महाराष्ट्र

संत सावता महाराज मंदिरासाठी १० कोटींचा निधी; जागा खरेदी प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश

संत सावता महाराज मंदिरासाठी १० कोटींचा निधी; जागा खरेदी प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश

📍 सोलापूर | ११ मे २०२६

सोलापूर जिल्हा नियोजन भवन येथील सभागृहात राज्याचे सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संत शिरोमणी श्री सावता महाराज संजीवन समाधी मंदिर स्मारक आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीत संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिरासाठी आवश्यक असलेल्या जागा खरेदीसाठी शासनाकडून १० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली. प्रशासनाने जागा खरेदीची कार्यवाही तात्काळ सुरू करून त्यानंतर अनुषंगिक विकास कामांची टेंडर प्रक्रिया राबवावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी दिले.

“येथे मंदिर हा मुख्य विषय असून या कामात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. हजारो वर्ष समाजाला प्रेरणा व ऊर्जा देणारे हे भव्य स्मारक व्हावे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच मंदिराचे डिझाईन आकर्षक, भव्य आणि मोठ्या जागेत उभारण्याबाबतही त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.

या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कार्तिकियेन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, माढा प्रांत अधिकारी जयश्री आव्हाड, मंगळवेढा प्रांत अधिकारी अमित माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अशी माहिती सत्यशोधक शंकरराव लिंगे, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ यांनी दिल

📢 सोशल मीडिया संदेश

दिन बंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01

हा नंबर आपल्या सोशल मीडिया व व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जोडा.

👉 बातमी लाईक करा
👉 शेअर करा
👉 सबस्क्राईब करा
👉 फॉरवर्ड करा
👉 कॉमेंट करा
👉 बेल आयकॉन दाबा

📲 दीनबंधू न्यूज व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप फॉलो करा.
ताज्या बातम्या ऐकायला आणि पाहायला विसरू नका.
पहिल्या फोटोखालचे बटन दाबा आणि प्ले करा — बातमी तुम्हाला वाचून दाखविली जाईल.

#हॅशटॅग
#SantSavataMaharaj #SavataMali #Solapur #JaiKumarGore #MaliMahasangh #DinBandhuNews #ShivkrantiTV #ShankarraoLinge #MaharashtraNews #TempleDevelopment #SolapurNews

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button