सोशल

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत स्पष्ट खुलासा न केल्यास आत्मदहन

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत
स्पष्ट खुलासा न केल्यास आत्मदहन
ओबीसी सुवर्णकार समितीचे गजूभाऊ घोडके यांचा इशारा
नाशिक- मराठा समाजास सरसकट आरक्षण मिळावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केल्यानंतर कुणबी जातीच्या नोंदी पटापट सापडू लागल्या हे तर आश्चर्यच म्हणावे लागेल.मूळ ओबीसी समाजास अंधारात ठेवून संपूर्ण मराठा समाज ओबीसीत आणण्याचाच राज्य शासनाचा हा एक प्रकारे डाव असल्याचे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे याबाबत स्पष्ट खुलासा शासनाने लवकरात लवकर न केल्यास 10 जानेवारी 2024 रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करू,असा इशारा ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजूभाऊ घोडके एका पत्रकाद्वारे दिला आहे.
ओबीसी समाजाच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण दिले जाईल असे बेंबीच्या देठापासून सांगायचे अन दुसरीकडे मात्र ओबीसींच्याच आरक्षणाच्या टक्केवारीत मराठा समाजास आणायचे आणि ओबीसींवर अन्याय करायचा हा शिंदे सरकारचा कुटील डाव असून ओबीसी समाज हा डाव निश्चितच हाणून पाडेल हे शासनाने लक्षात घ्यावे.जरांगे पाटील बोले आणि शासन डोले हे आम्ही मुळीच खपवून घेणार नाही.

56 लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा करण्यात येत आहे.त्यात रक्ताच्या नात्याचे लोक पकडले तर ही संख्या दीड कोटीपर्यंत जाईल. म्हणजेच मराठा समाजाला अपेक्षित ते सर्व देण्याची सरकारची तयारी आहे.हेच यावरून सिद्ध होत आहे.कुणबी समाज ओबीसीत मोडतो हे गृहीत धरून त्यांना ओबीसीमध्येच आणले जाईल आणि मूळ ओबीसी समाजावर त्यामुळे एक प्रकारे अन्यायच होणार आहे. ओबीसी समाजाच्या हितासाठी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ जीवाचे रान करीत आहेत .परंतु त्यांच्याकडे विशेष लक्ष न देता जरांगे पाटील यांच्यासाठी मात्र पायघड्या टाकल्या जात आहेत.

शासनाचे प्रतिनिधी त्यांना सर सर म्हणून त्यांच्याशी सातत्याने चर्चा करीत आहेत.ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचा आरक्षण दिले जाईल असे सांगताना हे अधिकचे आरक्षण कसे देणार याचा स्पष्ट खुलासा मात्र शासन करत नाही.त्यामुळे ओबीसी समाज नाराज असून शासनाच्या भूमिकेबद्दल शंका घेण्यास निश्चितच वाव आहे.त्यामुळे शासनाने याबाबत त्वरित काय तो खुलासा करावा आणि मराठा समाजास आरक्षण देताना मूळ ओबीसी समाजावर अन्यायहोणार नाही त्याची काळजी घ्यावी. याबाबत लवकरात लवकर स्पष्टीकरण न दिल्यास 10 जानेवारीरोजी ओबीसींच्या हितासाठी मंत्रालयात आत्मदहन करणार आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असा इशाराही गजू घोडके यांनी पत्रकात दिला आहे. दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा पोस्ट फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button