सोशल

संत भगवान बाबाचे लिंग छेद कोणामुळे? क्रमशा 9

संत भगवान बाबाचे लिंग छेद कोणामुळे? क्रमशा 9

 

गंगेच्या ऐलतीराला मुक्तेश्वर तर पैलतीराला भीवरनई देवीचे स्थान प्रसिद्ध होते. या भीवरनई देवस्थानाजवळ गंगा नदीत एक खोल डोह आहे. पूर्वी त्याची खोली खूप होती. नदीत खडकाचा भाग वर आलेला असल्यामुळे पाण्याच्या ओघाला वळण पडते. त्यामुळे तेथे भोवरा तयार होतो. या भोवऱ्यात माणूस किंवा जनावर चुकून सापडल्यास गटांगळ्या खाऊन मरणारच; पाण्याच्या ओघात भीवरनईच्या स्थानाकडे आपोआप फेकले जाई. काळाच्या ओघात त्याला अंधश्रद्धेचे रूप आले. चैत्र पौर्णिमेनंतर या देवीच्या नावाने नवस फेडण्यासाठी जत्रा भरत असे. एक एक बहाद्दर एकवीस एकवीस कोंबडे आणि बकरे मारून देवीची शांती करत असे.

भगवानबाबांना अशा पशुहत्यांची फार चिड होती. प. पू. नारायणबाबांच्या

जन्मस्थळी अशी पशुहत्या व्हावी याची माहिती मिळाल्यामुळे अत्यंत खेद झाला.

गोपाळराव देशपांडे राजकारभारात वजनदार आसामी होती. दहा-वीस गावात कायदेशीर व्यवस्था त्यांच्या नियंत्रणाखाली होती. ही हत्या बंद करण्यासाठीच ज्ञानेश्वरी निरूपणाचे आयोजन मुक्तेश्वराच्या ठिकाणी केले होते. जवळपासच्या दहा-बारा गावचे लोक ज्ञानेश्वरी निरूपण आणि कीर्तनासाठी येत असत. बाबांना जखम असल्यामुळे व्यासपीठावर बसून ज्ञानेश्वरी निरूपण करता येत नसल्यामुळे पखवाजाला लाकडी घोडी असते किंवा खळ्यात उफनण्यासाठी वावडी वापरतात तसे लाकडी व्यासपीठ तयार करवून घेतले होते. बाबा त्यावर आपले हाताचे कोपरावर टेकून उभे राहून निरूपण करीत

असत. कीर्तनासाठीसुद्धा तसेच उभे राहावे लागे. स्वतः शारीरिक कष्ट सोसत

असूनही लोक जागृती आणि ज्ञानेश्वरी निरूपण चालूच होते. गंगाविषयी बाबांना अत्यंतिक आदर आणि श्रद्धा होती. आपल्या रसाळ वाणीने बोलत, “तुम्ही गंगा किनारीचे ऋषी आहात, पुण्यवान प्राणी आहात. आमच्याकडे काय ? डोंगरात, दऱ्या खोऱ्यात राहणारे लोक, ससे, हरणे, डुकरे मारणारे, वाघुरी सांभाळणारे, मी तुम्हाला काय उपदेश करणार ! तुम्ही मुळचेच शुद्ध आणि पवित्र आहात, आमच्या भागातील कोणी कावडी घेऊन गंगाचे पाणी न्यावयास आला तर त्यांच्याकडून थेंब थेंब पाणी तळहातावर घेऊन

तीर्थ म्हणून प्राशन करतो.

तुम्ही किती भाग्यवान आहात ! तुम्हाला गंगास्नान मिळते. गंगेच्या पवित्र जलाने घरातील देवपूजा करता, नव्हे नव्हे वापरायलासुद्धा तेच पाणी मिळते. तुमची गुरे-ढोरे सुद्धा किती भाग्यवान आहेत. गाई कुठे चालल्या ? गंगेला. शेळ्या कुठुन आल्या ? गंगेवरून आल्या. सहजगत्या गंगा नाव तुमच्या मुखात येते. त्यामुळे सर्व पाप आपोआप धुऊन जाते.

• वाचे म्हणता गंगा-गंगा :-

वाचे म्हणतां गंगा गंगा । सकळ पापे जाती भंगा ।।१।। दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी ।।२।। कुशीवर्ता करिता स्नाने । त्यांचे वैकुंठी रहाणे ।।३।। नामा म्हणे प्रदक्षिणा । त्यांच्या पुण्या नाही गणना ।।४।।

परिसे वो माते माझी विणवणी । मस्तक चरणी ठेवितसे ।।१।। भागीरथी महादोष निवारणी । सकळा स्वामिनी तीर्थाचिये ।।२।। जितां भुक्ति मोक्ष मरणें तुझ्या तीरी। अहिक्य परत्री सुखरूप ।।३।। तुका विष्णुदास संताचे पोसणें । वाग्पुष्प तेणें पाठविले ।।४।।

साधु-संतांची प्रमाणं, अभंग गाऊन गंगामातेचे महत्त्व पटवून देत होते. भाविक भक्तीरसात न्हाऊन निघत होते. बाबांचे शुद्ध आचरण, अमृततुल्य वाणीने केलेले ज्ञानेश्वरीचे रसाळ निरूपण ऐकून लोक त्यांच्याकडे आकर्षिले गेले नाही तरच नवल ! बाबांच्या उपदेशामुळे भीवरणाआईला होणारी पशुहत्या, हिंसा कायमची बंद करण्याचे लोकांनी मान्य केले.

मानासिंग पाटलांचा थाट काही औरच होता. बाबांना रोज दुपारच्या जेवणासाठी बोलवित असत. पुढे वाजंत्री, मागे टाळ मृदंगासह रोज मुक्तेश्वरापासून वाजत गाजत दिंडी येई. पाटलाने दहा-वीस माणसे पायघड्या टाकण्यासाठी ठेवली होती. मुक्तेश्वर ते गुळज मधील मानसिंग पाटलाचा वाडा व परत बाबांची मिरवणूक निघत असे.

एक दिवस बाबा आणि सहकारी जेवण करून मुक्तेश्वराकडे रवाना झाले होते. नंतर आबादेव आणि मानसिंग पाटलांची जेवणं झाली. पान-सुपारी खात बैठकीत बसले. सहजच बाबांच्या लिंग छेदनाचा विषय निघाला. आबादेव १९६

सांगू लागले. “एकदा काय झाले, आषाढीला दिंडी चालली होती. बाबांवर

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button