मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मलबार हिल मुंबईतील वर्षा बंगल्यावर आमदार चंदू भाऊ यावलकर सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ किरण झोडगे अध्यक्ष भाजीपाला मार्केट नवी मुंबई यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन अरण विकासाबाबत दिले निवेदन !

https://www.facebook.com/shhttps://w
मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मलबार हिल मुंबईतील वर्षा बंगल्यावर आमदार चंदू भाऊ यावलकर सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ किरण झोडगे अध्यक्ष भाजीपाला मार्केट नवी मुंबई यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन अरण विकासाबाबत दिले निवेदन
https://www.facebook.com/share/r/16DVZYbcCX/
अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी आराम तीर्थक्षेत्राबद्दल सविस्तर माहिती सांगितली अरण तीर्थक्षेत्राचा विकास कोणत्या पद्धतीने कसा केला पाहिजे त्यासाठी कोणती पावलं उचलली पाहिजेत कोणत्या साधनसामुग्रीची आवश्यकता आहे कोणते उपाय केले पाहिजेत याबद्दल 40 वर्षअरण तीर्थक्षेत्राचे काम पाहत असलेले सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली मुख्यमंत्री यांनी सकारात्मक विचार करून वेळोवेळी निर्णय घेतले जातील असे आश्वासन देण्यात आले
निवेदाध्यवर्ती स्पाल केंद्र
दिनांक ८ जुलै २०२५
प्रति,
मुख्यमंत्री सचिवालय महाराष्ट्र शासन
माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई ३२ यांना सप्रेम नमस्कार सविनय सादर
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
विषय….. अरण, ता. माढा, जि. सोलापूर :-अ ” वर्ग तीर्थक्षेत्र विकासाबाबत
निवेदन देणार :- सत्यशोधक शंकरराव लिंगे,
आपणास विनंती करण्यात येत आहे की, आपण ४ ऑगस्ट २०२४ रोजी अरण येथे येऊन संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण अ वर्ग तीर्थक्षेत्र घोषित केल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. घोषणा करून आपण तसा राजपत्रित अध्यादेश काढल्याबद्दल आपले आभार.
मी शंकरराव लिंगे गेल्या ४० वर्षापासून संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण ला भेट देत आहे. त्या ठिकाणी सावता महाराज मंदिराच्या वाढ, विस्तार आणि त्याची प्रसिद्धी व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळे अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा. कारण तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी अनेक आंदोलने, सभा, मेळावे या ठिकाणी घेतलेले आहेत. सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून दरवर्षी १०० याप्रमाणे ७१२ जोडप्यांचा विवाह मंदिरासमोर मोफत लावून दिलेला आहे. त्याचप्रमाणे त्या वेळचे उपमुख्यमंत्री माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, माननीय प्रमोद महाजन साहेब यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन १९९९ ला सांगोला येथे सक्षम उमेदवार मिळत नसल्याने मला तेथून त्यांनी उमेदवारी देऊन मला राजकारणात येण्याची प्रथम संधी दिली. त्यानंतर काय राजकारण घडले त्याची सविस्तर माहिती समक्ष भेटीमध्ये सांगेन. त्याच वेळेला माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचेकडे ११ फेब्रुवारी १९९८ रोजी अकलूज येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृतिदिनानिमित आणि सहकार मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही मागणी केल्यानंतर हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये मुंढे साहेब यांनी अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिल्याचे जाहीर केले होते. परंतु १९९९ ला भाजपचे सरकार आले नाही आणि नंतर आघाडी सरकार त्या ठिकाणी आले. त्यामुळे तो दर्जा मिळाला नाही किंवा आघाडी सरकारनेही दिला नाही. त्याच काळामध्ये माननीय सभापती ना. स. फरांदे सर, उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, त्यानंतर एकदा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तसेच अनेक वेळा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, मंत्री पंकजाताई मुंडे यांनी अरणला भेट देऊन त्या ठिकाणी मेळावे घेऊन अनेक विकास कामांची घोषणा केली. परंतु अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आजपर्यंत मिळाला नव्हता. आपण तो घोषणे प्रमाणे दिल्याबद्दल सर्व सावता महाराज प्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिल्यानंतर या मंदिराचा विकास खर्या अर्थाने व्हायचा असेल तर प्रथम या मंदिराचे जुने १९५२ सालचे ट्रस्ट बरखास्त केले पाहिजे. मंदिर अधिग्रहण कायदा लागू केला पाहिजे. पंढरपूर, शिर्डी, सिद्धिविनायक- मुंबई अशा मंदिराचा दर्जा संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण ला दिला पाहिजे आणि ज्या कायद्याने ही मंदिरे शासनाने ताब्यात घेतली आहेत त्या कायद्याने हे सुद्धा मंदिर ताब्यात घ्यावे. मंदिरामध्ये दररोज कमीत कमी ३० ते ४० हजार रुपये देणगी म्हणून जमा होतात. महाराष्ट्रभर फिरून लाखो रुपये जमा करतात. परंतु मंदिराचा विकास मात्र दि सासवड माळी शुगर फैक्टरी माळीनगर, छगनरावजी भुजबळ साहेब, नाशिकचे सर्व मंडळी आणि महाराष्ट्रातील सर्व सावता भक्तांनी केलेला आहे. मंदिरामध्ये साधी लाईट सुद्धा आकडा टाकून घेतली जाते.
