राजकारण

प्रति…श्री राधाकृष्ण विखेपाटील महसूलमंत्री, महाराष्ट्र राज्य. श्रीमान पाटील साहेब, नमस्कार.

जळगाव
दिनांक..३/४/२०२४
प्रति…श्री राधाकृष्ण विखेपाटील
महसूलमंत्री, महाराष्ट्र राज्य.

श्रीमान पाटील साहेब, नमस्कार.
आपण प्रामाणिक आहात ,असे गृहित धरून मी पत्र लिहीत आहे.आणि जाहीर करीत आहे,जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रामाणिकपणाचे भान व्हावे आणि जनतेला मुल्यमापन करता यावे.नामदार म्हणणे सार्थक ठरत नाही.
पाटील साहेब आपण महसूलमंत्री असूनही महाराष्ट्रातील जनतेला काडीमात्र उपयोग झाला नाही.कारण आपण जबाबदारीने काम केले नाही.कदाचित तुम्हाला महसूल खात्याचे ज्ञान नसावे किंवा जबाबदारीचे भान नसावे.पण हे पत्र वाचल्यानंतर भानावर याल,अशी अपेक्षा ठेवतो.जर भानावर आलेच नाहीत तर मंत्री पदाचा राजीनामा देऊन पद रिकामे करा.कोणी अन्य अभ्यासू आणि सेवाभावी आमदार कडे सोपवता येईल.तुम्ही त्या पदास अपात्र ठरलेले आहात.फेल ठरलेले आहात.मंत्री पद शोभेचे असते ,असा तुमचा समज असावा.आणखी काही हेतू असतो.
जळगाव जिल्ह्यातील भुमि अभिलेख विभागात अधिकारी आणि कर्मचारी वर्ग शेतकऱ्यांची लुटमार करीत आहेत.शेत मोजणीची फी भरूनही कामे करीत नाहीत.याबाबत मी भुमि अभिलेख उप अधिक्षक जामनेर श्री राजगुरू, भुमि अभिलेख अधिक्षक जळगाव श्री मगर यांचे विरोधात उप संचालक नाशिक श्री इंगळे यांचेकडे नाशिक येथे दोन वेळा जाऊन तक्रार केली.दोन्ही वेळा इंगळे साहेब जमावबंदी आयुक्त पुणे यांचेकडे मिटींग ला गेल्याचे निमित्त सांगितले.पाटील साहेब,खरे कि खोटे खात्री करावी आणि कारवाई करावी.अन्यथा तुम्हाला महसूलमंत्री पदाची जबाबदारी देणे फजूल ठरेल.मी केलेल्या तक्रारी नंतर इंगळे साहेब जळगाव ला येऊन गेल्याचे कळते .पण शेतकऱ्यांची तक्रार ऐकून घेतली नाही.सर्व काही गुपचूप चालवलेले आहे.हे मला मान्य नाही.
पाटील साहेब, आम्ही शेतकरी शेत मोजणी साठी पंधरा महिन्यांपासून अर्ज विनंती करीत आहोत.आणि हे कामचोर आणि लाचखोर अधिकारी काम करीतच नाहीत.कदाचित या लाचखोरीला तुमचे समर्थन असावे‌.अन्यथा त्यांनी कामचोरी आणि लाचखोरी केलीच नसती.माझा आक्षेप तुमच्या वृत्ती, प्रवृत्ती वर नाही.ती स्वाभाविक आहे.माझा आक्षेप तुमच्या तुमच्या कृती वर आहे.कारण ती तुम्हाला आमच्या साठी सोपवलेली जबाबदारी आहे आणि तुम्ही स्वीकारलेली आहे.तुम्ही मंत्री पदाची जबाबदारी इमानेइतबारे निभावत नाहीत.
पाटील साहेब, तुम्ही मार्च महिन्यात जळगाव जिल्ह्यात गुपचूप आलेत.आणि रेती कलेक्टर कासार यांना भेटून निघून गेलेत.का?असे काय महत्वाचे होते ?असे काय अर्जंट होते? हे संशयास्पद आहे. आम्ही जनतेला कळलेच पाहिजे.कारण तुम्ही आमच्या साठी मंत्री बनलेले आहात .फक्त कासार साठी नाहीत.किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी नाहीत.तुमचा जळगाव येऊन कासार ला भेटणे उद्देश चांगला नाही.असा माझा आक्षेप आहे.
पाटील साहेब,मी तुमच्या चार पी ए ,पी एस ला अनेकदा फोन केला.जेणेकरून आपणास भेटून ही तक्रार करावी.पण ते कामचुकार आणि नालायक आहेत.त्यांची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे.त्यांच्या नालायक पणामुळे तुम्ही दोषी ठरतात.कदाचित जनतेची सेवा करण्याची तुमची इच्छा असू शकते.
पाटील साहेब, तुम्ही इतर वैयक्तिक आणि सरकारी कामे आटोपली असतील तर जळगाव ला यावे.जामनेर ला यावे.मी आपणास भुमि अभिलेख खात्यातील बदमाषीचा पुरावा सहित ,चोरांसहित दाखवतो.ज्यामुळे शेतकरी हैराण,परेशान,हतबल झालेला आहे.आणि तुम्ही महसूलमंत्री आहात. ही जबाबदारी तुमचीच आहे.यातून कोणताही बहाणा करून पळवाट काढू नका.या पापातून तुमची मुक्तता नाहीच.कामचोरी,लाचखोरी ला तुम्हीच जबाबदार आहात.कारण महसूलमंत्री पद बगलेत धरून बसलेले आहात.
पाटील साहेब,जर पदाची जबाबदारी सांभाळता येत नसेल,तशी मानसिकता नसेल तर ताबडतोब मंत्री पदाचा राजीनामा द्यावा.मी तुमच्या कडे कदापि तक्रार करणार नाही.तसा मला अधिकार उरणार नाही.कमवलेल्या संपत्तीतून लक्झरीयस जीवन जगा.
पाटील साहेब, तुम्ही कांग्रेस चे विधानसभा विरोधी पक्ष नेता पद सोडून भाजपात पळाले, तेंव्हाच तुमची प्रतिमा ढासळली होती.ती सावरण्याचा तुम्ही कधीही प्रयत्न केला नाही.
पाटील साहेब, आम्ही आपला व्यक्ती म्हणून आदर करू.पण मंत्री म्हणून आदर करणार नाहीत, जोपर्यंत तुम्ही मंत्री पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे निभावत नाहीत.
सबब,मंत्री पद आणि पदाची जबाबदारी हा सार्वजनिक विषय असल्याने मी हे पत्र जनतेला जाहिर करीत आहे.

.‌.शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

शिवक्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील ज्या महत्वाच्या बातम्या व्हिडिओ असतील ज्याची कुणी दखल घेत नसेल अशा बातम्या व्हिडिओ फोटो पाठवा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button