सोशल

महाविकास आघाडी कडुन गाजावाजा करत सिद्धाराम म्हेत्रे यांचा अर्ज दाखल

महाविकास आघाडी कडुन गाजावाजा करत सिद्धाराम म्हेत्रे यांचा अर्ज दाखल

[gspeech-button]

प्रतिनिधी l अक्कलकोट
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी कडुन माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी रँलीकाढुन शक्तीप्रदर्शन करत सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.
सकाळी अकरा वाजता प्रमिला पार्क काँग्रेस कार्यालय येथुन रँलीला सुरूवात झाली. बँन्डच्या तालावर जयघोष करीत शहरातील प्रमुख मार्गावरून रँली काढण्यात आली. प्रमिला पार्क, बसस्थानक, विजय कामगार चौक, कारंजा चौक, मेन रोड, फत्तेसिंह चौक, जुना तहसिल , कमलाराजे चौक, एवन चौक येथुन रँली काढुन काँग्रेस कार्यालय येथे समारोप करण्यात आला. यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, अश्पाक बळोरगी, मल्लिकार्जुन पाटील, शितल म्हेत्रे, रईस टिनवाला, प्रथमेश म्हेत्रे, बाबासाहेब पाटील, बाबुराव पाटील, शिवराज म्हेत्रे, घटक पक्षाचे आनंद बुक्कानुरे, बंदेनवाज कोरबुआदीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी वटवृक्ष श्री स्वामी दर्शन घेऊन विजय गणपती, लक्ष्मी पुजन करून रँलीची सुरूवात करण्यात आली.
रँली झाल्यावर समारोप प्रसंगी प्रकाश दुपारगुडे, व्यंकट मोरे, मल्लिकार्जुन पाटील, शकंर म्हेत्रे, अश्पाक बळोरगी, धनराज धानशेट्टी, पिंटु पाटील आदीनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना काँग्रेसच्या उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांनी भाजपावर जाती पातीचे राजकारण करत असल्याची टीका करताना भविष्यात
आरोग्य, शिक्षण व उर्वरित तालुक्यातील सिंचन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले.

चौकट १) मोठा गाजावाजा करत शक्तीप्रदर्शन- उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी मोठा गाजावाजा करत भव्य रँली काढुन उमेदवारी अर्ज दाखल केला. बँन्ड पथकाच्या निनादात जल्लोषात रँली काढण्यात आली. महाविकास आघाडीचे झेंडे, बँनर, फटाक्याची आतिषबाजी करत नागरिक रँलीत सहभागी झाले .

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button