सोलापूर

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार?

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार?

अजितदादा पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी राजकीय हालचालींना वेग

अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातात झालेल्या निधनानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. अजितदादा पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ) पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.

या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले उपमुख्यमंत्रीपद कायम ठेवण्यात यावे आणि ते पद अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच देण्यात यावे, तसेच अजितदादा पवार यांच्याकडे असलेली सर्व महत्त्वाची खाती त्यांच्याकडेच कायम ठेवण्यात यावीत, असे निवेदन देण्यात आल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर उद्या किंवा परवा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज अजितदादा पवार यांच्या निधनाचा तिसरा दिवस असतानाही त्यांच्या गटातील कोणताही मोठा नेता रक्षा सावरण्याच्या कार्यक्रमास उपस्थित नसल्याची खंत पक्षातील एका जबाबदार प्रवक्त्याने व्यक्त केली. सर्व नेत्यांनी आम्ही अजून दुःखातून पूर्णपणे सावरलो नसल्याचे सांगत, तरीसुद्धा आज मुंबईत एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, उद्या 31 जानेवारी रोजी मुंबईत सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत अजितदादा पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. याच बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) च्या गटनेतेपदी निवड केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पक्षातील अनेक नेत्यांचे मत आहे की, सध्याच्या परिस्थितीत सुनेत्रा पवार यांना पक्षाची राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी आणि राज्याचे उपमुख्यमंत्रीपद दिले गेले, तरच अजितदादा पवार गट एकसंध राहू शकतो.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील अनेक नेत्यांनी अजितदादा पवार यांची शेवटची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची होती, अशी भावना व्यक्त केली आहे. 12 डिसेंबर रोजी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे एक मोठे “राजकीय गिफ्ट” दिले जाईल, असे संकेत यापूर्वी देण्यात आले होते, असे त्या गटाचे नेते अंकुश काकडे यांनी स्पष्ट केले होते.

मात्र, या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार गटातील कोणत्याही प्रमुख नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकीकरणाबाबत ठोस भूमिका मांडलेली नाही. केवळ नरहरी झिरवाळ यांनी एका टप्प्यावर एकत्र येण्याबाबत विधान केल्याचे दिसते. मात्र, त्यांनीही अग्निसंस्कार सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रवादी अजितदादा गटांचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवावे अशाही सूचना नरहरी यांनी अग्निधन झाल्याबरोबर मांडलेले आहेत, अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जाते.

राजकीय जाणकारांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकीकरणात अनेक अडचणी आहेत. त्यातील प्रमुख अडचण म्हणजे शरद पवार साहेब भाजपसोबत जाण्यास तयार होतील का, तसेच अजितदादा पवार गटातील सर्व नेते सत्तेबाहेर राहण्यास तयार नाहीत. याशिवाय, एकीकरण झालेच तर उपलब्ध मंत्रिपदे आणि महत्त्वाची पदे मर्यादित असल्याने अनेक नेत्यांची पदे कमी होण्याची शक्यता आहे. यामुळेच घाईगडबडीने शपथविधी घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

राजकीयदृष्ट्या पाहता, हे पद काही दिवस रिक्त राहिले तरी प्रशासनावर कोणताही परिणाम होणार नाही, असे असतानाही तिसऱ्याच दिवशी या हालचाली सुरू झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या घराण्याची सत्यशोधक परंपरा लक्षात घेता, तीन दिवसांपेक्षा अधिक काळ दुखवटा पाळला जात नाही. रक्षा विसर्जन व अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम तिसऱ्याच दिवशी केला जातो आणि त्यानंतर सर्वजण पुन्हा कामाला लागतात, अशी परंपरा आहे. याच परंपरेनुसार आज शरदचंद्रजी पवार साहेब नीरा नदीच्या काठावर गेले असून, त्यांनी नीरा नदीतील पाण्याच्या प्रदूषण स्थितीची पाहणी केली. यावरून पवार साहेब पुन्हा जोमाने सार्वजनिक कामात सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे.
.

लेटेस्ट अपडेट (राजकीय वर्तुळातील चर्चा)

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कार्यालयात आज उशिरापर्यंत हालचाली सुरू होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) मधील काही आमदारांनी शपथविधी लवकर व्हावा, यासाठी आग्रह धरल्याचे समजते. मात्र अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नसून, उद्याच्या आमदारांच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सोशल मीडिया संदेश

अजितदादा पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा निर्णयप्रक्रियेचा टप्पा सुरू झाला आहे. सुनेत्रा पवार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार का? उद्याच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष.

हॅशटॅग

#AjitPawar #SunetraPawar #MaharashtraPolitics
#NCP #DeputyCM #PoliticalUpdate
#SharadPawar #DevendraFadnavis

सोशल मीडिया सूचना

दिनबंधू न्यूज | सेवक क्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01

हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा
बातमी लाईक करा 👍
शेअर करा 🔁
सबस्क्राईब करा 🔔
फॉरवर्ड करा ➡️
कॉमेंट करा 💬
बेल आयकॉन दाबायला विसरू नका

टीप: बातमीच्या शेवटी दिलेल्या आवाजाच्या बटनावर क्लिक केल्यास ही संपूर्ण बातमी आपल्याला वाचून ऐकवली जाईल.

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button