा भिकाजी

गायकवाड बजाबा भिकाजी हे मौजे विंचूर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील सत्यशोधक असून ते निधड्या छातीचे सत्यशोधक होते. विचूर येथील सत्यशोधक शंकरराव काळे यांच्या सहकार्याने त्यांनी ‘सत्यशोधक जलसा’ उभा केला होता. या जलशाला विंचूर येथे काही वर्षे वास्तव्यास असलेल्या पांडुरंग बाळाजी कवडे यांचे मार्गदर्शन लाभले होते. मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या गायकवाडांची सत्यशोधक चळवळीवरील निष्ठा हयातभर ढळली नाही.

गायकवाड
भगवानराव विष्णू
(जन्म-१९०४)

अशिक्षित, बांधा भक्कम, सत्यशोधकी चळवळीसाठी हरएक जोखीम उचलणारे सत्यशोधक भगवानराव विष्णू गायकवाड हे मौजे कारी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर येथील सत्यशोधक असून त्यांचा जन्म १९०४ साली झाला. भरभक्कम

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button