हंटर कमिशन आणि महात्मा फुले

हंटर कमिशन आणि महात्मा फुले.
– व्याख्याते परमेश्वर बनकर, बीड 9503288282
1882 साली हंटर कमिशन समोर महात्मा फुलेंची साक्ष.
19 ऑक्टोबर 1882 साली हंटर कमिशन भारतातील शिक्षण विषयक पाहणी करण्यासाठी भारतात आलं होतं. अमेरिका आणि इंग्लंड सारख्या देशात सुद्धा 1882 पूर्वी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं नव्हतं. केवळ श्रीमंत, उद्योगपती आणि पैश्यावाल्यांच्या मुलांना प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मिळत होतं,
1882 मध्ये इंग्लड मध्ये प्राथमिक शिक्षण सर्व घटकांसाठी मोफत झालं,भारतात त्यावेळी इंग्रजांच सरकार होतं, भारता मध्ये सुद्धा शिक्षण विषयक अहवाल घेऊन शिक्षणा संदर्भात धोरण ठरवण्यासाठी इंग्रज सरकारने हंटर यांच्या अध्यक्षते खाली हंटर कमिशन भारतात पाठवलं.
या कमिशन समोर अनेक जणांनी निवेदन सादर केली व त्या मध्ये आपली मतं मांडली अनेकांनी उच्च वर्णीयांना शिक्षण मिळावं अश्या प्रकारचे निवेदनं मांडले, उच्च वर्णीय शिकले म्हणजे ते खालील घटकांना शिक्षण देतील असं त्या मध्ये नमूद करण्यात आलं होतं, महात्मा फुलेंनी मात्र या गोष्टीचा विरोध केला, आणि निवेदनात प्राथमिक शिक्षण हे शेवटच्या घटकापासून म्हणजे दलित आदिवासी शूद्र अतिशूद्रांना सर्वांनाच शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत करावे अशी मागणी केली
प्राथमिक शाळेतले शिक्षक हे शेतकरी बहुजन वर्गातले असावेत म्हणजे ते बहुजन मुलांना चांगल्या प्रकारे शिकवू शकतात, उच्च वर्णीय शिक्षक बहुजन विद्यार्थ्यांना शिकवण्यास टाळाटाळ करतील अशी शंका महात्मा फुलेंनी उपस्थित केली होती, दुसरं कारण असं की बहुजन समाजाचे शिक्षक तयार झाले म्हणजे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
त्या मध्ये महात्मा फुलेंनी अजून एक मागणी केली होती की शेतकऱ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या करा मधून उच्च वर्णीयांच्या शिक्षणावर पैसा खर्च न करता तो पैसा बहुजनांच्या प्राथमिक शिक्षणावर खर्च करावा. अश्या पद्धतीच्या अनेक बहुजन हिताच्या मागण्या फुलेंनी केल्या होत्या. असे हे बहुजन उद्दारक महात्मा फुले यांना कोटी कोटी वंदन

