महाराष्ट्र

🚨 “जमीनधारकांना विश्वासात न घेता तीर्थक्षेत्र विकास कसा?”

🚨 “जमीनधारकांना विश्वासात न घेता तीर्थक्षेत्र विकास कसा?”

संत शिरोमणी श्री सावता महाराज मंदिर डिझाईन अंतिम करण्याची घाई; अरणमधील शेतकऱ्यांमध्ये संताप!

अरण येथे गेल्या महिनाभरापूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सावता प्रेमी भक्तांचा भव्य मेळावा व चंदन उटी कार्यक्रम संपन्न झाला होता. त्या जाहीर सभेमध्ये आषाढ महिन्यात होणाऱ्या संत सावता महाराजांच्या ७३० व्या स्मृतिदिनानिमित्त संत सावतामाळी तीर्थक्षेत्र अरणला “अ वर्ग” दर्जा देऊन तीर्थक्षेत्र विकासासाठी तब्बल ८९ कोटी रुपयांचा तात्पुरता आराखडा मंजूर करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती.

मात्र आजपर्यंत या विकास आराखड्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित जमीनधारक शेतकऱ्यांना ना पालकमंत्री, ना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी विश्वासात घेतल्याची गंभीर चर्चा परिसरात सुरू आहे.

जाहीर सभेमध्ये स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की —

> “जोपर्यंत जमीनधारकांचा होकार मिळत नाही, समाधान तोपर्यंत या तीर्थक्षेत्राची एक वीटसुद्धा रचली जाणार नाही.”

मग आजपर्यंत जमीनधारकांना विश्वासात का घेतले गेले नाही?
जमिनींचे मोजमाप, डिझाईन अंतिम करण्याची घाई आणि प्रशासनाची एकतर्फी भूमिका यामुळे शेतकरी व सावता भक्तांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होत आहे.

संत सावता महाराजांच्या नावाने विकास होणे ही आनंदाची बाब असली तरी शेतकऱ्यांच्या भावना, हक्क आणि संमती डावलून विकासाचा डंका पिटणे योग्य आहे का? असा सवाल आता अरण परिसरातून जोर धरू लागला आहे.

⚠️ मागण्या काय?

जमीनधारक शेतकऱ्यांची तात्काळ बैठक घ्यावी

विकास आराखडा सार्वजनिक करावा

अधिग्रहणापूर्वी शेतकऱ्यांचा लेखी होकार घ्यावा

पारदर्शकता ठेवून तीर्थक्षेत्र विकास करावा

📢 सोशल मीडिया संदेश

📲 सोशल मीडिया सूचना
दीनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही

🖋️ संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01

हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
✅ बातमी LIKE करा
✅ SHARE करा
✅ SUBSCRIBE करा
✅ FORWARD करा
✅ COMMENT करा
🔔 Bell Icon दाबा
📢 दीनबंधू न्यूज WhatsApp Channel ला Follow करायला विसरू नका.
📰 दररोज ताज्या आणि निर्भीड बातम्या पहा!

#सावता_महाराज
#अरण
#जमीनअधिग्रहण
#शेतकरी_न्याय
#जयकुमार_गोरे
#तीर्थक्षेत्र_विकास
#दीनबंधू_न्यूज
#शिवक्रांतीTV
#सत्यशोधक_शंकरराव_लिंगे
#SavataMaharaj
#FarmerJustice
#MaharashtraNews

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button