सोशल

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा ३

काम गृहनिर्माण मंत्री श्री. भुजबळ यांना वाड्याला भेट द्यायला आपण नेल्यानंतर त्यांनी अवघ्या सहा महिन्यांत पूर्ण करून वीस वर्षे खोळंबलेले काम मार्गी लावले होते. छगन भुजबळ यांनी सावित्रीबाईंच्या जन्मस्थानाची झालेली दुर्दशा बघितली आणि ते भावनावश झाले. हे जन्मस्थळ राज्य संरक्षित स्मारक करण्याची त्यांनी घोषणा केली. फुले वाड्याचा अनुभव पदरी असल्याने आणि सांस्कृतिक कार्य खाते प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यासारख्या जाणकारांकडे असल्याने या कामाची पूर्तता करायला फारसा वेळ लागला नाही.

भुजबळ यांनी त्यांचा आमदार निधी उदार हस्ते उपलब्ध करून दिल्याने नायगावचा संपूर्ण कायापालट आपल्याला घडविता आला. गावातील स्त्रियांना नैसर्गिक विधीसाठी सोयी नव्हत्या. त्यासाठी शंभर सामुदायिक स्वच्छतागृहे उभारून देण्यात आली. गावात डांबरी रस्ते, भूमिगत गटार योजना, रस्त्यावरील विद्युतीकरण, गावाला घरोघर नळाने पाणीपुरवठा यासाठी पाणी योजना अशा कितीतरी योजना कार्यान्वित केल्या.

सातारा जिल्हा प्रशासनातर्फे श्री. अनिल डिगीकर (जिल्हाधिकारी), श्री. दिलीप बंड (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., सातारा) यांचे विशेष सहकार्य लाभले. राज्याच्या पुरातत्त्व विभागाचे संचालक बा. स. गजभिये आणि साताऱ्याचे अधिकारी पी. एन. पोतदार यांनी स्मारकाच्या उभारणीत खूप मेहनत घेतली. सावित्रीबाईच्या वाड्याच्या परिसरात राहणाऱ्या पंधरा कुटुंबांचे आधी पुनर्वसन करण्यात आले.

आधी पुनर्वसन आणि मगच प्रकल्पाचे काम याचे हे एकमेव उदाहरण असावे. राहत्या घरापेक्षा दुप्पट मोठी आणि सुसज्ज नवी कोरी घरे सर्वांना मोफत देण्यात आली. हे गाव पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. या गावात ग्रंथालय, व्यायामशाळा, महिला केंद्र, व्यापारी गाळे, शाळा, महिला अध्यापक महाविद्यालय अशा असंख्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पुणे-सातारा महामार्गावर देखण्या आणि भव्य कमानी उभारण्यात आल्या. ज्या घरात सावित्रीबाईंचा जन्म झाला

त्या वाड्याची मूळच्या पायावर पुन्हा उभारणी करण्यात आली. अंगणात सुरेख बाग विकसित करून तेथे सावित्रीबाईंचा अर्धपुतळा बसविण्यात आला. या स्मारकाचे उद्घाटन तत्कालिन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शरद पवार होते. या परिसराच्या अधिक विकासाच्या कामी पालक मंत्री श्री. दिलीप वळसे पाटील यांनी लक्ष घातले आहे.

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button