र्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीमध्ये उपवर्गीकरण करणे आणि क्रिमिलियर लावणे बाबतचा जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरुद्ध डॉ. जयश्री पाटील , गुणरत्न सदावर्ते यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात रिव्यू पिटीशन

सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीमध्ये उपवर्गीकरण करणे आणि क्रिमिलियर लावणे बाबतचा जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरुद्ध डॉ. जयश्री पाटील , गुणरत्न सदावर्ते यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात
रिव्यू पिटीशन नंबर 37792 /2024 दाखल केला आहे. सदर निर्णयाला चॅलेंज करताना म्हटले आहे की पार्लमेंटचे अधिकार हे अभेद आहेत आणि अनुसूचित जाती जमातीचा विषय हा पूर्णतः आरक्षणाच्या बाबतीतला पार्लमेंट आणि राष्ट्रपती महोदयांशी संबंधित आहे हा ओबीसी सारखा राज्य सरकार यांच्या अत्तरीतला नाही आहे
त्यामुळे हा निर्णय ह्यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा सहानी किंवा जर्नल सिंग ह्या निर्णयाच्या विरुद्ध आहे अनुसूचित जाती जमाती च्या बाबतीमध्ये होमोजीनियस क्लास हे डिफाइन आहे आणि म्हणून केवळ अनुसूचित जातीतला व्यक्ती शीख किंवा बौद्ध विचारासोबत जगण्याची मुभा आहे तेव्हा सर्वांकष अनुसूचित जातीची माणसं ही एकाच वर्गाची आहेत त्यामुळे त्याचं उपवर्गीकरण होऊ शकत नाही हा देखील कायदेशीर मुद्दा उपस्थित केला आहे


