मनोज जरांगेंची मोठी घोषणा, आता, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन; तारीखही जाहीर

🟠ओबीसी च्या बातम्या🟠
3) मनोज जरांगेंची मोठी घोषणा, आता, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन; तारीखही जाहीर
आता, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी आंदोलन करनार असून राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात याच अनुषंगाने बैठका घेणार असल्याचंही त्यानी जाहीर केलं आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे उपोषकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला सगेसोयरे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं, पण ते पूर्ण न केल्यामुळे आपण विधानसभा निवडणुकांची तयारी करत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे 29 ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुकांसंदर्भात मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा करण्यात येणार होती, पण त्यांनी आपला निर्णय पुढे ढककला आहे. त्यामुळे, आता शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी आपण लढा उभारणार असल्याची घोषणा करत, मनोज जरांगे यांनी पुढचं आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करणार असल्याचं म्हटलं आहे.
आता, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी आंदोलन करनार असून राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात याच अनुषंगाने बैठका घेणार असल्याचंही त्यानी जाहीर केलं आहे. मतदार संघानिहाय बैठकांमध्ये मराठा आरक्षणासह शेतकरी (Farmer) आणि इतर सर्वच मुद्दे घेण्यात येणार असल्याचं मनोज जरांगे (Manoj jarange) यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून सांगितलं. लवकरच शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू करणार असून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी आणि पीकविम्याचे पैसे राहिले आहेत, सरकार प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना फसवते, आता सरकार कसे कर्जमाफी करत नाहीत हे पाहतो, असेही जरांगे यांनी म्हटले.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




