सोलापूर

महाज्योतीत कोट्यवधींचा घोटाळा? प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांच्यावर गंभीर आरोप; बडतर्फी व उच्चस्तरीय चौकशीची जोरदार मागणी

महाज्योतीत कोट्यवधींचा घोटाळा? प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांच्यावर गंभीर आरोप; बडतर्फी व उच्चस्तरीय चौकशीची जोरदार मागणी

भंडारा : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मध्ये कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप समोर आला असून, प्रकल्प व्यवस्थापक (कौशल्य विकास) कुणाल शिरसाठे यांनी पदाचा गैरवापर करून स्वतःच्या आणि पत्नीच्या नावाने खासगी कंपन्या स्थापन करून शासकीय निधीचा अपहार केल्याचा खळबळजनक आरोप ओबीसी क्रांती मोर्चाने केला आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आली असून, पात्र उमेदवारांना संधीपासून वंचित ठेवले जात असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.

ओबीसी क्रांती मोर्चाने जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देत शिरसाठे यांना तात्काळ बडतर्फ करण्याची आणि तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. संजय मते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हा मुद्दा जोरदारपणे लावून धरला असून, “महाज्योतीसारख्या प्रतिष्ठित संस्थेचा वापर वैयक्तिक संपत्ती उभारण्यासाठी होऊ देणार नाही,” असा इशारा दिला आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (MCA) व GST कागदपत्रांनुसार, शिरसाठे यांनी २४ ऑगस्ट २०२३ रोजी ‘महास्किल टेक इनोव्हेटिव्ह फाउंडेशन’ ही कंपनी स्थापन केली आणि स्वतः संचालक म्हणून कार्यरत राहिले. नंतर त्यांनी पत्नी तेजल कांबळे यांना संचालक करून स्वतः बाजूला झाले. या काळात त्यांनी महाज्योतीतील पदाचा प्रभाव वापरून कोट्यवधींची शासकीय कामे स्वतःच्या कंपनीकडे वळवल्याचा आरोप आहे.

याशिवाय, ०५ मे २०२५ रोजी ‘Easy Route Exim’ नावाची कंपनी स्थापन करण्यात आली. मात्र, १७ मार्च २०२६ रोजी पत्रकार परिषदेनंतर आरोप उघडकीस आल्यानंतर १८ मार्च रोजी या कंपनीचे GST नोंदणी घाईघाईत रद्द करण्यात आली आणि अधिकृत वेबसाइटही बंद करण्यात आली. यावरून “भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का?” असा सवाल उपस्थित होत आहे.

या संपूर्ण प्रकरणात शिरसाठे व खवले यांच्या संगनमताने शासकीय निधी खासगी कंपन्यांकडे वळवण्यात आल्याचा आरोप असून, हे केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेला विश्वासघात असल्याचे मत व्यक्त होत आहे. ओबीसी क्रांती मोर्चाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून जप्तीची कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली आहे.

निवेदन देताना संजय मते, सुरेश खंगार, रामटेके, शोभा बावणकर, मनीषा भांडारकर, एन. के. राजपूत, पुरुषोत्तम नंदुरकर, पूजा पाटील, अनुष्का पाटील, हर्षिला कराडे, कुमुद गजघाटे, कोमल दुबे, यशवंत सूर्यवंशी, अमित मेहर, सुभाष उके, दिगंबर रामटेके, प्रकाश बांते, भाऊ कातोरे, अभिषेक, प्रकाश मुटकुरे, युवराज नंदनवार, संजय बांते, अतुल राघोर्ते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

“महाज्योती वाचवा, विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा!” असा नारा देत ओबीसी क्रांती मोर्चाने या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

📢 सोशल मीडिया संदेश (दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही)
ही बातमी तुम्हाला कशी वाटली? 👉 लाईक करा 👍 शेअर करा 🔁 कमेंट करा 💬
📲 आपल्या ग्रुपमध्ये नक्की जोडा: संपादक – सत्यशोधक शंकरराव लिंगे 📞 73 87 37 78 01
🔔 सबस्क्राईब करा | बेल आयकॉन दाबा | बातमी पुढे फॉरवर्ड करा – जागरूक राहा!

#महाज्योतीघोटाळा #OBCन्याय #भ्रष्टाचारबाहेरआणू #विद्यार्थ्यांचाहक्क #शासनजागेहो #DinbandhuNews #ShivkrantiTV

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button