महाराष्ट्र

येवल्यातील भारम मध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचार सभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

येवल्यातील भारम मध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचार सभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मतदारसंघातील सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला – छगन भुजबळ

महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी मतदारसंघात विविध योजनांची अंमलबजावणी – मंत्री छगन भुजबळ

विरोधकांना नेमका कुठला विकास हवाय ते त्यांनी शोधून द्यावा; मंत्री छगन भुजबळ यांची घणाघाती टीका

येवला,भारम,दि.१३ नोव्हेंबर:- येवला मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकासकामे झाली आहे. ज्या लोकांनी मला विकासासाठी येथे आणलं होते. त्या लोकांना मात्र विकास दिसत नाही. त्यांना नेमका कुठला विकास हवाय त्यांनी मला सांगावे किंवा शोधून काढावा असा चिमटा विरोधकांना काढला. प्रत्येक समाज घटकासाठी विकास करणे हे लोकप्रतिनिधीचे काम आहे. या सर्व समाज घटकांना न्याय देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण आपण केल्या आहेत असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना शिंदे गट, आरपीआय आठवले गट महायुती घटक पक्षातील उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज भारम येथे भव्य सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रचार प्रमुख अंबादास बनकर, ज्येष्ठ नेते त्यात्यासाहेब लहरे, अरुण थोरात, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी सभापती किसनकाका धनगे, किशोर सोनवणे, राजेंद्र परदेशी, नाना लहरे, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, राजाभाऊ लोणारी, संजय पगारे, विनायक भोरकडे, मच्छिंद्र थोरात, बाळासाहेब पिंपरकर, भागिनाथ पगारे, गोरख वैद्य, रौफ मुलानी, अशोक मेंगाणे, देविदास निकम, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, डॉ.प्रवीण बूल्हे, विजय जेजुरकर, अजित पवार, संतोष निकम, यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मतदारसंघातील विविध प्रसिद्ध धार्मिक स्थळांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत विकास करण्यात आला आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. येवला मतदारसंघ हा सतत दुष्काळाच्या छायेत होता. येथील दुष्काळ दूर करण्यासाठी मांजरपाडा प्रकल्प पूर्ण केला. यंदाच्या पावसाळ्यात दोनदा डोंगरगाव पर्यंत पाणी आले. शेकडो बंधारे भरले. काही लोकांना मात्र हे पाणी दिसत नाही अशी टीका त्यांनी केली.

ते म्हणाले की, मतदारसंघात विविध पाणी योजना राबविल्या जात असून पुढील दोन महिन्यात सर्व घरात नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. आता प्रत्येक घरात नळाने पाणी उपलब्ध झाल्यानंतर मतदारसंघातील सर्व समाज घटकातील एकही नागरिक घरापासून वंचित राहणार नाही. यासाठी आपण काम करून पुढील पाच वर्ष करू असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, विरोधक विकासावर नाही तर जातीवाद करून मत मागता आहे. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. मी कधीही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. उलट ज्या ज्या वेळी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा सगळ्यात आधी आपण पाठिंबा दिला आहे. मात्र काही लोक आपल्या विरोधात चुकीचा प्रचार करून संधी साधण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली.

यावेळी प्रचार प्रमुख प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर म्हणाले की, येवला सतत दुष्काळाच्या छायेत असल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते. महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागत होती. आज मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून विविध योजना मार्गी लागल्याने महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरला आहे. मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची कामे मतदारसंघात केली आहे. त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन अंबादास बनकर यांनी केले

शिवसृष्टी,मुक्तीभूमी, पैठणी यासह अनेक महत्वपूर्ण कामे मार्गी लावून मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्याचे नाव जगाच्या नकाशावर पोहचविले. आज या बलाढ्य नेत्याची आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी नितांत आवश्यकता असून त्यांना विक्रमी मतांनी निवडून द्यावे असे आवाहन येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांनी केले.

येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून येवल्याच्या विकासासाठी मंत्री छगन भुजबळ यांना प्रचंड मतांनी निवडून देण्यासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतील असा विश्वास भाजपचे राजेंद्र परदेशी यांनी व्यक्त केला.

यावेळी ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे, मायावती पगारे, संजय पगारे, विनायक भोरकडे, गोरख वैद्य, रौफ मुलानी, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, भागिनाथ पगारे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत मंत्री छगन भुजबळ यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.

दरम्यान यावेळी अखिल भारतीय सरपंच महासंघ परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला.

मंत्री छगन भुजबळ यांच्या उद्या येथे होणार सभा

मंत्री छगन भुजबळ यांची गुरूवार दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता रोकडोबा पार, सायगाव येथे प्रचार सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता मुखेड येथे तर सायं. ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, देवगाव, ता. निफाड येथे प्रचार सभा पार पडणार आहे..दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button