महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार म्हणाले,

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार म्हणाले, मराठ्यांच्या जमिनीचे तुकडे का झाले ! किती कमी झाले ? पण आमच्या पालावरच्या ओबीसी समाजाला, नंदीवाल्याला, वडार, कैकाडी, डोंबारी, मर्याचे गाडीवाले कडक लक्ष्मीवाले, रामोशी, बेलदार, पारधी यांना जागाच नाही ! त्यांचे काय हाल असतील !! जातनिहाय जनगणना करा, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी!!! त्यासाठी भुजबळ साहेब आपण सर्वजण शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान मोदी साहेबाला भेटायला जाऊ आणि जातनिहाय जनगणना करण्याचे विनंती सर्वांना करू .
मा. छगनरावजी भुजबळ साहेब आपल्या भाषणात म्हणाले, केंद्रात मंडल आयोग विश्वनाथ प्रताप सिंग यांनी पहिल्यांदा मांडला, स्वीकारला त्यामुळे महाराष्ट्रात शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी त्याची अंमलबजावणी केली याशिवाय त्यांनी कोणाला काही दिलेले नाही. केंद्राचं आलं ती त्यांनी दिल. केंद्राचा आदेश होता तो त्यांनी पळला. पहिला आयोग मंडल आयोग यांनी आमच्या सर्व ओबीसी जातींना मान्यता दिलेले आहे. आणि त्याच्यावर कोर्टाने शिक्कामोर्तब केलेला आहे आणि तो जीआर आहे त्यामुळे ते एका रात्रीत आले वगैरे असं काही नाही. खोटा प्रचार करतात. आम्ही कोणाचे खात नाही. मी आज सुद्धा दिवाळी दिवशी बेसन ठेचा आणि कांदा फोडून खातो. जरांग्यासारखं सासरवाडी मध्ये तुकडे तोडत नाही दुसऱ्याच्या घरी. सराटीला पोलिसावर दगडफेक हल्ला करून 70 पोलीस पटापट खाली पाडले. ते काय पाय घसरून पडले होते का ? असा सवाल त्यांनी केला. पवार साहेब इतके चांगले प्रशासक असून सुद्धा त्यांनाही माहिती मिळाली नाही. दिली नाही. अन्यथा चित्र वेगळे झाले असते. या दंगलीला लाठीमार गोळीबार साठी कारणीभूत हे राजेश टोपे आहेत रोहित पवार आहेत. न्यायाधीश सुद्धा जरांग्याला, अशिक्षित माणसाला म्हणतात. इतकी लाचारी. सरकारचे मंत्री इतके बेंड झाले की कमरेला बेंड द्यावा लागला. मला खूप बोलून झालं माझ्यावर खूप खालच्या पातळीचा भाषा प्रयोग केला. याद राख माझ्या शेपटीवर पाय दिला तर !!! गावबंदी उठवा पोलिसांनी सगळे फलक काढावेत. या जरांग्याच्या नावावर काय महाराष्ट्राचा सातबारा केला आहे का ? असा सवाल त्यांनी विचारला. राहुल गांधी म्हणतात जातनिहाय जनगणना करा, पवार साहेब म्हणतात, बावनकुळे म्हणतात, सर्व पक्षाचे लोक म्हणतात, मग अडचण कुठे आहे ? करा ना! जातनिहाय जनगणना होऊ द्या. एकदा दूध का दूध पाणी का पाणी . जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी! ह्या मराठ्याच्या गुंडांनी बीडमध्ये जाळपोळ केली सुभाष राऊत, यांच्या थ्री स्टार हॉटेलची राख रांगोळी केली, आजपर्यंत राख रांगोळी हा शब्द ऐकत होतो. राख रांगोळी म्हणजे काय ते हॉटेलमध्ये भेट दिल्यानंतर समजलं. अक्षरशः भाऊक झालो चार-पाच कोटींचं नुकसान केलं. नियोजनबद्ध ओबीसींना टार्गेट केलं. सोनार समाज असेल, तेली समाज असेल, माळी समाज असेल, न्हावी समाजाचे असेल….