🟠ओबीसी च्या बातम्या🟠

🟠ओबीसी च्या बातम्या🟠
महाराष्ट्र राज्यात १९९३ साली मुस्लिम ओबीसी चळवळ सुरू झाली. या चळवळीतीने प्रथमच मुस्लिम समाजाचे लिन समाजाने शैक्षणिक आणि राजकीय प्रतिनिधित्वाचे प्रश्न ऐरणीवर आणले. याच चळवळीने राज्यात मुस्लिम समाजाच्या वेगवेगळ्या जमाती बिरादरी यांना संघटीत करुन त्यांच्या विकासाचे प्रश्न अधोरेखित केले. या चळवळीला कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद रहावा व मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, प्रश्नावर संघटीत व्हावे या उदात्त हेतूने ईरफान सर यांनी पंचवीस वर्षांपूर्वी जिओ और जिने दो या पाक्षिकाचे प्रकाशन सुरू केले. मुस्लीम ओबीसीचे मुखपत्र २५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे,
ही आनंदाची बाब आहे. ” पाक्षिक जिओ और जिने दो’ची पंचवीस वर्षाची वाटचाल संस्मरणीय बनवण्यासाठी “हमारी सियासी पहचान” या पुस्तकाचे देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान सभेमध्ये असलेले मुस्लिम, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंत राज्यातील ३६ जिल्ह्यातील मुस्लिम सदस्यांची माहिती या पुस्तकात समाविष्ट आहे. यावेळी कामगार नेते आडम मास्तर, डॉ. श्रीमंत कोकाटे, डॉ. करीम सालार, बेगम आबेदा ईनामदार, हाजी इलियास सेठ, हाजी सय्यद सलीम शेठ, हाजी अ. जब्बार सेठ, हाजी नसिरअहमद खलिफा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना “फखरे मिल्लत” या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून त्याचबरोबर “जियो और जिने दो मित्र पुरस्कार” देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तीन वेळा शौर्यपदक विजेता माजी राज्यमंत्री अझहर हुसेन, माजी पोलीस उपायुक्त ईसहाक बागवान, इस्लाम जिमखानाचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. युसूफ अभ्यासनीय हे उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रम शनिवार दि.3 ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ठीक १०-३० वा. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे
संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमास आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही करीत आहोत.
आपले
इरफान एस.एम. (संपादक जिओ आणि जिने दो) हसीब नदाफ, आसिफ ईकबालसर ,सरफराज अहमद ,सय्यद गुफरान.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




