सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.87

सत्यशोधकाचे अंतरंग
क्रमशा.87
कृष्णाजी चौधरी हे करजगावातील ‘शंकरराव ए. व्ही.’ शाळेत सेवक म्हणूनही नोकरीस होते. ते करजगाव येथील सहकारी पतपेढ्यांचेही काम पाहत असत. ओतूरकर शास्त्री महाधट आणि शास्त्री धर्माजी डुंबरे यांचे १९०० सालच्या ऑक्टोबर महिन्यात करजगावी आगमन झाले. या दोहो फिरत्या प्रचारक सत्यशोधकांनी करजगावी कृष्णाजी लक्ष्मण सोनार यांच्या वाड्यात लगेचच एक बैठक घेतली. या बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी करजगाव सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करण्यात आली. ही विदर्भातील पहिली सत्यशोधक शाखा होय. ही शाखा स्थापन करण्यात चौधरींचा महत्त्वाचा सहभाग राहिला.
१९०२ साली चौधरी यांनी पुढाकार घेऊन सत्यशोधक कृष्णराव भालेकरांचे करजगावी सत्यशोधक मताचे व्याख्यान घडवून आणले. पुढे ३ व ४ एप्रिल १९०६ रोजी सत्यशोधक शाहीर भीमराव महामुनी यांच्या ‘भीमपुराणा’चा कार्यक्रम करजगावी घडवून आणण्यात चौधरी अग्रभागी होते. पार पुढे म्हणजे १९३८ साली जातवार शिक्षण परिषद आयोजनांवर चौधरी यांनी टीकाही केली. मात्र, १९०७ सालच्या पहिल्या व तनंतरच्या मराठा शिक्षण परिषदांना ते हजेरी लावताना दिसतात! मात्र, जातवार शिक्षण परिषदांचे आयोजन होत असताना मराठी मुलखातील सत्यशोधकांनी सत्यशोधक परिषदेचे आयोजन व्हावे म्हणून सत्यशोधकी पत्रांमधून पत्रे लिहून एक मोहीम राबवली. या वैचारिक मोहिमेला चौधरी यांनी ‘दीनबंधु’ आणि ‘दीनमित्र’ आदी पत्रांमध्ये लेखन करून प्रोत्साहित केले होते.
सत्यशोधक समाजाचे पहिले अधिवेशन १७ एप्रिल १९११ रोजी पुणे येथे संपन्न झाले होते. या अधिवेशनाला चौधरी आपल्या करजगावकर सत्यशोधकांसह आवर्जून उपस्थित होते. या अधिवेशन फंडाला त्यांनी एक रुपया देणगीही दिलेली आहे. समाजाचे यानंतरचे दुसरे अधिवेशन नाशिक मुक्कामी ५ एप्रिल १९१२ रोजी संपन्न झाले. याप्रसंगी चौधरी अ. भा. सत्यशोधक समाजाचे सहसचिव होते. त्यांनी या अधिवेशनात ठराव सत्रात एक ठरावही मांडला होता. सासवड येथे समाजाचे चौथे अधिवेशन (२५ व २६ एप्रिल १९१४) भरले. या अधिवेशनात अ. भा. सत्यशोधक समाजाची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. डॉ. संतुजी रामजी लाड अध्यक्ष असलेल्या कार्यकारिणीत चौधरी सचिव होते. अहमदनगर येथील (११ व १२ मे १९१५) समाजाच्या पाचव्या अधिवेशनात नाशिक विभागाकरिता फिरते उपदेशक म्हणून चौधरी यांची निवड करण्यात आली होती. थोडक्यात, सत्यशोधक अधिवेशनांना नियमित उपस्थित
राहून सतत ५७ वर्षे सत्यशोधक मताचा प्रचार, प्रसार त्यांनी केला. १६ डिसेंबर १९२१ रोजी करजगावात ‘दक्षता सभा’ स्थापन करण्यात आली. या प्रक्रियेतही चौधरींचा मोलाचा सहभाग राहिला.
कृष्णाजी कर्काजी चौधरी यांनी मोजके; पण अनमोल सत्यशोधकी मतांचे लेखन केले आहे. ‘अज्ञानांजन’ (१९०३), ‘शेतकऱ्याचे दुःखोद्गार’ (१९०७), ‘भाग्यवान सुशीला अथवा विवाहविषयक सत्यशोधकी मार्ग’, ‘निराश्रित हिंदूंचे धर्मगुरू आणि राष्ट्रहित’, ‘नवीन जमाखर्च पद्धती’ आदी ग्रंथांचे लेखन केले. ‘नवीन जमाखर्च पद्धती’ हा ग्रंथ अनुपलब्ध आहे. तसेच मो. तु. वानखडे यांचा ‘स्वयंपुरोहित’ ग्रंथ त्यांनी १९०९ साली प्रकाशित केला.
‘अज्ञानांजन’ ही १९ पृष्ठांची पुस्तिका कृष्णाजी चौधरी यांनी बडोदा वत्सल छापखाना बडोदा येथून मुद्रित केली असून, करजगावकर सत्यशोधक गंगाराम बाळाजी गणोरकर या पुस्तिकेचे प्रकाशक आहेत. एक आणा किंमत असलेल्या या पुस्तिकेत अज्ञानी आणि आर्थिक दुर्बलग्रस्त शेतकऱ्यांनी स्वयंप्रगती करून घ्यावी म्हणून लेखकाने सुचविले आहे.
‘शेतकऱ्याचे दुःखोद्गार’ ही कृष्णाजींची ३६ पानी लहानशी; पण शेतकऱ्यांसाठी, सरकारसाठी बहुगुणी बहुपेडी अशी पुस्तिका आहे. १९०७ सालच्या जुलै महिन्यात विद्यासागर प्रेस, मुंबई येथून प्रसिद्ध झाली आहे. प्रस्तुत पुस्तिका प्रसिद्ध होण्यापूर्वी या पुस्तिकेचे ६ जानेवारी १९०६, २१ एप्रिल १९०६, ५ मे १९०६, १९ मे १९०६ आणि ७ एप्रिल १९०७ रोजी क्रमशः भाग दीनबंधु पत्रामधून प्रकाशित झाले आहेत. शेतकऱ्याच्या दैन्यावस्थेचे चित्रण प्रस्तुत पुस्तिकेत चितारले असून या पुस्तिकेवर महात्मा फुले आणि कृष्णराव भालेकर यांच्या लेखनाचा प्रभाव जाणवतो.
‘निराश्रित हिंदूंचे धर्मगुरू आणि राष्ट्रहित’ ही पुस्तिका आरंभी ‘दीनबंधु’ पत्रातून १९०७ सालच्या जुलै महिन्यानंतर क्रमशः प्रसिद्ध झाली. ‘भाग्यवान सुशीला…’ हे संवादवजा नाटक असून २६ डिसेंबर १९२८, ९ जानेवारी १९२९ आणि ३० जानेवारी १९२९ च्या ‘दीनमित्र’ पत्राच्या अंकातून प्रसिद्ध झाले आहे. ‘दीनमित्र’ पत्रात चौधरी यांचे स्फुटलेखन, लेख, पत्रं
/
(87)
शिवक्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकररावलिंगी 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा


