🔥🔥 मातीच्या सुगंधातून उभं राहिलेलं नेतृत्व — z P अध्यक्ष दीपक वैद्य यांची झेप अभिमानाची! 🔥🔥 :- सत्यशोधक शंकरराव लिंगे

🔥🔥 मातीच्या सुगंधातून उभं राहिलेलं नेतृत्व — z P अध्यक्ष दीपक वैद्य यांची झेप अभिमानाची! 🔥🔥 :- सत्यशोधक शंकरराव लिंगे
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात तळागाळातून उभं राहून इतिहास घडवणारे युवा नेतृत्व दीपक वैद्य यांची ओबीसी कोट्यातून सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी झालेली निवड ही केवळ पदाची नाही, तर संघर्ष, जिद्द आणि समाजनिष्ठेची दिमाखदार नोंद आहे!
अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांच्या समवेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब भंडारे, मोहोळ तालुक्यातील तांबोळी गावचे माजी सरपंच अभिमान काळे, वरकुटे गावचे माजी सरपंच हरिदास बंडगर गुरुजी यांनी बार्शी तालुक्यातील ठोंगे उपळाई येथील त्यांच्या शेतातील राहत्या घरी भेट देत शाल, पुष्पहार घालुन भव्य सत्कार केला व मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला. या प्रसंगी त्यांचे वडील रासप पक्षाचे धनगर समाजाचे नेते अरुण वैद्य, आई व संपूर्ण परिवार उपस्थित होता.
जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण… घरात कोणताही मोठा राजकीय वारसा नाही… पण वडिलांकडून मिळालेली चळवळीची प्रेरणा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द या बळावर धनगर समाजातील युवा नेतृत्व दीपक वैद्य यांनी स्वतःचा मार्ग स्वतः घडवला. ठोंगे उपळाई ग्रामपंचायत सरपंचपदासाठी लढताना केवळ १७ मतांनी झालेला निसटता पराभव त्यांनी पराभव म्हणून न पाहता, तोच पुढच्या विजयाचा पाया बनवला!
त्या अपयशातून उभं राहत त्यांनी संपूर्ण गट पिंजून काढला, कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी केली आणि बार्शीचे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली कार्य करत तळागाळातील जनतेच्या अडीअडचणी सोडवत विश्वास जिंकला. याच मेहनतीचं सोनं होत, जेव्हा जिल्हा परिषद निवडणुकीत तब्बल ९९८४ मतांच्या विक्रमी आघाडीसह त्यांनी दणदणीत विजय मिळवला! त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो असे सत्यशोधक शंकराव लिंगे म्हणाले
बार्शी तालुक्यातील सर्वच्या सर्व सहा गटांमध्ये भाजपचे उमेदवार आणि पंचायत समितीचे बारा सदस्य विजयी झाल्याने जिल्हा परिषद अध्यक्षपद बार्शीकडे येणार, ही चर्चा अखेर सत्यात उतरली आणि एका शेतकरी कुटुंबातील तरुणाच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ पडली — हीच खरी लोकशाहीची ताकद!
सत्कार प्रसंगी बोलताना शंकरराव लिंगे म्हणाले, “जेमतेम १० एकर जिराईत शेतीवर संसार चालवणाऱ्या कष्टकरी वडिलांनी आपल्या मुलाला दिलेली सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय घडण ही प्रेरणादायी आहे. कमी शिक्षण असूनही मोठं नेतृत्व घडू शकतं, याचं हे जिवंत उदाहरण आहे. आता या पदाचा उपयोग करून शेतकरी, शेतमजूर, महिला, दलित, कामगार अशा सर्व घटकांना न्याय देणं हीच खरी जबाबदारी आहे.”
तसेच त्यांनी यांनी ओबीसींना आरक्षणासाठी केलेल्या शिफारशी आणि मंडल आयोगामुळे मिळालेल्या संधींचा आदर राखत सर्व समाजघटकांसाठी समतोल विकास साधण्याचे आवाहन केले.
🌱 प्रेरणा काय घ्यावी?
👉 पराभव म्हणजे शेवट नाही, तो नव्या विजयाची सुरुवात असते
👉 शिक्षण मर्यादित असलं तरी जिद्द अमर्यादित असावी
👉 तळागाळाशी नातं ठेवलं तर नेतृत्व आपोआप उभं राहतं
👉 समाजासाठी काम केलं तर समाज तुमचं नेतृत्व स्वीकारतो
✨ ही कथा आहे संघर्षातून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाची… ही कथा आहे नव्या पिढीला दिशा देणाऱ्या दीपक वैद्य यांची! ✨
📢 सोशल मीडिया सूचना:
📲 दिनबंधू शिवक्रांती टीव्ही
संपादक – सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01
👉 हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा
👍 बातमी LIKE करा | 🔁 SHARE करा | 📩 FORWARD करा
💬 COMMENT करा | 🔔 SUBSCRIBE करा व Bell Icon दाबायला विसरू नका!
#दीपकवैद्य #सोलापूर #जिल्हाध्यक्ष #OBCनेतृत्व #प्रेरणादायी_कथा #ग्रामीणनेतृत्व #संघर्षतेविजय #Barshi #Solapur #YouthInspiration















