राजकारण
गाव बंदी च्या विरूध्द..
*गाव बंदी च्या विरूध्द..*
*गावात प्रवेश..*
*किंवा राजकीय नेत्याचे स्वागत..*
*अशी विरोधी भूमिका ओबीसी समाजाला घ्यावी लागणार आहे..*
*नाहीतर सरकारला हतबल होऊन ओबीसी विरोधी निर्णय घ्यावा लागेल..*
याचा ओबीसी ने विचार करावा…
*ज्या गावात ओबीसी 50% पेक्षा जास्त आहेत अश्या गावाने..*
*लगेच राजकीय नेत्याचे गावात स्वागत असे पोस्टर लावले पाहिजे…*
*गावात काय फक्त एक समाज राहत नाही, बाकीच्या समाजातील लोकांचे नुकसान कशासाठी?*
*आज नेत्यांना बंदी केली जात आहे, उद्या गावातील लोकांना बंदी करतील..*
*या हुकूमशाही विरोधात निर्णय घेऊन त्वरित कार्यवाही करावी लागणार आहे..*
*ओबीसींची एकता*
*ओबीसींची सत्ता*
जय ओबीसी सत्यशोधक दिन बंधू न्यू संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01
*ओबीसी देशपर राज करेगा…. सबके हित की बात करेगा*
ही घोषणा देत सर्व धर्मातील ओबीसी घटकातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन *सर्वसमाज ओबीसी महाआघाडी* स्थापन केली. ओबीसी समाज देशाच्या स्वातंत्र्यानंतरही सामाजिक न्यायासाठी संघर्ष करीत आहे, त्यांच्या हिस्सेदारी बाबत मागणी करत आहे पण या व्यवस्थेने अजूनही ह्या बहुसंख्य समाजाला परिघाबाहेर ठेऊन त्यांचे प्रतिनिधित्व नाकारले आहे. ओबीसी समाज फक्त मतदान करणारा घटक इतकी संकुचित मनोवृत्ती घेऊन राजकीय पक्षांनी त्याचा वापर केला आहे. पण आता ओबीसी समाज बदलत आहे तो स्वतःचे राजकीय आव्हान प्रस्थापित व्यवस्थेसमोर निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. *सर्वसमाज ओबीसी महाआघाडी* ची तिसरी बैठक *ईस्लाम जिमखाना, मरीन लाइन्स* येथे पार पडली. ओबीसी समाजासाठी तळागाळात काम करणाऱ्या ६० संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. त्यांनी एकमताने या आघाडीची घोषणा केली आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाज स्वतःचा राजकीय पर्याय घेऊन मैदानात उतरेल यावर सर्वांचे एकमत झाले आहे.
सदर बैठकीस *नितीन चौधरी, पी. बी.कोकरे, सचिन बनसोडे, सुनिल खोब्रागडे, शांताराम आंग्रे,डॉ. प्रशांत बोंबे, संतोष जंगम, राम वाडिभस्मे, प्रशांत हडकर, संजय नार्वेकर,विनायक सुर्वे* इत्यादी उपस्थित होते.
सदर बैठकीचे निमंत्रक व आयोजक *संतोष आंबेकर, आकिफ दफेदार, कांचन नाईक, अनिता पाटोळे, मतिन खान,अय्युब कुरेशी, शहानवाज थानावाला, गंगाराम पेडणेकर, मो. आसिफ कुरेशी* यांनी केले होते.
सदर बैठकीत पुढील ठराव संमत करण्यात आले व लवकरच याबाबत आक्रमक भूमिका घेतली जाणार आहे असे ठरवले आहे.
१) *राज्य सरकारने कंत्राटी कामगार भरतीच्या निर्णयाचा निषेध केला*
२) *सरकारी शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला*
३) *महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत ओबीसी समाजाला मिळालेल्या २७%आरक्षणाला डावलून कमी प्रतिनिधित्व दिले गेले आहे, त्यासाठी महानगर पालिकेने जातीनिहाय जनगणना केली पाहिजे*
४) *बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात जातीनिहाय जनगणना करण्यात आली पाहिजे*
५) *शिष्वृत्तीचा मांडलेला बाजार बंद केला पाहिजे*
६) *मॉब लिंचींग विरोधात कठोर कायदे केले पाहिजेत*
७) *मॉब लिंचिंग आता केवळ मुस्लिम धर्मापुरती मर्यादित राहिली नसून मुंबई मध्ये जय श्रीरामचा नारा दिला नाही म्हणून हिंदु मुलांना मारहाण झाली. हिंदु धर्मातील बहुजन समाजाला त्याचा फटका बसत आहे*
८) *केंद्र सरकारने ५०% आरक्षणाची मर्यादा वाढवून ७५% पर्यंत करावी त्यात मराठा समाज, मुस्लिम समाजाला सामावून घ्यावे*
९) *येऊ घातलेल्या शिक्षक मतदार संघ व पदवीधर मतदार संघ निवडणुकीत सर्व समाज ओबीसी महाआघाडी स्वतःचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे*
विविध मागण्यांवर चर्चा झाली आहे.
*सर्वसमाज ओबीसी महाआघाडी*