महाराष्ट्र

राज्यात पुढील 8 दिवस जोरदार पावसाची शक्यता; पंजाबराव डख यांचा मोठा इशारा

महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन सुरू झाले असून तळकोकणात मान्सून दाखल झाला आहे. यानंतर राज्यातील पावसाच्या पुढील वाटचालीबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, पुढील काही दिवसांत मान्सून हळूहळू राज्यभर सक्रिय होणार असून अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

डख यांच्या अंदाजानुसार, 8 जूनपासून मान्सूनची प्रगती अधिक वेगाने होईल. 8 आणि 9 जूनदरम्यान तो टप्प्याटप्प्याने पुढे सरकेल आणि 14 जूनपर्यंत महाराष्ट्राचा मोठा भूभाग व्यापेल. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांपर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

भारतीय हवामान विभागानेही राज्यातील 25 जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी आणि प्रशासनाने सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठीही पंजाबराव डख यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी पेरणीची घाई करू नये असे सांगितले असून, शेतात पुरेशी ओल असल्याची खात्री झाल्यानंतरच पेरणी करावी असे आवाहन केले आहे. फक्त वरवरची ओल असल्यास पेरणी टाळावी, अन्यथा नुकसान होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 15 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रातील बहुतांश भाग व्यापण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आठवडा राज्यासाठी मान्सूनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

मान्सूनच्या प्रगतीमुळे उष्णतेपासून दिलासा मिळणार असला तरी काही भागांत अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button