*ओबीसी मुस्लिम एकीकरणातून सामाजिक परिवर्तन शक्य. ओबीसी जन-मोर्च्याची भूमिका.*

*ओबीसी मुस्लिम एकीकरणातून सामाजिक परिवर्तन शक्य. ओबीसी जन-मोर्च्याची भूमिका.*
भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 60% असलेला ओबीसी समाज जो 386 जातीमध्ये महाराष्ट्रामध्ये विभागला गेलेला आहे .या समाजाला त्याचे हक्क व अधिकार मिळवून द्यायचे असेल तर पंधरा टक्के असलेल्या मुस्लिम बाधनवांशी वैचारिक देवाण-घेवाण करून सामाजिक परिवर्तन करून राजकीय अस्तित्व निर्माण करता येऊ शकते,
अशी भूमिका ओबीसी जनमोर्चाच्या वतीने आयोजित मोर्शी जिल्हा अमरावती या ठिकाणी आयोजित मुस्लिम ओबीसी समाज मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी आपली भूमिका व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी जन मोर्चा व राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी बहुजन पार्टी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून इंजिनीयर मोहम्मद हमीद इमान संघटना नागपूर हे होते ,
याप्रसंगी सुनिता काळे, मायाताई गोरे, डॉक्टर विलास काळे प्राध्यापक कमलनारायण उईके, इरफान खान मोहम्मद तौफिक पटेल, नंदकिशोर लेकुरवाळे ,जावेद काझी साहब, पठाण सर ,वानखडे काका ,मुख्य आयोजक महेंद्र भातकुले हे होते ओबीसी मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन आरक्षणाची लढाई संविधानाच्या चौकटीत राहून लढायची आहे आणि आपले हक्क आणि अधिकार मिळवून घ्यायचे आहे. ही भूमिका उपस्थित वक्त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. फुले शाहू आंबेडकर विचाराचे पाईक इंगळे काका यांनी केले.


