सावित्रीमाई फुले यांच्या.१९४ व्या जन्म ऊत्सवा निमित्त २०२५ नवीन वर्षाच्या हर्दिक सुभेच्छा!
सावित्रीबाई जोतीराव फुले ३ जानेवारी १८३१ला लक्ष्मीबाई खंडोजी नेवसे पाटील नायगांव ता . खंडाळा जि .सातारा येथे झाल १९४ व्या जन्म ऊत्सवा निमित्त २०२५ नवीन वर्षाच्या हर्दिक सुभेच्छा!
शुभेच्छुक सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अधक्ष:- राष्ट्रीय सत्य शोधक अबीसी फेडरेशन
पहिल्या भारतीय क्रांतीकारी समाज सुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि आध्य कवयित्री होत्या. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. या दोघांनी १ जानेवारी, १८४८ रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या शाळांपैकी पहिली शाळा आहे .
सावित्रीबाई फुले
सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्याय कारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्या साठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. त्या एक लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे.
३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्म दिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. १० मार्च १९९८ रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले. २०१५ मध्ये, पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले. ३ जानेवारी, २०१७ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमित्त गूगल ने १२ ७ देशात सावीत्री माई ना पोचविले त्यांच्या पदरा खालि मुली सुरक्षीत केल्या चे सिंबॉल चित्र प्रसिद्ध करून गूगलने त्यांना अभिवादन केले.
संपादक सावित्रीबाईंची प्रकाशित पुस्तके
काव्यफुले’ काव्यसंग्रह
सावित्रीबाईंची गाणी १८५१
सुबोध रत्नाकर ‘
बावनकशी .
जोतिबांची भाषणे संपादिका : सावित्रीबाई फुले १८५६ ला केले आहे .
सावित्रीबाई फुले यांचा वारसा फार मोठा आहे. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य अत्यंत आदरणीय मानले जाते.
बी.आर.आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या सोबतच फुले या मागासवर्गीयांसाठी एक आयकॉन बनल्या आहेत. मानवी हक्क ‘ मानव अधिकार अभियान एक मागणी – आंबेडकरी संस्थाच्या स्थानिक शाखां मधील महिला त्यांच्या जयंतीला मराठी आणि इतर भारतीय भाषांमध्ये वाढदिवस अनेक मिरवणुका काढतात.
पुणे महानगरपालिकेने १९८३ मध्ये त्यांचे स्मारक तयार केले.
३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः मुलींच्या शाळांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
२०१५ मध्ये, पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले.
१९९८ ला टपाल तिकीट काढले होते .
पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहे . सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन हा “बालिकादिन” म्हणून साजरा केला जातो.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ही दूरदर्शनच्या ‘किसान’ वाहिनीवर २८ सप्टेंबर २०१५ पासून सोमवार ते शुक्रवार या काळात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील हिंदी मालिका दाखविली गेली होती.
सावित्रीजोती ही फुले दाम्पत्यावरील मालिका सोनी मराठी वाहिनीवर ६ जानेवारी २०२० पासून प्रदर्शित केली होती
दिनबेधु न्युज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्य शोधक शंकरराव लिंगे ७ ३ 873778०१


