मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ कातरणी येथे आयोजित सभेस प्रचंड प्रतिसाद

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ कातरणी येथे आयोजित सभेस प्रचंड प्रतिसाद
मतदारसंघात विकास पाहिजे असेल तर छगन भुजबळ आहे
येवल्याच्या विकासाच मॉडेल देशभरात नावाजल मात्र येथील विरोधकांना विकासच दिसत का नाही ?
मंत्री छगन भुजबळ
येवला,कातरणी,दि.१३ नोव्हेंबर:- मी येवल्यात आलो. मला येथे आणले गेले. येथे विकास हवा होता. रस्ते, पाणी, उद्योग काहीच नव्हते. त्या सर्व सोई सुविधा आपण मतदारसंघात उपलब्ध करून दिल्या. देशाभरात येवल्याच्या विकासकामांचे कौतुक होते. मात्र काही लोक म्हणताय की विकास झाला नाही. जो इतर सर्वांना दिसतो तो विकास या इथल्या काही लोकांना दिसत नाही अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
येवला लासलगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे गट, आरपीआय आठवले गट महायुती घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज येवला तालुक्यातील कातरणी येथे भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेच्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रचार प्रमुख प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर,जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे, अरुणमामा थोरात,विश्वास बापू आहेर, एल.जी.कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.मोहन शेलार, हभप श्रावण महाराज जगताप,साहेबराव मढवई, आरपीआयचे संजय पगारे,शिवसेना शिंदे गटाचे किशोर सोनवणे,भाजपचे प्रमोद सस्कर, विनायक भोरकडे, बाळासाहेब कुऱ्हे, नवनाथ काळे, मच्छिंद्र थोरात, डॉ. प्रवीण बुल्हे, गणपत कांदळकर, प्रा.ज्ञानेश्वर दराडे यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी पहिल्या २४ तासात मी पवार साहेबाच्या सोबत गेलो. इतर लोक तर दोन दोन महिने विचार करत बसले होते. परंतु सर्वप्रथम आपण पवार साहेबांच्या सोबत आलो. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची स्थापना करण्यात आली. या सर्व घडामोडीत जिथे होतो तिथे लढा दिला. अनंत अडचणींना तोंड दिले. अनेक जण न लढता मुख्यमंत्री झाले.मी समाधानी आहे. याबाबत आपल्याला कुठलीही तक्रार नाही असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, येवल्यात साकारलेले प्रशासकीय संकुल, अडतीस गाव पाणी पुरवठा योजना, मुक्तीभूमी, मांजरपाडा प्रकल्प या योजना रोड मॉडेल ठरल्या आहेत.विकासाची ही कामे सहजच झाली नाही अनेक अडी अडचणीचा सामना करत ही लोकहिताची कामे मार्गी लावली आहे. विविध पाण्याच्या योजना सुरु आहे. त्या पूर्ण झाल्यांनतर येवला मतदारसंघात प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी उपलब्ध होईल. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी आपण हे काम जिद्दीने पूर्ण केले. ज्यांना हे कामे दिसत नसतील त्यांनी काम प्रत्यक्षात जाऊन पाहून खात्री करून घ्यावी असे त्यांनी सांगितले.
मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्यात पार गोदावरी प्रकल्पाच्या माध्यमातून मंत्री छगन भुजबळ अधिक पाणी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे येवल्याला बारमाही पाणी देण्यासाठी, येवला अधिक सुजलाम सुफलाम करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचे असल्याचे प्रचार प्रमुख अंबादास बनकर यांनी सांगितले.
यावेळी डॉ.मोहन शेलार म्हणाले की, मांजरपाडा प्रकल्पामुळे येवला तालुक्यातील अवर्षणग्रस्त भाग हा बागायतदार बनला आहे. स्वप्नात सुद्धा पाणी येईल अशी कल्पना आपल्याला नव्हती. परंतु मंत्री छगन भुजबळ यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून पाणी येवल्यात आणले. देवासाने पासून १६१ किलोमीटर प्रवास करत पाणी आज डोंगरगावात पोहचले आहे. तालुक्यातील १०० हून अधिक बंधारे आणि तलाव भरले आहे. मात्र विरोधकांना हे पाणी दिसत नाही. त्यांना नेमका कुठला आजार झाला आहे हे तपासावे लागेल निवडणुकीनंतर त्यांना आपण चांगल्या रुग्णालयात उपचार उपलब्ध करून देऊ असा चिमटा त्यांनी काढला.तसेच मंत्री छगन भुजबळ यांना घड्याळ या निशाणीवर बटन दाबून त्यांना महाराष्ट्रातून सर्वाधिक जास्त मतांनी निवडून द्या असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
मंत्री छगन भुजबळ यांची येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाला आवश्यकता आहे. त्यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागाला मांजरपाडा प्रकल्प साकारला असून अवर्षण गस्त भागाला दोनदा पाणी मिळाले आहे.आता कुठलाही विचार न करता कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन ज्येष्ठ नेते एल.जी.कदम यांनी केले.
हभप श्रावण महाराज जगताप म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवला तालुक्यातील कोटमगाव येथील जगदंबा मातेचे मंदिर, नांदगाव येथील नस्तनपूर शनीमंदिर यासह विविध धार्मिक स्थळांचा विकास करण्यात आला आहे. तालुक्याच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मांजरपाडा सारखा भव्य दिव्य प्रकल्प साकार करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा फायदा झाला आहे. त्यांच्याहातून यापुढील काळातही शेतकरी हिताची कामे होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्री छगन भुजबळ यांनी मतदारसंघात जो विकास केला तो कोणीही करू शकत नाही. या मतदारसंघातून त्यांना आपल्याला जाऊ द्यायचे नाही. सर्व जाती धर्माच्या विकासासाठी त्यांनी विकासाची कामे केली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचे आहे असे आवाहन भाजपचे प्रमोद सस्कर यांनी केले.


