मंडलनामा क्रमशः 44.महामंडळाच्या कार्यालयात चौकशी

मंडलनामा क्रमशः
44.महामंडळाच्या कार्यालयात चौकशी
महात्मा फुले महामंडळाच्या कार्यालयात उद्या जातो, असे दिलीपकुमार म्हणाले होते. ते येतील की नाही माहीत नव्हते. पण मला विश्वास वाटत होता, ते येतील. तेव्हा महामंडळाचे कार्यालय सांताक्रुजला होते. अॅड. जनार्दन पाटील, ओबीसी संघटना व समाजवादी नेत्यांच्या आग्रहामुळे पुलोद सरकारच्या (पुरोगामी लोकशाही दल) काळात मुख्यमंत्री शरद पवार यांनी महामंडळ स्थापना केले. त्याद्वारे अनेकांना व्यवसायासाठी अर्थपुरवठा केला जातो. महामंडळाचे अध्यक्ष होण्याची जनार्दन पाटील यांची इच्छा होती पण बाबुराव भुजबळ अध्यक्ष झाले.
दिलीपकुमार येणार असल्याने मी तेथे लवकर पोहोचलो. ते आले. दिलीपकुमार महामंडळाच्या कार्यालयात आल्यामुळे एकच धावपळ उडाली. मी आधीच तेथील अधिकाऱ्यांना भेटून दिलीपकुमार येणार असल्याचे सांगितले होते. पण त्यांचा विश्वास बसला नाही. दिलीपकुमार आल्यानंतर खरे वाटले. काही मुस्लिम ओबीसींना व्यवसायासाठी अर्थसाह्य केल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. दिलीपकुमार यांनाही माझ्या बोलण्यातील सत्यता पटली.. आतापर्यंत आमचे बोलणे विशिष्ट अंतर राखून होते. ते माझ्या जवळ आले व माझा हात हातात घेऊन हळुच दाबला. हात तसाच पकडून ते म्हणाले, तू खूप महत्त्वाचे काम करत आहेस. माझ्या माहितीप्रमाणे सर्वसामान्य मुसलमानांसाठी सर्वस्व वाहून घेणारा तू एकटा आहेस. मी आजपासून तुला शब्बीर म्हणणार नाही मुजाहेद म्हणेन. मुजाहेद म्हणजे समाजासाठी सर्वस्वाचा त्याग करणारी व्यक्ती.
‘मी काय करू शकतो सांग. तू म्हणेल ती मदत मी करेन.’ दिलीपकुमार यांनी आश्वासक शब्द दिला.
मी म्हणालो, ‘तुमचा आशीर्वाद व सहकार्य असू द्या.’ ते म्हणाले, ‘ते तर राहीलच. मी तुमच्यासाठी आत्ता काय करू शकतो ?’
मी हज हाऊसमध्ये मेळावा घेण्याचा विचार करत होतोच. मी म्हणालो, ‘मंडल आयोगाबद्दल मुस्लिमांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी हज हाऊसमध्ये मेळावा घेण्याचा विचार करत आहे. या मेळाव्याला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून या. यामुळे खूप मदत होईल. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामविलास पासवान व सुबोधकांत सहाय यांना बोलावणार आहे.’
दिलीपकुमार यांनी माझ्याकडे पाहिले. हा तरुण केंद्रीय मंत्र्यांना कार्यक्रमाला आणू शकतो ?, असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. त्यांनी विचारले, ते येतील ? मी म्हणालो, येतील.
ते म्हणाले, ‘तू खूप मोठे काम करत आहेस. मी नक्की येणार.’
महामंडळाच्या कार्यालयातून दिलीपकुमार निघून गेले. त्यांनी मुस्लिम ओबीसी मेळाव्याला येण्याचे कबूल केले. ते मेळाव्याला नक्की येतील, असा विश्वास वाटला. मी दिलीपकुमारांचा शब्द मिळवला. त्यांनी हातात घेतलेला हात मी पुन्हा पुन्हा पाहत होतो. त्यांचे शब्द माझ्या कानात घुमत होते, ‘तुला मी शब्बीर नाही मुजाहेद म्हणणार !’ माझ्या अंगात हत्तीएवढे बळ आले.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴


