शरणगाथा क्रमशा.30

शरणगाथा क्रमशा.30
मला तृप्ती झाली तर माझे रक्षण कर देवा, असे साकडेही ते घालतात. पाणी दिसले की, डुबकी मारतात, झाड दिसले की फेऱ्या घालतात, उष्णतेने बाष्प होणारे पाणी आणि वढून जाणाऱ्या झाडाला शरण जाणाऱ्या तुझी महिमा कसे जाणतील कुडलसंमदेव अशी खंत ते व्यक्त करतात.
विवाह संस्थेवर बसवण्णांची श्रद्धा आहे. त्यांनी पती-पत्नीना परस्पर विश्वास आणि एकनिष्ठतेचा सल्ला दिला आहे. बसवण्णांनी कठोर पत्नी निष्ठा सांगितली आहे. ईश्वर आणि पती त्याचप्रमाणे ईश्वर आणि पत्नी अशी सरळ निष्ठा सांगितली. म्हणूनच पती-पत्नी सम ान पातळीवर आणताना दोघांच्याही कर्तव्यावर तेवढ्याच तीव्रतेने ते सांगतात.
‘श्रमाने थकलेला, भूकेने व्याकूळ झालेला पती घरी आल्यानंतर त्याला जेवण न वाढता, तो खूप दुबळा झाला म्हणून दुःख करणारी पत्नी ढोंगी असल्याचे ठणकावतात. त्याच वेळी परधन आणि परस्त्रीपासून दूर राहण्याचा, त्यांना नाकारण्याचा निश्चय प्रत्येकाच्या मनाने करावा, असा आग्रह बसवण्णा धरतात.
वेदशास्त्र आगम वाचणारे, कवी, कथाकार, साहित्यकार, उच्च विद्याविभूषित, अभिनेते, कलाकार श्रेष्ठ असतील तर डोंबाऱ्याचा खेळ करणारा श्रमजीवी कनिष्ठ कसा आहे, असा प्रश्न विचारताना गुण, ज्ञान, आचार यांची साधना
केली तर तो सुध्दा श्रेष्ठ होय, असे सांगतात. शंभर वाचून, शंभर ऐकून काय प्रयोजन आशा सुटत नाही, रोष जात नाही. अभिषेक करून काय प्रयोजन ? वागण्या-बोलण्यात एकता नसलेल्या ढोंगींना पाहून हसतात, परधनाचा, परस्त्रीचा त्याग केल्याविना नदीत स्नान केले तर नदीच आटून जाण्याची व भीती बसवण्णांना वाटते. कोणतीही बाब आवाक्यात असेल तरच नियंत्रित करता येते, आपल्या हाताबाहेर गेलेल्या गोष्टींवर नियंत्रण मिळवणे नेहमीच कठीण असते हे सांगताना, ‘चुलीचा भडका उडाल्यास तत्काळ विझवणे शक्य आहे. पण धरा पेटल्यास-वणवा
विझवणे शक्य आहे का,’ असा सवाल करतात. बसवण्णांचे एकूणच जीवन तत्त्वज्ञान अंतरंग शुद्धी आणि बहिरंग शुद्धी अशा दोन्ही पातळीवर आहे. आयुष्य जगण्याची रीत बसवण्णांनी स्पष्ट केली आहे. म्हणजे जीवन कसे असावे याबाबत काही सूत्रे असे आपण म्हणूया. आपले जीवन कसे असावे, आपण काय करावे या बाबींवर त्यांनी केलेली चर्चा प्रत्येकासाठी आचारसंहिता ठरावी. त्यासाठी त्यांनी सप्तसूत्री सांगितली आहे. खोटेपणा नको,
चोरी नको, हिंसा नको, राग नको, परनिंदा नको, द्वेष नको,
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