ट्रस्टचे नाव सावते बाबा मंदिर ट्रस्ट असे आहे ते बदलून ‘संत शिरोमणी सावता महाराज… संजीवन समाधी, तीर्थक्षेत्र अरण’ असे नाव ठेवण्याबद्दल अनेक वेळा विनंती केली. तरी ते ऐकत नाहीत. पावती मात्र संत शिरोमणी सावता महाराज मंदिर ट्रस्ट अशा नावाने फाडतात. म्हणून मंदिर अधिग्रहण कायद्याद्वारे या मंदिराचाही ताबा शासनाने घ्यावा आणि त्या ठिकाणी शासकीय समिती निर्माण करावी. या शासकीय समितीमध्ये महाराष्ट्रातील सर्व सावता महाराज प्रेर्मीचा, जाणकार आणि काही अधिकारी यांचा समावेश व्हायला हवा आणि या समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी साहेब, उपाध्यक्ष म्हणून मला म्हणजे सत्यशोधक शंकरराव लिंगे यांस सेवा करण्याची संधी द्यावी.
साहेब आपणास कळकळीची विनंती करत आहे, कारण मला या परिसराचा आणि सावता महाराज यांच्या कार्याचा संपूर्ण अभ्यास आणि माहिती आहे. महाराष्ट्रभर भी फिरलेलो आहे, देशभर फिरलेलो आहे. काश्मीर पासून पांडिचेरी पर्यंत सर्व सावता प्रेमींना मी भेटी दिलेल्या आहेत. अमेरिकेमध्ये सुद्धा सावता महाराजांचा विचारांचा प्रसार केलेला आहे. यामध्ये मला निव्वळ सावता महाराज यांची सेवा करण्याची संधी आपण द्याल अशी आशा वाटते म्हणून विनंती करत आहे. मंदिर परिसरामध्ये यात्रा पटांगण, नारळ हंडीसाठी स्टेडियम वजा प्रांगण, मंदिराचे सुशोभीकरण, जीर्णोद्धार, विहिरीचा जीणोंद्वार ऐतिहासिक महत्व अबाधित ठेवून करावे. अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा द्यावा आणि पर्यटन क्षेत्राच्या सर्व सुविधा निर्माण कराव्यात, गावचे रस्ते, गटार, पाणी व्यवस्था आधुनिक असावी. वारकरी संशोधन केंद्र असावे, वारकऱ्यांसाठी राहण्यासाठी सुसज्ज असे भक्तनिवास आपण करणारच आहात. त्याचबरोबर सावता महाराजांनी अंघश्रद्धेला फाटा देऊन अनेक गावातील लोकांना निर्भय बनवले होते, साथीच्या रोगांमध्ये वन औषध देऊन रोग आटोक्यात आणला होता म्हणून त्यांच्या नावाने वनौषधी संशोधन केंद्र स्थापन करावे. त्यासाठी लागणारी १७ एकर जमीन माझ्याकडे आहे. तो प्रोजेक्ट आपण करून मेंटेन करण्यासाठी माझ्याकडे ठेवला तरी मी त्याचे काम करण्यास तयार आहे. त्यासाठी माझे ट्रस्ट आहे आणि ट्रस्टच्या नावावरच जमीन आहे. सावता महाराजांच्या विचारांचे प्रसारण, प्रचार-प्रसार करण्यासाठी ‘संत महात्मा विचार विद्यापीठ’ चालवण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठीही अरण मध्ये मंदिराजवळच माझी ३० आर जमीन आहे. सावता महाराजांच्या ऐतिहासिक विहिरीमध्येही जी गावठाण च्या जागेमध्ये आहे, त्यामध्येही माझा हिस्सा आहे हे सर्व काम शासनाने करून ते कायमस्वरूपी मेन्टेन करण्यासाठी माझे २५ वर्षांपूर्वीचे ट्रस्ट ‘संत सावतामाळी प्रतिष्ठान’ हे तयार आहे. म्हणून वनौषधी संशोधन केंद्र संत महात्मा विचार विद्यापीठ यांची उभारणी करून ते चालवण्यासाठी संत सावतामाळी प्रतिष्ठान यांच्या ताब्यात द्यावे अशी मी आपणास आदर युक्त विनंती करत आहे.
संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण या तीर्थक्षेत्रासाठी विकास कामाचे जे जे मुद्दे असतील ते वेळोवेळी मी आपणास त्या विषयावर सखोल माहिती देण्यासाठी आणि आवश्यकता असल्यास सावता महाराजांचा सेवक म्हणून मी त्या ठिकाणी काम करण्यास अहोरात्र तयार आहे. सध्या या तीर्थक्षेत्राची अवस्था अतिशय बिकट आहे. या ठिकाणी शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी निधी देऊन अनेक ठिकाणी बांधकामे केली आहेत परंतु त्याचे मेन्टेनन्स व्यवस्थित नसल्यामुळे बांधकामे अडगळीत पडली आहेत याची खंत वाटते. त्यासाठी मंदिर अधिग्रहण कायदा लागू करून शासनाच्या ताब्यात हे मंदिर घ्यावे आणि शासकीय कमिटी त्वरित निर्माण करावी ही नम्र विनंती. सोबत पंढरपूर मंदिर अधिग्रहण कायद्याचे पुस्तक जोडले आहे
आपला विनीत,
सत्यशोधक शंकरराव लिंगे,
राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ
माहितीसाठी सादर
१. माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, मंत्रालय मुंबई ३२ 30
२. माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब, ग्रामविकास पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री, मंत्रालय मुंबई ३२ ३.
माननीय अतुलजी सावे साहेब, ओबीसी बहुजन विकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री, मंत्रालय मुंबई ३२
मध्यवर्ती टपाल केंद्र मंत्रालय
अनुक्रमांक: . 87 . 88. 89
शिवक्रांती टीवी दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा♦