फक्त ओबीसी समाजाच्याच लोकांना त्रास दिला. हजारो कोटींचे नुकसान केलं. पोलिसाने यांच्यावर केसेस करून यांच्याकडून हे सगळे पैसे वसूल केले पाहिजेत. या स्टेजवर शंकरराव लिंगे उपस्थित आहेत. त्यांना विचारा पंढरपूर मध्ये एका अपंग माळी समाजाचा “विलास शिरसागर” या मुलाला मराठा आरक्षण द्यावे म्हणून फाशी दिलेले आहे!!! अपंग मुलगा फाशी कसा घेतो ! त्यांनी आत्महत्या केली, असे सांगितले जात आहे. पोलीस तपास करायला तयार नाहीत. का तपास करत नाही. तसा पोलिसांना त्यांनी सवाल केला. अपंग मुलाचे फास लागलेल्या मुलाचे पाय जमिनीला लागले होते. अपंग मुलगा झाडावर चढतोच कसा?????? सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गावामध्ये मराठा समाजाच्या पॅनलला मतदान दिलं नाही म्हणून न्हावी समाजाच्या हरी काशीद या मुलास व त्याच्या नातेवाईकास न्हावी समाजाच्या वस्तीवर जाऊन त्यांना बेदम मारहाण केली. घोटाळा वैरण जाळली. दोन लाख रुपयाचे नुकसान केलं. दहशत निर्माण केली. भुजबळ साहेब पुढे म्हणाले, आता वेळ आली आहे जशास तसे उत्तर दिले पाहिजे. त्यांनी आमचा बॅनर फाडला तर तुम्ही पण फाडा. आज भुजबळ साहेबांनी अनेक मुद्द्याला हात घालून ओबीसीवर जो अन्याय होत आहे , त्याला वाचा फोडण्याचे काम केलं.तुडुंब भरलेल्या प्रेक्षकांतून प्रचंड असा प्रतिसाद मिळत होता. प्रतिसाद मिळत होता, ‘एकच चळवळ छगन भुजबळ’. भुजबळ साहेबांनी सांगितलं, यापुढे सर्व चारशे जातीने एकत्र राहून हा लढा द्यायचा आहे. आणि हा लढा यशस्वी करायचा आहे. आपल्या आरक्षणाला अजिबात धक्का लागू दिला जाणार नाही. जर असं झालं तर आम्ही गप्प बसणार नाही. असा त्यांनी शासनाला सुद्धा सज्जड दम दिला. अंबड मध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये ओबीसी समाज जमा झाला होता. ओबीसीचं भगवं वादळ वेगवेगळे समाज वेगवेगळी नृत्य वेगवेगळी संगीत साधना, वेगवेगळी वेशभूषा . अनेकता मे एकता, असे चित्र अंबड मध्ये दिसत होतं. नियोजित स्टेज पासून सुमारे दोन किलोमीटर पर्यंत 111 लाखांचा प्रचंड जनसमुदाय बसलेला होता. आजूबाजूच्या सर्व इमारतीवर, झाडावरती, गच्ची वरती व्हरंड्यात, जिकडे बघावं तिकडे माणसं बसलेले होती. जिथ पर्यंत नजर जाते तिथपर्यंत माणसंच माणसं दिसत होती. सगळे पिवळ वातावरण दिसत होतं. अति प्रचंड प्रचंड प्रचंड ओबीसीचा महासागर लोटला होता. या सभेला भटके विमुक्त, बारा बलुतेदार, मुस्लिम, सर्व जाती-धर्माचे लोक, धनगर माळी, वंजारी प्रामुख्याने उपस्थिती होती. अथांग हिंदी पिवळा ओबीसी महासागर लोटला होता. आयोजकांनी पार्किंगसाठी जवळजवळ 600 एकर वेगवेगळ्या ठिकाणी जागा ठेवलेली होती. आणि आयोजकांनी चहापाण्याची नाश्त्याची अत्यंत सुबक व्यवस्था केली होती. कार्यक्रम झाल्यानंतर पटांगण पूर्णपणे स्वच्छ करून दिले होते. अतिशय शिस्तबद्ध आणि उल्हासाच्या वातावरणामध्ये ऐतिहासिक सभा संपन्न झाली. जय ज्योती! जय क्रांती!!जय भीम!!! जय मंडल!!!! जय विश्वनाथ प्रताप सिंग !!!!! जय संविधान!!!!!! जय भारत!!!!!!! जय ओबीसी!!!!!!!!! सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा वरील नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा


